समायरा अमोघला कश्या पद्धतीने सांगायचं याचा विचार करत करत तिच्या घरी पोहोचली...
अमोघ देखील तिच्या ताईची आतुरतेने वाट पहात होता.... कधी एकदा 'ताई आणि भाऊजी' हे काय गुपित आहे... हे आपल्याला कधी कळेल असं त्याला झालं होतं...
जेवण वगैरे आवरल्यावर समायरा आईला म्हणाली.... आई आज जेवण एकदम झक्कास झाले होते... त्यामुळे जास्तच जेवण झालेय... मी जरा अंगणात शतपावली करून येते....
समायरा : अमोघ येतोस का शतपावली करायला माझ्यासोबत.
अमोघ लागलीच तयार झाला.....
थोडंही चालण्यासाठी कंटाळा करणारा अमोघ आज ताईच्या एका हाकेत तयार झाला... याचं समायराच्या आईला कौतुकही वाटलं आणि आश्चर्यही.
समायरा आणि अमोघ दोघेही शतपावली 👣करायला निघाले
फिरता फिरता दोघेही थोडं दूर गेले तोपर्यंत असीम शांतता होती... अमोघच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं... ताई आता काय बोलेल या कडे त्याचे कान लागले होते....
समायरा : हे बघ अमोघ आता मी तूला जे काही सांगणार आहे ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील... आईबाबांना बिलकुल कळणार नाही याचं मला वचन दे.... आणि तू तूझ्या ताईला पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करशील .
अमोघ : पण असं काम करायचंच कश्याला की आपल्याला आईबाबांपासून लपवावे लागेल.....
समायरा : कधी कधी परिस्थितीसमोर आपल्याला हतबल व्हावे लागते रे....
अमोघ :म्हणजे??
समायरा :म्हणजे मी आणि तुषार ऑफिस मध्ये खोटे पती पत्नी आहोत??
अमोघ : काय 😇? म्हणजे चक्क नाटक... पण का??
समायरा : अरे इथे तूझी फीस भरण्यासाठी फक्त एक महिन्याचा अवधी होता आणि तुषारला त्याच्या आईच्या उपचारासाठी हे जरुरी होतं....
अमोघ :जाऊ दे ताई, मी नाही शिकत पूढे... माझ्या शिक्षणासाठी तूला हे असे मार्ग अवलंबायला लागले....
समायरा : अरे अमोघ काही पण काय असा विचार करतोस?? हे फक्त काही दिवसांसाठी आहे... अन काय करणार त्या कंपनीची अट तशी होती....
अमोघ : आणि हा तुषार कोण मग?? 🤔तूझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का?
समायरा ते ऐकून खूप हसली 😂😂🤦♀️ अरे बॉयफ्रेंड वगैरे कुणी नाही... मग तुषारची भेट कशी झाली, कशी नौकरी मिळाली सगळं काही सांगितलं.....
अमोघ : काय ताई तूला आमच्यासाठी काय काय करावं लागत आहे??
समायरा : तसं नाही अमोघ हे पाऊल मी आपल्या सर्वांसाठी उचलले आहे.... पण मी अशी वागले म्हणून आयुष्यात तू कधी असे पाऊल कधीच उचलू नकोस.... आणि तशी वेळ आलीच तर तूझ्या ताईला आधी सांग आपण नक्की काही तरी यातून मार्ग काढू.....
आज काय शतपावलीत रात्र काढायची वाटतं?? समायरा च्या आईने दुरूनच असा टोमणा मारला....
समायरा : नाही आई येतो गं म्हणून दोघेही घरात आले....
अगं आई! आज पौर्णिमेचा चंद्र 🌝खूप छान वाटत होता... त्याच्या प्रकाशात शतपावली करायला छान वाटत होतं.. हो की नाहीरे अमोघ!!... समायरा जरा लाडात येऊन बोलली...
समायराला आता थोडं हायसं वाटायला लागलं होतं... डोक्यावर ठेवलेला दगड जणू कुणीतरी बाजूला ठेवला असं तिला वाटायला लागलं होतं...
अमोघला मात्र आपल्या ताईला अश्या प्रकारे आपल्या शिक्षणासाठी नौकरी करावी लागत आहे. हे अजिबात आवडलेलं नव्हतं.....
इकडे तुषार आज एका वेगळ्याच धुंदीत होता...त्याला नलिनीची धुंद चढली होती.... नलिनीचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता....
तुषारची झोप तर एकदम हरवून गेली होती.... या आडंगावरून त्या आडांगावर असं करत होता....
काय करावं सांगावं का? समायराला... पण समायरा कामाव्यतिरिक्त दुसरं काही बोलेल तर शपथ.... बघुयात काहीतरी युक्ती काढून तीची माहिती काढू.... जर समायराने जास्तच नखरे केले तर दीपक तर आहेच....
असा विचार करत करत मध्यरात्री तुषारला झोप लागली....
क्रमश :
भाग 20 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
0 टिप्पण्या