किती सांगायचं मला (भाग 10)

मार्था ने त्या दोघांनाही आपल्या बाजूला बसवले.... 
आणि सगळ्या लोकांना उद्देशून ती बोलायला लागली... 

मार्था : dear employees, आपल्याकडे नवीन वेगळा विभाग सांभाळण्यासाठी आपण एका newly married couple ला निवडले आहे... आणि त्यांचं काम प्रगतीपथावर चालण्यासाठी आता हा चार्ज हस्तांतरणाचा कार्यक्रम करण्यासाठी मी तूम्हा सर्वाना माझ्या केबिन मध्ये बोलावले आहे.... 

हा मिस्टर तुषार आणि ही  मिसेस समायरा दोघेही बी कॉम, एम बी.ए आहेत.... तसे दोघेही नवीनच आहेत पण त्यांचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी थोडी मदत तूम्हा अनुभवी लोकांची राहू द्या... 

मिस्टर आशिष चार्ज हस्तांतरणाची प्रक्रियेला सुरुवात करा.... 

तुषार : एक मिनिट मार्था.... मला काही बोलायचे आहे... 

मार्था : बोल !!

तुषार ::" i am very sorry "मार्था मी मध्येच बोलत आहे....
 आम्ही प्रोजेक्ट व्यवस्थित तयार करतो... सगळ्या अनुभवी सिनियर लोकांची मदत घेतो पण आम्हाला आताच चार्ज नको..
 आशिष खूप अनुभवी आहे.. .. तो आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेलच... पण आम्ही नवीन असल्याने या जमाखर्चाच्या व्यवहारात आम्ही गोंधळून जाऊ....
आम्हाला काहीच अनुभव नाही.. आधी आम्ही आशिषचे मार्गदर्शन घेऊ.... मग चार्ज घेता येईल.... 

तुषारच्या त्या बोलण्यावर आशिषचा चेहरा खूप खुलला...ऑफिसमधल्या बाकी लोकांनाही तुषारचं बोलणं योग्य वाटत होतं... 

मार्था : ठीक आहे" तुषार " पण मग आशिषच्या मार्गदर्शनाखाली लवकर प्रोजेक्ट तयार करा आणि या आठवड्यात आपलं काम नवीन पद्धतीने सुरु झालं पाहिजे याकडे कल ठेवा.... 

मग सगळे आपापल्या जागेवर जायला निघाले... 

मार्था : मी तूम्हाला इथून जायला सांगितले आहे का?? 
 सगळेच गोंधळले आणि थांबले..... 
मार्थाने तिथल्या शिपायाला (गणेश ) जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितले.... 
आणि म्हणाली सगळेजण आपापल्या जागेवर बसा..... 

अगदी पाच मिनिटातच गणेश समोस्याच्या प्लेट्स आणि कोल्ड ड्रिंक घेऊन आला... 

ऑफिसमधल्या लोकांनी ते बघून एकदम सुस्कारा सोडला... केबिनमधले वातावरण एकदम हसतेखेळते झाले.... नुसता सगळ्यांचा गलबला सुरु झाला होता.... 

ऑफिस मधल्या लोकांना मात्र मार्थाचे असे वागणे म्हणजे एक दिवास्वप्न होते.... पण हा चांगला बदल तिच्यात आपोआपच घडून आला होता.... आज मार्था, "खडूस मार्था वाटत नव्हती..... 

सगळ्यांचा नाश्ता झाला आणि मार्थाची रजा घेऊन सगळे जण आपआपल्या जागेवर कामासाठी गेले... 

मार्थाच्या केबिनच्या बाहेर आल्यावर सर्व जण एकमेकांजवळ आश्चर्य व्यक्त करत होते....

 मार्था आणि पार्टी??  दूरदूरचा संबंध नव्हता... मग हा बदल?? पण छानच आहे... अश्याने खेळीमेळीच्या वातावरणात आपण काम करू...असं ऑफिस मधली रजनी म्हणाली..... 

आशिष : तुषार, जरा इकडे येतोस का?? 
तुषार : काय !!

आशिष : अरे चार्ज घ्यायचा असतास ना !! माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं असतं.... आशिष खोटेपणाने बोलला... खरं तर आशिषच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.... तुषारने ते टिपले होते... 

तुषार : चार्ज तूझ्याकडे राहिला काय आणि माझ्याकडे राहिला काय?? एकच!! उलट मला जमाखर्चाचे टेन्शन राहणार नाही......तुषारदेखील एकदम साळसुदपणाचा आव आणून म्हणाला..... 

आशिष : as you wish,  बरं लवकर प्रोजेक्ट तयार करा आपल्याला लवकरच हे काम तुमच्या पद्धतीने करावं लागेल.... 

तुषार : मला पाच दिवस दे !! जाहिरातीसहीत प्रोजेक्ट तयार करतो.... 

आशिष :आधी प्रोजेक्ट करा... जाहिरातीचे नंतर बघू.... ( जाहिरातीसाठी आपल्याला काही पैश्यांचा घोळ करता येईल असा विचार करून आशिष बोलला )

तुषारच्या तल्लख बुद्धीला ते लागलीच लक्षात आले पण भोळेपणाचा आव आणून तुषार ठीक आहे मग तीन दिवसात आम्ही प्रेझेंटेशन देतो... असं तुषार आशिषला म्हणाला.... 

आशिष : ठीक आहे लाग कामाला..... जा आपल्या जागेवर 

तुषार : ok

तुषार आपल्या जागेवर गेला.... 

इकडे समायरा आतुरतेने तुषारची वाट बघत होती.... 

समायरा : काय बोलणे झाले?? 

तुषारने सर्व घडलेला प्रकार सांगितला.... 

समायरा:omg,  म्हणजे खरंच घोळ केलेला आहे तर !! मग आता आपण कसं करायचं.... 

तुषार : हे बघ मी तीन दिवसाचा अवधी माघितला आहे...l झिरो बजेट पासून आपण सुरुवात करून प्रोजेक्ट करू.... 
जाहिरातीचं देखील आपणच करायचं पण प्रोजेक्ट आणि जाहिराती असे वेगवेगळे फोल्डर तयार करू.... म्हणजे आपल्याला आशिषला फक्त प्रोजेक्टचं फोल्डर दाखवता येईल आणि मार्थाला जाहिरातीचं.... 

समायरा : अन जाहिरातीला लागणारे पैसे??  ते कुठून देणार?? त्यासाठी तर आशिषची मदत लागेल ना !!

तुषार : नाही लागणार !! आपण जाहिरातीसाठी सुरुवातीला ऍनिमेशन वापरू.... i think तुझ्याकडे ऍनिमेशन चं सर्टिफिकेट आहे... हो ना !!

समायरा : आश्चर्याने !! काय?? तूला कसं माहीती... 

तुषार : काय झालंय तूला?? अगं तूझे documents मीच सबमिट केले होते ना !! इतक्या लवकर विसरलीस?? 

समायरा : काय करणार !! एका पाठोपाठ एक धक्केच बसत आहेत..... 
क्रमश :

भाग 11 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

 


©® डॉ.सुजाता कुटे. 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या