तुषार एका शहीद फौजी माणसाचा मुलगा असल्यामुळे कदाचीत त्याला जावई म्हणून स्वीकारतील...
जावई 😀😀 आपण तर खूप पुढचा विचार करतोय !!असा विचार करून समायरा मनोमन खूप हसली....
समायराची आई : आज काय बक्षीस मिळालं??स्वारी भलतीच खूष दिसतेय??
समायरा :काही नाही आई, कधी कधी कस्टमर असे विचित्र प्रश्न विचारतात ना त्याचं हसू येत होतं.... आई मला जाम भूक लागली आहे.... मी फ्रेश होऊन येते लागलीच जेवायला बसू.....
समायराची आई : तूझं काम कसं सुरु आहे.... म्हणजे काही अडचणी....
समायरा : अगं नाही आई !!माझं काम मी खूप एन्जॉय करते... माझा एक सहकारी आहे तुषार तो पण माझ्याच सोबत काम करतो.... त्यामुळे कामाचा भार आता फिफ्टी फिफ्टी...
तितक्यात समायराचा फोन वाजला ...
समायराने फोन उचलला.... तुषार?? आता कसं काय फोन केला काय माहीती असा मनोमन विचार करून समायराने त्याच्या कानाला फोन लावला.....
तुषार एकदम रडवेल्या आवाजात : हॅलो समायरा
समायरा : हॅलो तुषार !! काय झालं?? तू इतका का घाबरला आहॆस??
तुषार : समायरा !! माझी आई अचानक बेशुद्ध पडली आहे... मी तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे.... डॉक्टरांनी तीला ऍडमिट करून घेतले आहे.....मला उद्या ऑफिसला नाही येता येणार....
समायरा : हे बघ तुषार तू तूझ्या आईची काळजी घे... मार्थाला काय सांगायचं ते मी बघून घेईन... काही अडचण असली तर सांग.....
तुषार : सध्या तरी इतकंच...
समायरा : हे बघ तूला काही गरज लागली तर कधीही कॉल कर, अगदी बिनधास्त.....
तुषार : हो !! डॉक्टर आले... मी ठेवतो फोन.... असं म्हणत तुषारने फोन कट केला....
इकडे तुषार जेव्हा घरी पोहोचला होता तेव्हा आई काही घराचा दरवाजा उघडेना.... योगायोगाने तुषारकडे लॅच ची चावी होती..... त्याने ती फिरवली.... लॅच उघडले.... आणि हॉल मध्ये त्याची आई त्याला बेशुद्ध पडलेली दिसली..... त्याने लागलीच आईला शेजाऱ्यांच्या कारमध्ये हॉस्पिटलला आणलं होतं....
डॉक्टर आले आणि तुषारला म्हणाले.... तूझ्या आईची रक्तातील साखर खूप कमी झाली होती... आता आम्ही 25 percent glucose लावलं की आई शुद्धीवर आली.... त्यांच्या काय गोळ्यांमध्ये काही बदल केला आहे का??
तुषार :हो ! आमच्या तिथल्या एका डॉक्टरने डोस डबल केला होता.......
डॉक्टर : मग तूम्ही फॉलो अप दिलाच नसेल.... डॉक्टरने दुसऱ्या तारखा दिल्या तेव्हा हॉस्पिटलला गेले नाही का?
तुषार : उद्या बोलावलं होतं... उद्या आम्ही जाणारच होतो...
डॉक्टर :अच्छा, आता आईची तब्येत चांगली आहे....
तुषार : मी तीला भेटू शकतो डॉक्टर??
डॉक्टर :हो भेट, अजून एक सलाईन दिलं की, घरी जाता येईल तूम्हाला... फक्त या गोळीचा डबल डोस न घेता सिंगल डोस घ्यायला सांगा .... आणि आईला walking करायला सांगा...
तुषार :हो
डॉक्टर : नियमित फॉलो अप घ्या.... मी सांगेन त्या त्या तारखांना तूम्ही दाखवा.... उद्याचा एक दिवस आईला घरी एकटं सोडू नका....
तुषार हो, हो, नक्की... मी काळजी घेईल डॉक्टर....
तिच्या खाणपिण्यात काही बदल करावा लागेल का?
डॉक्टर : फळे सुरु करा,गोड पदार्थ टाळा, गोड फळे अल्प प्रमाणात राहू द्या, भात कमी, आणि बटाटे देऊ नका... ..
तुषार : ठीक आहे डॉक्टर.... येतो मी.... असं म्हणून तुषार वॉर्डच्या दिशेने गेला....
सलाईन संपल्यावर द... तुषारच्या आईला सुट्टी झाली... तिथल्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून दोघेही घरी आले...
घरी आल्या आल्या हातपाय धुवून तुषार स्वयंपाक घरात गेला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागला....
तुषारची आई :लवकर सून आण बाबा, म्हणजे ती माझी काळजी घेईल....
तुषार : आई !!तूझी तब्येत ठीक नसतानाही तू काय सून सून करत आहॆस??
तुषारची आई : हं, काही नाही झालं मला....
दोघांनीही पोटभर जेवण केलं.......
तुषारची आई : छान झालं आहे सगळं... अगदी मनसोक्त जेवले मी.....
आज तुषार रीस्क नको म्हणून आईच्या बाजूलाच झोपला...
आई व्यवस्थित आहे ना याची रात्री एक दोन वेळेस उठून त्याने खात्री केली.....
सकाळी निघताना समायराने तुषारला फोन केला.... तुषार ने समायराला काय काय घडले ते सर्व सांगितलं.... आणि मी आज एक दिवस आईला काय हवं नको ते बघण्यासाठी
घरीच थांबणार आहे असं सांगितलं...
समायरा एकटीच ऑफिसला गेली....
ऑफिस मधला प्रत्येक जण अरे समायरा तू एकटीच?? तुषार कुठे आहे असा प्रश्न करत होते....
समायरा मात्र प्रत्येकाला उत्तर देऊन कावरी बावरी झाली होती... आयुष्यात पहिल्यांदाच इतकं खोटं ती बोलत होती...
भरीस भर म्हणून दुसऱ्या दिवशी येणारी मार्था आजच ऑफिसला आली होती....
तुषार आज गैरहजर आहे हे मार्थाच्या देखील लक्षात आले होते...
मार्थाने गणेश करवी समायराला बोलावून घेतले.... समायराची मार्थाच्या केबिनमध्ये एकटं जाण्याची ही पहिलीच वेळ... तिला नुसतं धडधड होत होतं ....
मार्था : ये बस समायरा बेटा !!आज तुषार नाही आला...
समायरा : त्याच्या आईची तब्येत खराब आहे....
मार्था : त्याची आई?? म्हणजे तूझी सासू नाu?? काय
झाले त्यांना...
समायरा :अं !!हो
मार्था :मग तू का नाही थांबली??
समायरा :इथलं काम डिस्टर्ब होतं ना !!
मार्था : तू त्याची लिव्ह अँप्लिकेशन आणली आहॆस का??
समायरा : अं, गरबडीत विसरले....
मार्था :its ok बेटा.... तुषारला सांग की मी आज घरी येतेय तूझ्या सासूला भेटायला...
समायरा : काय 😳?? तुषार उद्यापासून येणार आहे ना...
मार्था :हो !! मी तूझ्या सासूला भेटायला येते आहे.... तुषारला नाही 😊
क्रमश :
भाग 22 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा
.
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
0 टिप्पण्या