किती सांगायचं मला (भाग 50)

समायरा : खरं तर आता एक मिनिट देखील ईथे थांबावं वाटत नाहीये... पण काय करणार 🤷‍♀️परवा सकाळ पर्यंत आपल्याला ईथेच राहावे लागणार.... 

तुषार : हो.. उद्या काय करू आपण तसंही कुन्नूर बघायला जाणार आहोत... इथली स्पेशालिटी चहा पावडर आणि निलगिरी तेल खरेदी करू.... 

समायरा :निलगिरी तेल🤔... त्याचा काय फायदा.... 

तुषार :अगं ते सांध्यांसाठी खूप छान आहे.... पेनकिलर म्हणून वापरता येतं.... आईने ते नक्की आण म्हणून सांगितलं आहे.....

समायरा : ते तर खरेदी करू पण अमोघ म्हणाला होता  त्याच्यासाठी काही आण?? 

तुषार  : अगं जवळच ईथे खूप छान आणि फॅन्सी स्वेटर, जॅकेट मिळतात.... त्याला नक्कीच आवडतील... थोडे महाग आहेत पण खूप छान आहेत.... 

समायरा : हो का? चालेल मला मग त्याची पण खरेदी नक्की करू.... 

तुषार : समायरा !!  आज रात्री बँक्वेट हॉल मध्ये काही couple games खेळणार आहेत...मला इव्हेंट मॅनेजर कडून कळालं आहे....  फ्रँकली खूप ऑड वाटतं गं... तू टोनी करवी हॉटेल मॅनेजरला सांग ना..

समायरा : तुषार !! बरं झालं आठवण केलीस... मी लागलीच टोनीला फोन 📳लावते.... 

असं म्हणून समायराने फोन 📳उचलला तितक्यात टोनीचाच तीला फोन आला...

टोनी : hi" supercute "

समायरा : हॅलो 😍

टोनी : छान झाला प्रवास.✈️.. आताच घरी पोहोचलो.... 

समायरा : अरे वा, लवकर पोहोचलास.... टोनी !! ऐक ना...इथले हॉटेल मॅनेजर couple games जबरदस्तीने खेळायला लावतात... खूप ऑड वाटतं ते... तू जरा तुझ्या पद्धतीने सांग ना.... 

टोनी :ok ok मी लागलीच सांगतो त्यांना....असं म्हणून टोनीने फोन📳 कट केला... 

टोनीने हॉटेल मॅनेजरला आमच्या एम्प्लॉयीना जर तुमच्या कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायचा नसेल तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे राहू द्या असा फर्मान सोडला.... 

तुषार आणि समायरा आता बऱ्यापैकी निश्चिन्त झाले होते. 
मग बँक्वेट हॉलमध्ये copule  games, couple डान्स बघत जेवणाचा आस्वाद घेत होते.... आता दोघांनाही मनासारखं वागता येणार असल्याने कुठल्याही प्रकारचा दबाव त्याच्यावर नव्हता..... 

दुसऱ्या दिवशी देखील दोघांचीही खरेदी आणि टूर दिवस भर एकदम छान पार पडला.... 

ईकडे का कुणास ठाऊक पण मार्थाला" तुषारच्या आईला" भेटायची जाम ईच्छा झाली.... त्यासाठी मार्थाने तुषारला फोन📳 लावला.... 

मार्था : हॅलो तुषार !! कसे आहात दोघेही... एन्जॉय करता ना... 

तुषार : हो, उटी खूप सुंदर 😍आहे... आम्ही पण छान एन्जॉय करत आहोत... 

मार्था : बरं मला  तुझ्या घराचा ऍड्रेस सेंड कर... मी आज तुझ्या आईची भेट घेते.... मागेच भेटणार होते... पण जमले नाही ना.... 

तुषार : आईची भेट 😳आणि आता?? मी आल्यावर भेटा ना... 

मार्था : का बरं?? तुझ्याशिवाय मी भेटू नाही शकत का?? 

तसं काही नाही... मी ऍड्रेस सेंड करतो म्हणून तुषारने फोन📳 ठेवला 
समायरा ने तुषारच्या बोलण्यावरूनच अंदाज बांधला आणि म्हणाली 
समायरा : मार्था तुझ्या घरी जाणार आहे... एक काम कर तू ऍड्रेस सेंड करूच नकोस.... विसरला किंवा नेटवर्क issue मुळे सेंड नाही झाला असं काहीतरी सांगू.... 

तुषार : हा तसंच करू.... 

पुन्हा तुषारला मार्थाचा फोन 📳आला ....मला तूझा ऍड्रेस मिळाला आहे...फक्त तुझ्या आईला निरोप दे की मी येणार आहे म्हणून?? 

काय 😳ठीक आहे, असं म्हणून तुषार ने फोन📳 खाली ठेवला.... 

समायरा :काय झालं?? 

तुषार :मार्थाला मागे ऍड्रेस दिला होता ना.... तो तिला सापडला आहे.... मी येणार असा आईला निरोप दे म्हणाली.... 

समायरा : टोनी?? टोनीला बोलते असं म्हणून समायराने फोन📳 लावला...

पाच सहा कॉल झाले पण टोनीने फोन📳 उचलला नाही... टोनी मित्राच्या एंगेजमेंटमध्ये busy होता तिथे संगीताचा कार्यक्रम चालू असल्यामुळे त्याला आवाज ऐकू आला नाही..... 

आता मात्र दोघेही खूप टेन्शन मध्ये आले.... तुषारने आईला फोन लावला...  त्याच्या आईने देखील फोन उचलला नाही... 

ही आई ना... एका रूम मध्ये फोन ठेवते आणि एका  रूम मध्ये काम करते... तुषारची टेन्शनने नुसतीच चिडचिड😠 होत होती..... 

नलिनी हो नलिनीच आता जाऊन बघू शकेल.... असं म्हणून तुषारने नलिनीला फोन लावला... 

नलिनी तीचे ऑफिसचे काम आटोपून स्कुटीकडे निघाली की तिच्या फोनची📳 रींग वाजली... 

तुषार आणि या वेळेला??सहसा मी ऑफिस मध्ये असते म्हणून तो फोन करत नाही तरी कसं काय?? काहीतरी नक्कीच काम असेल असा विचार करत तिने फोन📳 उचलला.... 

तुषार : नलिनी !!तू अजून ऑफिसलाच असशील ना?? 

नलिनी : हो आतपर्यंत होते... आता घरी निघाले.... 

तुषार :" मार्था " ऑफिस मधून गेल्या का? 

नलिनी : हे काय माझ्यासमोरच गाडीत बसल्या.... 

तुषार : नलिनी !! त्या माझ्या घरी जात आहेत.... तिथे जर त्यानी काही माझ्याविषयी आणि समायराविषयी उल्लेख केला तर माझे काहीच खरे नाही... तू जाऊन बघू शकतेस का? 

नलिनी : 😳 बापरे, असं आहे का?? बरं बरं मी जाते... जमेल तितकं सांभाळण्याचा प्रयत्न करते... पण तू आता तिथे उटीमध्ये बसून टेन्शन घेऊ नकोस..... चल मी निघते... मार्थाच्या आधीच घरी पोहोचण्याचा प्रयत्न करते... 


ईकडे समायरा आणि तुषार जाम टेन्शनमध्ये आले होते तर नलिनी भरधाव वेगाने तुषारचं घर गाठू बघत होती.... 

शेवटी एकदाची नलिनी पोहोचली पण तीचे प्रयत्न व्यर्थ झाले होते.... मार्था तिच्या आधीच पोहोचली होती.... 

मार्थाची गाडी तुषारच्या घराबाहेर होती.... 

नलीनीने दार ठोठावले.... 

मार्था : नलिनी तू?? 

तुषारची आई : ये बेटा नलिनी.... कसं काय येणं केलं... 

नलिनी : सहजच... 

मार्था : बरं, मागे मी तूम्हाला भेटायला येणार होते पण नाही जमलं.... म्हणून म्हटलं आज मुद्दाम तूम्हाला भेटावं... 

तुषारची आई : बरं झालं तूम्ही आलात... तसंही एकटीला करमत नव्हतं.... तरी गंगाबाई आहे म्हणून बरं 

मार्था : पण काही म्हणा... तूमचा मुलगा आणि सून आहेच गुणी.... 

"खपला तुषार "आता काहीच खरं नाही.... नलिनी🙄 मनोमन विचार करू लागली..... 

तुषारची आई : हो, दोघेही खूप गुणी👍 आहेत.. 

कमाल आहे.... अजून यांचं ठरायचं आहे, तरी "मार्था पर्यंत ही बातमी पोहोचली पण"... असा तुषारची आई मनोमन विचार करू लागली.... 

नलिनी देखील तुषारच्या आईकडे आश्चर्याने बघू😳 लागली.... 

मार्था : तुमच्या मुलाने आणि सुनेने कंपनीचा फार फायदा करवला आहे   .... 

तुषारची आई : असं आहे का?? अच्छा, धन्यवाद... 😊... तुम्हाला चहा ☕️चालतो ना... 

मार्था : चहा?? ☕️चालतो ना.... बिना साखरेचा....

तुषारची आई : गंगाबाई !! दोन कप बिनसाखरेचा आणि तिन कप साखरेचा चहा ठेवा.... 

मार्था : पाच कप?? 

तुषारची आई : ड्राइव्हर असेल ना.... गंगाबाई तुझ्यासाठी पण ठेव गं.... 

चहा घेऊन झाला... 

बरं वाटलं तूम्हाला भेटून... खरंच तूम्ही खूप नशीबवान आहात मुलाच्या आणि सुनेच्या बाबतीत.... असं निघताना मार्था म्हणाली.... 

तुषारच्या आईने आपल्या होणाऱ्या सुनेचं इतकं वारंवार कौतुक होत आहे म्हणून हळूच नलीनीच्या पाठीवर थाप मारली आणि हो,  हो "धन्यवाद "असं मार्थाला म्हणाली.... 

आता नलीनीला लक्षात आलं की मार्था जेव्हा मुलगा आणि सून असा उल्लेख करायच्या तेव्हा तुषारची आई तुषार आणि मी समजत होत्या... 🙄
हाश्श हुश्श सुटलो बुवा फक्त मार्थाने समायराच्या नावाचा उल्लेख केला नाही म्हणून.... नलीनीने बाहेर गेल्यागेल्या तुषारला फोन📳 लावला आणि घडलेला प्रकार सांगितला... 

आता तिघांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.... 

क्रमश :
भाग 51 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे .
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या