आमच्यासारखे आम्हीच (भाग 2)

नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे... 
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल.

"माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. "
....................................................................

                   "   Introduction "

जड अंतःकरण घेऊन आणि जड पाउलांनी चौघींचेही पालक परतीच्या प्रवासाला निघाले.... 

अनुया : किती हुरहूर लागत आहे ना😒... चला आपल्या रूम मध्ये सगळेच सामान लावू म्हणजे मन रमेल.... 

नेहा : बरं झालं सायली !! आणि गीतिका !!आपल्याला शेजारी शेजारी रूम मिळाली ती.. 

सायली : ती मुलगी बघ ना?? कशी घोरून आपल्या कडे बघत आहे... मला तर भीती वाटत आहे... चला बाई आपापल्या रूम मध्ये जाऊ... 

घाबरून चौघी जणी आपापल्या रूम मध्ये गेल्या.... पण चेहऱ्यावर त्यांनी घाबरल्यासारखे दाखवले नाही.... 

अनुया आणि नेहा रूम पार्टनर होत्या तर सायली आणि गीतिका रूम पार्टनर...... 

रूम तयार करून झाल्यावर आता चौघी जणी एकत्र आल्या... रूम आवरल्यामुळे होणारी हुरहूर आता कमी झाली होती.... तितक्यात त्यांच्या रूमचा दरवाजा वाजला... 

अनुया : बापरे 😳 कोण असेल... कुणी सिनियर असेल का? आपली रॅगिंग तर होणार नाही ना.... मला तर खूप भीती वाटत आहे.... 

गीतिका : अगं अनुया!! कश्याला घाबरतेस....आपल्याला प्रिन्सिपॉल सरांनी काय सांगितले आहे?? काहीही त्रास झाला तर त्यांना सांगायचं.... मग कशाला घाबरतेस.... 

असं म्हणून गीतिकाने रूमचा दरवाजा उघडला.... 

एक मुलगी आत आली आणि म्हणाली फ्रेशर्स?? 

नेहा : हो.... 

मी पण.... माझे नाव 'अंजली."... nice to meet you.... 

चौघीनींही सुटकेचा निःश्वास सोडला... आणि स्वतःचा परिचय करून दिला..... 


अनुया : आम्हाला सिनियर्सची खूप भीती वाटत आहे गं... 

अंजली : खरं सांगू का??  मला पण त्यांची भीती वाटत होती म्हणून मी तुमच्याजवळ आले..... येताना एका सिनियरने मला गुड इव्हनिंग विष करायला लावले 😏. 
काय समजतात स्वतःला काय माहिती..... 

नेहा  :अंजली !! तूझी ब्रँच कुठली?? 

अंजली : इलेक्ट्रिकल.... आणि तुम्हा सर्वांची कॉम्पुटर ना... 

नेहा : अरे वा, तूला बरं माहिती🤔.... 

अंजली : तूम्ही हॉस्टेलला आल्यापासून माझे सगळे लक्ष तूमच्या कडेच तर होते😊.... 

गीतिका : हुशार आहेस.... 

अंजली : चला आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली.... पण सिनियर्स ची खूप भीती वाटते.... 

अनुया :त्यांच्यासाठी तर आमचं ब्रीदवाक्यच पुरेसं आहे... 

अंजली : ब्रीदवाक्य 🤔

एक दो तीन चार, चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार.... 

अंजली :असं होय 😂😂😂

सगळ्या मिळून मेस च्या दिशेने निघाल्या.... बाजूने काही सिनियर मुली चालल्या होत्या... 

दिव्या : Excuse me, सिनियर्स ना wish वगैरे करण्याची काही पद्धत असते की नाही 😡

अंजली : good evening मॅम 

मीना : हं, गूड आणि तूम्ही पोरींनो तुमच्या तोंडाला काय कुलूप लागलं आहे का?? 

चौघीही एकसुरात : गूड evening मॅम.... 

केतकी :आता कसं कानाला सुमधुर वाटतं.... विष करताना जरा कमरेतून वाकून विष करायचं..... 

 ओह मनातल्या मनात मला शिव्या देत आहेत.... तू तू तुझं नाव काय गं.... नेहा कडे बोट दाखवून मीना म्हणाली..... 

केतकी : मीना !! रेक्टर मॅम ईकडे येत आहेत.. .. चला जेवायला जाऊ.... 

रेक्टर : मुलींनो जेवायचं नाही का??  चला मेस चा होऊन जाईल 

अनुया : हो मॅम आम्ही जेवायला चाललो...... 

आता रेक्टर देखील जेवायला सोबत असल्यामुळे सगळ्या बिनधास्त जेवायला मेस मध्ये गेल्या.... 

जेवताना एका कोपऱ्यात बसल्या..... पण सगळ्या सिनियर मुलींचे लक्ष या पाच जणींच्या हालचालीकडे होते.... त्या मुळे मान खाली घालून शांतपणे एकही शब्द न बोलता जेवणे हेच त्यांना योग्य वाटले..... 

तितक्यात अजून एक मुलगी रेक्टर च्या बाजूला गुपचूप येऊन बसली..... 

रेक्टर : मुलींनो ही यास्मिन... 

अंजली : hi यास्मिन !!

अनुया : यास्मिन!! कुठली ब्रँच? 

यास्मिन : इलेक्ट्रॉनिक्स.... 

अंजली : अनुया!! या वर्षी ऍडमिशन प्रमाने आपले वर्ग ठरतात.... म्हणजे ब्रँच कुठलीही असो कदाचित आपण सर्व जणी एकाच क्लास मध्ये असू..... 

अनुया : अच्छा, असं आहे तर.... सगळेच सोबत आलो तर मज्जा येईल मग 

सगळ्यांचे जेवण झाले... मग सगळ्या जणी आपापल्या रूम मध्ये गेल्या... 

सायली : गीतिका !! बरं झालं नाही आज रेक्टर मॅम आपल्या सोबत होत्या... तू बघितलं का?? काही सिनियर्स आपलीकडे कश्या मारक्या म्हशी सारखं बघत होत्या😏.... 

गीतिका : हो गं... मला खूप भीती वाटत होती.... आजचा दिवस तर सुटला पण उद्या??

तितक्यात दारावरची कडी वाजली... .. 

गीतिकाने घाबरत घाबरत दार उघडले... अंजली तू?? मी किती घाबरले होते.... 

अंजली : आपल्याला सगळ्यांना त्या समोरच्या कॉरिडोरमध्ये बोलावलं आहे... 

गीतिका : कुणी?? 

अंजली : काही सिनियर मुली आहेत त्यांनी.... मला म्हणाल्या just for introduction.... 

अंजली, यास्मिन,  नेहा, गीतिका, अनुया आणि सायली आता समोरच्या कॉरिडॉर मध्ये गेल्या.... 

नेहा : अरे, ह्या तर दुपारी भेटलेल्या सिनियर्स आहेत.... 

तितक्यात आवाज आला : हो, आम्हीच त्या... तुम्हाला सिनियर्स ना विष करायचं शिकवलं नाही का आतापर्यंत... 

अनुया :अरे ही तर "केतकी" मगाशी भेटलेली..... 

 hey you !!कुठे लक्ष आहे तुझं?? मी तुझ्याशी बोलत आहे केतकी, अनुयाकडे बघून म्हणाली.... 

अनुया : गूड इव्हनिंग मॅम... 

दिव्या : जरा 90 डिग्री मध्ये वाकून... 

केतकी : 90 डिग्री कळतं ना.... 

दिव्या : 😂😂😂 कळणार कसं नाही.... इंजिनिअर व्हायला आल्या आहेत की.... 

अनुया ने वाकून विष केलं..... 

मीना : तुम्हाला काय वेगळं सांगावं लागतं की काय?? 

सगळ्यांनी एकाच सुरात वाकून विष केलं... 

केतकी : 😊sounds good.... चला आता सगळ्यांनी एक एक करून स्वतःचं introduction द्या...

अनुया : मी अनुया दळवी....cet रँक... 

केतकी बस ईतकंच.. छंद वगैरे नाही का? 🤔

अनुया : छंद... drawing... 

दिव्या : ये हुई ना बात😊.... चल मग आता तू माझं चित्र काढ.. बघ असं चित्र काढ की सगळ्यांनी वाहवा केली पाहीजे.... 

केतकी : अगं दिव्या !! तिला चित्र काढायला पेन्सिल आणि कागद तर दे ना.... नाहीतर ती कश्यावर चित्र काढेल??  तू पण ना... 

अनुया आता मात्र जाम घाबरली.... 

दिव्याने तिच्या हातात पेन्सिल दिली आणि म्हणाली... बरं तूला सूट.... तू तूझी ही मैत्रीण आहे ना तिचं हुबेहूब चित्र काढ.... 

केतकी :  तुझं नाव.... 

सायली, छंद गाणे गुणगुणणे . 

मीना : अरे वा आपल्या कडे एक से बढकर एक कलाकार आहेत तर... आपल्याला आता रोज सुमधुर संगीत ऐकायला मिळेल मग.... सुरात गाता येतं ना पण😏... का फक्त बाथरूम सिंगर.... 

केतकी :आम्हाला चालेल काही पण 😂😂😂

दिव्या :ए काय नाव तुझं सायली !! माझ्या आवडीचं गाणं म्हण.... शनिवार राती मुझे निंद नही आती😂😂... 

सायली : मला ते गाणं येत नाही... .. 

दिव्या : काय यार?😒 बरं तूझ्या आवडीचं गाणं म्हण मग... 

सायली : 
              रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा…
कुंद कळ्यांना… वेलींना… सांगा रे सांगा…

हे भास होती कसे…. हे नाव ओठी कुणाचे…
का सांग वेड्या मना… मला भान नाही जगाचे…!!!

मला वेड लागले प्रेमाचे…
मला वेड लागले प्रेमाचे…
प्रेमाचे… प्रेमाचे…!!!

दिव्या : मराठी, भारी गाणं म्हणतेस गं तू.... काय म्हणालीस तूला प्रेमाचे वेड लागले?? 🤔 आम्हाला कळू दे की कोण आहे तो.... 

मी असले धंदे करत नाही...मी फक्त गाणं म्हणाले सायली थोडे रागात 😡येऊन म्हणाली.... 

दिव्या : म्हणजे आम्ही असले धंदे करतो का?? काय गं तूला रिस्पेक्ट वगैरे देणं माहिती नाही का? फार आवाज वाढत आहे😡....

त्यावर सायली काही बोलणार तितक्यात यास्मिनने तीचा हात दाबला.... समोरून गीतिकाने देखील नकारात्मक खुणावले.... 

सायली शांत बसली.... 

दिव्या : काय झाले?? 🤔बोलता बोलता का थांबलीस😡.... 

काही नाही 🥺असं म्हणून सायलीच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले... तिला सिनियर्स चा राग देखील आलेला होता म्हणून ते अश्रू ती लपवत होती.... 
          
                      
    आता या मुलींची स्वारी नेहा कडे वळाली.... 

मीना : तू हा तूच तोंड वाकडं 😏करायला काय झालं?? आम्ही फक्त तूमची हॉबी विचारली... 

माझं नाव" नेहा" माझी हॉबी कूकिंग....मला वेगवेगळे पदार्थ तयार करायला आवडतात.... 

केतकी : हुशार आहेस गं.... कुकिंग सांगितल्यावर आम्ही ईथे काही करायला लावू शकत नाही ना.... 

दिव्या : तूला आता वेगळं सांगावं लागेल का?? 

यास्मिन : मेरा नाम यास्मिन, मैने इलेक्ट्रॉनिक्स लिया है | मेरी हॉबी है डान्सिंग.... 

दिव्या : गूड गर्ल, ये हुई ना बात....चलो फटाफट शुरु हो जाओ.... 

यास्मिनने वेळ न दवडता डान्स 💃💃सुरु केला.... 

मीना : ही पोरगी आपल्याला जाम आवडली😍😍....सगळं कसं मनासारखं करत आहे.... 

केतकी : अगं तू !!काय नाव तुझं?? 🤔हा अनुया !!बघू मैत्रिणीचे चित्र काढलेस ना??

अनुयाचे हात थरथरत होते... तीने काहीच चित्र काढले नव्हते.... डोळ्यातून अश्रू ओघळत 🥺होते....तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंच्या धारा😭 पाहून आता सायली चा देखील स्वतःवरचा ताबा सुटला.... ती देखील रडायला😭 लागली.... तीचे हुंदके ऐकू यायला लागले.... 

दोघींचेही असं रडणं पाहून केतकी, दिव्या आणि मीनाच्या हृदयात कालवाकालव झाली.... 

केतकी : काय यार तूम्ही पण?? आम्ही असं काय केलं जे की तूम्ही रडायला लागल्या... मीना !! अगं आपण यांच्यासाठी ते चॉकलेट आणले होते ना ते दे बरं.... 

मीनाने दहा दहा रुपयांचे छोटे कॅडबरी चॉकलेट🍫 काढले...

मीना : अनुया !! हे घे 🍫 अगं खास तुमच्यासाठीच तर आणले आहेत.... रडू नका यार.... 

केतकी : जुनिअर्स !! ही तर पाहिली पायरी आहे.. आपला अहंकार आपल्या घरी ठेवायची.... खरं सांगा आम्ही तुम्हाला असं काय करायला लावलं?? 🤔.... जे काही करायला लावलं ते तुमच्या आवडत्या छंदाना अनुसरूनच करायला लावलं ना.... 

दिव्या : हो ना... आज तरी तुमचं introduction आम्ही ईथे घेतलं आहे... पण उद्या कॉलेज मध्ये मुलं घेतील तेव्हा अश्या मुळूमुळू रडणार का??  

सायलीचे रडणे काही केल्या थांबत नव्हते.... शेवटी मीना तिच्या जवळ गेली आणि तिनी तीचे डोळे पुसले.... अगं सायली ईतकं हळवं कुणी असते का?आता तुम्हाला तुमच्या आईवडिलांना सोडून ईथे राहावं लागेल.तर धीट राहावं लागेल की नाही.... 

चला आता सगळेच जण झिंगाट करू या म्हणजे तूमचा मूड फ्रेश होईल.... 

दिव्या : केतकी !! झिंगाट लाव बरं.....

केतकीने तिच्या मोबाईल वर गाणं लावलं 

उरात होतंय धड धड… लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं… ही पिरतीची बाधा झाली

आता अधीर झालोया… बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू… मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट… रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

सुरुवातीला सगळ्या सिनियर मुलींनी डान्स सुरु केला आणि मग एक एक जुनिअर मुलीला त्यात ओढून सगळ्याच मुलींनी मनसोक्त डान्स केला..... 

आता टेन्शनमय वातावरण बदलून एकदम खेळीमेळीचे😍 वातावरण तयार झाले .... 

गाणं झाल्यावर सगळ्यांनीच सगळ्यांना बाय आणि गूड नाईट केले..... व सगळ्याजणी आपापल्या रूम मध्ये आल्या.... 

झाल्या प्रकाराने अनुया,नेहा, सायली, गीतिका खूप गोंधळून गेल्या होत्या.... हे काय होतं.... ह्या मुली आधी आपल्याशी किती कडक वागल्या पण नंतर तेव्हडेच प्रेमाने....... 

चौघीना काही केल्या झोप लागेना....पुन्हा चौघी अनुया आणि नेहा च्या रूम मध्ये जमल्या... 

चौघीही खूप खूष होत्या... आता ज्या मुलींची त्यांना भीती वाटत होती ती पूर्णपणे गेली होती....

अनुया : सुरुवातीला वाटले होते, उद्या पहिले जाऊन रेक्टर मॅम कडे यांची कंप्लेंट करावी आणि मग प्रिन्सिपॉल कडे.... 

सायली : अनुया !! गाण्यांचा ईतका मोठा आवाज... रेक्टर ला कळालं नसेल असं वाटते आहे का तूला?? 🤔

नेहा : मी ही तेच म्हणत होते... 

अनुया : म्हणजे चक्क रेक्टरने दुर्लक्ष केले... पण खरंच जाम भारी आहेत गं या सिनियर्स.... मला तर खूप आवडल्या.... 

गीतिका : हो मला देखील खूप आवडल्या, हे झालं हॉस्टेलचं,  आता उद्या कॉलेज आहे.... मुलांनी त्रास देऊ नये म्हणजे झालं... 

नेहा :😳, बापरे मी तर मुलांना बोलायला आधीच घाबरते.... 

सायली : बरं विषय निघालाच आहे तर सगळ्या जणी एक गोष्ट लक्षात ठेवा.... उद्या जर कुणी मुलांनी अडवलं तर शांतपणे त्यांना विष करायचे म्हणजे उगाचच कुणी काही बोलणार नाही..... 

अनुया : चला गर्ल्स आता रात्रीचे बारा वाजून गेले आहेत... झोपू या उद्या लवकरच उठावे लागेल..... 

नेहा : हो सकाळी सहा वाजता उठलं तर आपल्याला गरम पाणी मिळेल असं अंजली म्हणाली होती... 

सायली : "चला " गूड नाईट, चल गीतिका !!

चौघीही बरोबर सकाळी सहा वाजता उठल्या तरी हॉस्टेल मध्ये सामसूमच होती....शांत वातावरणाचा फायदा घेत चौघीही लवकर तयार होऊन हॉस्टेलच्या कॅन्टीन मध्ये गेल्या.... 

तिथे काही सिनियर मुली आधीच आलेल्या होत्या... या चौघीनींही त्यांना विष केलं... पण त्यांचे लक्ष नव्हते... त्या एकीकडे नाश्ता करत होत्या आणि एका हातात पुस्तक ठेऊन वाचत होत्या.... आणि काही प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची याची चर्चा करत होत्या.... 

अनुया : असं वाटत आहे की त्यांची कुठली तरी परीक्षा आहे.... 

नेहा : हो ना, किती टेन्शन मध्ये दिसत आहेत आपण विष केलं तरी त्यांच्या लक्षात नाही आलं... 

सायली : पण किती चांगल्या पद्धतीने त्या ग्रुप डिस्कशन करत आहेत ना.... 

गीतिका : हं... 

तितक्यात अंजली आणि यास्मिन देखील तयार होऊन कॅन्टीन मध्ये आल्या.... 

अंजली : नेहा !! निघताना आम्हाला आवाज तर द्यायचा ना.... 

यास्मिन : हा, अब कॉलेज को तो भी साथ जायेंगे....पहले ही बहोत डर लग रहा है |

सायली : उसमे क्या डरना.... अगर किसी ने तकलीफ पहुंचाई तो अँटी रॅगिंग कमिटी है  ना, वहा कम्प्लेंट कर देंगे.... 

यास्मिन : इन्शाअल्लाह, सब कुछ ठीक हो.... 

अंजली : चला आता... कॉलेजची वेळ झाली आज आता आपल्या सगळ्यांना प्रिन्सिपॉल सर मार्गदर्शन करणार आहेत.... म्हणून सगळ्यांना मिळून कॉलेजच्या ऑडिटोरियम कडे जावे लागणार आहे...... 

अनुया, सायली, नेहा, गीतिका, यास्मिन आणि अंजली या सहा जणी दबक्या पावलाने, मान खाली घालून कॉलेजच्या आवारात आले..... 

कॉलेजच्या आवारात त्यांना जागोजागी मुला मुलींचे घोळके दिसत होते.... सिनियर मुलामुलींनी जुनिअर मुलामुलींना थांबवले होते.... आणि एका एकाला विष करायला लाऊन introduction चालू होते...... 

अनुया : आपण उजव्या बाजूने जाऊ म्हणजे इथून सटकता येईल..... 

सायली : हो, चला गं तिथे कुणी दिसत नाहीये.....

सगळ्या जणी उजव्या बाजूने जाणार तोच एका मुलाचा आवाज आला.... कुठे पळताय.... 

नेहाने मान वर केली.... अनुया !!आता थांबावे लागते गं नेहा अनुयाच्या कानात कुजबुजली.... 

एका मुला मुलींच्या घोळक्याने यांना घेरलं.... 

या सहाही जणींनी कमरेतून वाकून "गूड मॉर्निंग सर आणि गूड मॉर्निंग मॅम " असं विष केलं..... 

तितक्यात एक भारदस्त पण तितकाच गोड आवाज या सगळ्यांना ऐकू आला.... तो मुलगा म्हणत होता अरे वा या मुली तर हुशार आहेत.... चला मग फटाफट तुमचं introduction द्या..... 

अनुयाने introduction द्यायला मान वरी केली... 😳अरे हा तर आपल्या बंगलोच्या  बाजूच्या सोसायटीत रहात होता.... माझं पहिलं क्रश😍.......

त्याने मला ओळखलं नसेल का?? 

क्रमश :
भाग 3 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लाईन वर क्लिक करा 👇


नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang




.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

  1. मुली पण रॅगिंग करतात? खरच स्त्री च स्त्रीचा शत्रू हे सार्थ ठरणार नाही ना? पुढील भागाची उत्सुकता!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. याला रॅगिंग नाही म्हणता येणार... पण जे खूप अहंकार बाळगतात त्यांच्यासाठी गरजेचे आहे

      हटवा
  2. बरेच ठिकाणी विष हा शब्द आलाय .
    कृपया तो विश (wish ) असा दुरुस्त करा .
    अर्थ बदलतोय

    उत्तर द्याहटवा