नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
सगळ्यांना आता एक वेगळाच हुरूप आलेला होता.मिशन गीतेशसर मध्ये उत्सहाचं उधाण आलेलं होतं...
चौघीही फार धीट होत्या...तशी त्यांना कुणाचीच भीती वाटत नव्हती..
. त्या चौघींमध्ये मैत्रीचा बॉण्ड ईतका घट्ट होता की सहजा सहजी जर कुणी तो तोडण्याचा प्रयत्न केला तर तोच तोंडावर सपशेल आपटत असे.
म्हणूनच अनुयाला,नेहा आणि प्रज्वल बद्दल ईतकं jalousie वाटून देखील तीने एका शब्दाने देखील नेहाला दुखावलं नव्हतं...
तसंच प्रज्वल देखील जेव्हा जेव्हा नेहाला भेटायला बोलावत असे तेव्हादेखील नेहा ओव्हर रिऍक्ट होत नसे...उगाचच अनुयाला चिडवत नसे....
कॉलेज मध्ये गेल्यावर कॉलेज कॅम्पस मध्ये गीतिका ला गीतेश सर दिसले....
गीतेश सर दिसताच आता गीतिकाची तळपायाची आग मस्तकात गेली😡.... गीतेश सरांचे लक्ष आपल्याकडे नाही हे पाहून गीतिकाने लागलीच तीचे तोंड दुसरीकडे वळवले व तीने गीतेश सरांना पाहिलेच नाही असा अविर्भाव तिच्या चेहऱ्यावर आणला....
हुश्श सुटलो बूवा.... किती अवघड आहे मला ईतका राग😡 आलेला असताना प्रेमाचे नाटक करणं 🙄..... बरं झालं आज त्या गीतेश सरांचे लेक्चर नाही नाहीतर माझा चेहऱ्यावरचा राग स्पष्ट त्यांना दिसला असता..... असा विचार करत गीतिका क्लास मध्ये जाऊन बसली....
थोडया वेळाने गीतेश सर क्लास मध्ये आले... हे काय 🙄आज गीतेश सरांचा पिरियड नसताना सर कसं काय क्लास मध्ये आले.... देवा 🙏तू पण माझ्यासोबत कसले कसले खेळ खेळतोस.... जेव्हा मला वाटायचं गीतेश सर मला भेटावे... मला त्यांना एकदा तरी बघायला मिळावं तेव्हा सर मला दिसत देखील नव्हते.... आणि आता नकोसं वाटत आहे तर आज क्लास नसताना देखील क्लास घ्यायला आले ...
अहो गीतिका!!मॅम कुठे लक्ष आहे तुमचं?? मी काही प्रश्न विचारला आहे?? गीतेश सरांच्या आवाजाने गीतिका भानावर आली...
गीतिका : सॉरी सर 🙄...
गीतेश सर : its ok... कोण उत्तर सांगू शकेल याचं...
हं अंजली!!तू सांग....
गीतेश सरांनी काय विचारलं काय माहिती🙄....जाऊ द्या गीतिका मॅडम आता या सरांच्या शिकवण्याकडे लक्ष द्या... नाहीतर उगाचच बळीचा बकरा होशील....असा विचार करत क्लास मध्ये नेमकं काय चालू आहे... याचा कानोसा गीतिका घ्यायला लागली....
गीतेश सरांचे लेक्चर संपले.... गीतिकाला एकदम हायसं वाटलं...
गीतिका : नेहा!!एक दृष्टीकोन बदलला की किती बदल घडतात नाही..
नेहा : म्हणजे??🤔
गीतिका : काही नाही अगदीच परवापर्यंत गीतेश सरांचे लेक्चर संपूच नये असं मला वाटायचं... आणि आज त्यांचं लेक्चर संपलं की मी एकदम रिलॅक्स झाले...
नेहा : पण या आधी सरांनी तूला कधीच उठवलं नाही... आणि आज चक्क गीतिका मॅम??
गीतिका : हो ना... मला देखील खूप आश्चर्य वाटलं....
अरे यार हा प्रज्वल पण ना ... त्याला काही मला भेटल्याशिवाय करमत नाही.... खिडकीतून बघ... मला बाहेर बोलावत आहे.... नेहा खिडकीकडे बोट दाखवत म्हणाली...
नेहा लागलीच प्रज्वल कडे गेली....
गीतिका :अनुया!! हे प्रज्वल आणि नेहाचं नेमकं काय चाललं आहे हे कळू शकेल काय?
अनुया :🥺🤷
गीतिका : अरे तू इमोशनल झालीस....अनुया!!तू काळजी करू नकोस.... मी जरा नेहाला जाब विचारते....
अनुया : गीतिका!! नको... हे बघ प्रज्वल माझा क्रश आहे... पण प्रज्वलला जर नेहा आवडत असेल तर??🤔
गीतिका : पण नेहाला तर अकरावी पासून माहिती आहे ना...की प्रज्वल तूझा क्रश आहे म्हणून 🤔
अनुया : काय सांगावं नेहाला देखील प्रज्वल आवडत असेल तर??😊
गीतिका :अनुया!! तूझी कमाल आहे... तू हे ईतकं easy going मध्ये कसं म्हणत आहे??
अनुया : अगं गीतिका!! तूच सांग मी किंवा प्रज्वल आम्ही काय एकमेकांना कंमिटमेन्ट केले आहे का?
गीतिका : नाही...
अनुया : मग मला सांग दोघांवर ही रागावण्याचा मला काय अधिकार आहे...
गीतिका : अनुया!!तू ग्रेट आहेस.... मी जर तूझ्याजागी असते तर खूप भांडले असते.....
नेहा प्रज्वलशी बोलून परत क्लास मध्ये आली... प्रज्वल शी बोलून झाल्यावर नेहाचा चेहरा अगदी टवटवीत 😊झाला होता....
नेहा खूप खूष आहे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.... ते अंजलीच्या नजरेतून सुटले नाही...
अंजली : नेहा!! काय चालू आहे तुझं??
नेहा : काय चालू आहे म्हणजे??🤔
अंजली :आजकाल रोज त्या प्रज्वलशी गुलुगुलु बोलत असतेस... काय त्याने प्रपोज वगैरे केलं की काय??
हा प्रश्न ऐकताच आजूबाजूच्या सगळ्या मुलींचे कान नेहा कडे टवकारले गेले....
नेहा : जस्ट शट अप 😡... Its none of your busyness..
अंजली :लोकं बोलतात म्हणून मी विचारलं त्यात ईतकं चिडायला काय झालं??
नेहा : कोण बोललं गं... तूझा तो झेंडू बोलला असेल 😡...
अंजली : ए नेहा!! तो विकी काही माझा नाही... तू उगाचच त्याला कश्याला मध्ये आणतेस?
नेहा :सुरुवात कुणी केली 😡🤔?
सायली : तूम्ही भांडू नका ना प्लीज.... सगळे जण आपल्या कडेच बघत आहेत.....
नेहाने आजूबाजूला बघितलं.... सगळे मुलं देखील तिच्याकडेच बघत होते... ते बघून ती शांत झाली.....
------0------
अनुया गाढ झोपलेली होती अचानक नेहाने अनुयाला उठवले...
नेहा : अनुया!! लवकर उठ....
का काय झालं.... एकदम घाबरून अनुया उठली....
नेहा : काउन्टडाऊन स्टार्ट्स....4,3,2,1...अँड....
नेहाने अनुयाचा फोन तिच्या हातात दिला.... लागलीच तिच्या फोनची📳 रींग वाजली... प्रज्वल 🤔आणि आता 😳....
प्रज्वल : Many many happy returns of the day...
अनुया : माझा बर्थडे 🤔...🤦♀️ रात्रीचे बारा वाजलेत नाही.thank you,thank you ....
नेहा : happy birthday dear 😍😍
सायली आणि गीतिका पळत रूम मध्ये आल्या आणि दोघींनी तीला wish केलं....
नेहा : अनुया!! एक मिनिट फोन स्पीकर वर टाक....
अनुयाने फोन स्पीकर वर टाकला
क्रमश :
भाग 29 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या