नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
वर्गातील सगळ्याच मुलामुलींना अनुयाच्या बर्थडे पार्टीची खूप उत्सुकता होती....
अनुया एका धनाड्य बिल्डरची मुलगी आहे हे आतापर्यंत वर्गातील सगळ्या मुलामुलींना कळालं होतं....
अनुया beauty पार्लर मध्ये गेली आणि तयार झाली....
ईकडे सायली आणि गीतिका छान तयार होऊन कॅफे मध्ये सगळ्यांच्या स्वागतासाठी आधी जाऊन बसल्या....
गीतिका : सायली!! बरं झालं आपण जरा आधी आलो.. आता अनुयाला थोडं तयार व्हायला वेळ लागला तरी चालेल.
सायली : कालपासून किती मज्जा येत आहे ना....ते प्रज्वल चे प्लॅन्स..मस्तच ना...
गीतिका : हूं...
सायली : गीतिका!!एक विचारू??
गीतिका : विचार ना....🤔
सायली : कालपासून आपण ईतकं एंजॉय करत आहोत.. पण तू तितकं मोकळेपणाने एंजॉय करताना दिसत नाही... तू अजूनही गीतेश सरांचा विचार करतेस ना....
गीतिका : हूं... तू हेरिटेज मध्ये लोकांचं बोलणं ऐकलं होतंस ना... प्रत्येकजण त्या कपल बद्दल काय बोलत होते...
सायली :काय??
गीतिका : अगं भलेही गीतेश सरांनी मला धोका दिला.... माझ्याशी खोटं बोलले... पण ते लोकं त्यांची तारीफच करत होती ना... स्तुतीसुमने उधळत होती ना...
सायली :🙄 मग 🤔?
गीतिका : तरीही सरांचे चार घटस्फोट.... पचत नाहीये...
सायली : गीतिका!! ईतका विचार करू नकोस गं... तो माणूस धोकेबाज आहे हे नक्की... आणि जेव्हा आपण त्याच्या बायकांना भेटू आपल्याला त्याचे घटस्फोट का झाले हे देखील कळेल..,
गीतिका : हूं...
सायली : काय हूं 🤔 हे बघ गीतिका!! नेहा निवडून आली होती तेव्हा देखील त्या गीतेश सरांमुळे तू मोकळेपणाने एंजॉय केलं नाही... आता तरी छान एंजॉय कर....
गीतिका :हो गं ... करते मी एंजॉय...
एकामागे एक सगळे जण कॅफे मध्ये जमा होऊ लागले होते.
सायली :गीतिका!!अनुयाला फोन 📳लाव गं.... तीला सांग,सगळे जमा होत आहेत....
गीतिका :अनुया निघाली आहे... तो पर्यंत वेलकम ड्रिंक्स serve करायला सांग,असं ती म्हणाली.
सायलीने वेटरला बोलावून प्रत्येकाला वेलकम ड्रिंक द्यायला सांगितलं....
विकी : बर्थडे गर्ल कुठे आहे??
गीतिका : येत आहे.....
सायली :आता अनुयाने जास्त उशीर करायला नको....येणारा प्रत्येकजण तिचीच विचारपूस करत आहे...
तितक्यात अनुया आली.....
गीतिका आणि सायली अनुयाकडे बघतच बसल्या....
गीतिका : अनुया!!आज काय तूला पाहून सगळ्यांनाच बेशुद्ध करायचा विचार आहे का
अनुया : का 🤔काय झालं?? मी बरी दिसत आहे ना...
गीतिका : बरी??... अगं एकदम सुंदर 😍दिसत आहेस... Awesome....
सायली : अनुया!!एकदम मस्त... आज काही प्रज्वल ईथुन परत जात नाही बघ....
यास्मिन : अरे अनुया!!तुम तो बहोतही ब्युटीफूल😍 लग रही हो ...... तुम्हारा गाउन भी बहोतही सुंदर है.... सबकुछ matching... Matching पर्स और सैंडल भी... Hair style.. नेकलेस सबकुछ परफेक्ट है |
अनुया : थँक्स यास्मिन!! पर ये सब करनेमे मुझे नेहा ने बहोत मदद की....
यास्मिन : नेहा!! मस्त हा... तुम्हारी चॉईस बहोत अच्छि है 👍...
तितक्यात हवेची एक लहर आली त्या सोबत अनुयाच्या हृदयाची धडधड वाढली.... प्रज्वल😍 आल्याची चाहूल जणू त्या हवेच्या लहरीसोबतच अनुयाला लागली....
प्रज्वल आत आला आणि अनुयाकडे बघतच राहिला... अनुया देखील प्रज्वल कडे बघतच राहिली....
प्रज्वल देखील एकदम छान तयार होऊन आला होता...आधीच फिदा असणाऱ्या अनुयाला तो अधिकच आकर्षक वाटत होता...
हॅपी बर्थडे🎂 असं म्हणून प्रज्वलने शेक हॅन्ड साठी हात समोर केला...
थँक्स अ लॉट असं म्हणून अनुयाने देखील लाजतच 🥰प्रज्वलच्या हातात हात मिळवला....
सायली : अनुया!!चल सगळेच जण बँकवेट हॉल मध्ये जमा झाले आहेत आणि तूझी वाट बघत आहेत...
अनुया,प्रज्वल,नेहा सर्वच जण बँक्वेट हॉल कडे गेले....
अनुयाला ईतकं छान तयार झालेलं पाहून तीचे सगळेच वर्ग मित्र आणि मैत्रिणी तिच्याकडे बघतच राहिली.....
बापरे 😳ईतका शो ऑफ...ह्या अनुयाकडे ईतका पैसा आहे का?? अनुयाला पाहून अंजलीचा नुसता जळफळाट🔥 झाला होता....
नेहा :अनुया!!चला केक 🎂कट कर
केक कट केला.. वेटर कट झालेला केक सोबत घेऊन गेला.
तितक्यात कॅफेचा मॅनेजर तिथे आला.... त्याने सोबत माईक आणला....तिथले कराओके सिस्टिम सुरु केलं आणि अनाऊन्स केलं एक खास गाणं आमच्या कॅफे कडून बर्थडे गर्ल साठी...
तितक्यात एक सिंगर तिथे आला.... त्याने बार बार दिन ये आये... अगदीच सुरेल आवाजात गाणं म्हटलं...
पुन्हा कॅफेचा मॅनेजर तिथे आला आणि त्याने तो माईक नेहाच्या हातात देऊन आता तूम्ही एंजॉय करा असे अनाऊन्स केले....
विकी पळत पळतच नेहाजवळ आला....
विकी : नेहा!! दे तो माईक इकडं... बघ मी किती छान गाणं म्हणतो ते....
विकीने गाणं गायला सुरु केलं.....क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो....
कुणीतरी माईक घ्या रे त्याच्या हातातून नाहीतर पार्टी एंजॉय करता येणार नाही... विकीचं बेसुऱ्या आवाजातील गाणं ऐकून प्रज्वल रोहनला म्हणाला....
प्रज्वलचं वाक्य ऐकून सायली विकी कडे गेली... आणि तीने तो माईक घेतला....आणि म्हणाली
एक गाणं खास माझ्या मैत्रिणीसाठी....
सायलीने सुर लावला.... गाणं सुरु झालं... गाणं होतं अधीर मन झाले,मधुर घन आले... धुक्यातुनी,नभातले, सख्या,प्रिया,सरितुनी सुरेल धुंद स्वर हे आले.
काय सुरेल आवाज आहे रोहन!!😉.. रोहनला चिडवत प्रज्वल म्हणाला....
सायली नंतर प्रज्वलच्या हातात माईक गेला.... प्रज्वलने देखील सुरुवात केली...
शायद कभी कह ना सकुंगा तुमको
कहे बिना समझलो तुम शायद
शायद मेरे खयाल मे तुम एकदिन
मिलो मुझे कही पे गुम शायद
यास्मिन : वाह क्या गा रहा है प्रज्वल!! जैसे की दिल की बात कह रहा है |
सायलीच्या सुरातील गाण्याने आणि प्रज्वलच्या रोमँटिक गाण्याने सर्वचजण मंत्रमुग्ध झाले....
तासभर गाण्याच्या कार्यक्रमानंतर नृत्याचा कार्यक्रम झाला...नृत्याच्या वेळेस देखील कुणी आगाऊ पणा करणार नाही याच्याकडे विशेष करून प्रज्वल, रोहन आणि नेहा हे लक्ष देत होते... त्या मुळे सगळं सुरळीत पार पडत होते...
मुलींना हॉस्टेलचे वेळेचे बंधन असल्यामुळे नेहाने कार्यक्रम आवरता घेतला आणि जेवणाची अनाऊन्समेन्ट केली...
जेवणातदेखील चायनीज,व्हेज आणि नॉनव्हेज ची सगळी arrangement होती... विविध प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स होते...
विकी : अनुया!! फक्त कोल्ड ड्रिंक्स??🤔 बाकीचे ड्रिंक्स ठेवले नाही का?
अनुया : बाकीचे म्हणजे??🤔
विकी : कम ऑन ... जसं की तूला माहितीच नाही...बाकीचे म्हणजे... हार्ड ड्रिंक्स??
नेहा : ए विकी!! तूला काय प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला हवंच का??जरा जमिनीवर ये की... पाहावं तेव्हा हवेतच उडत असतो...
विकी : आता काय झालं??🤷♂️
नेहा : तूला ईतके पदार्थ दिसत नाहीत का?
विकी काही बोलणार तितक्यात प्रज्वल त्याला तिथून घेऊन गेला...
क्रमश :
भाग 32 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या