नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
रेक्टर मॅम : आता नेमकी अशी परिस्थिती उद्भवली आहे की ताराच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला आहे..
पोरींनो तुम्ही विचार करा आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकण्यासाठी ठेवलेलं असतं.
शंभर टक्के तुम्ही चुकता असं मी म्हणत नाही... तुमचं वय देखील याला जबाबदार आहे.
पण कसं आहे ना कुठल्या गोष्टींना कुठल्या वेळी किती महत्व द्यायचे हे मात्र आपल्या हातात असते...नाही का?
अनुया : हो मॅम!! हे मात्र तुमचं खरं आहे...
रेक्टर मॅम : म्हणून आपल्या हॉस्टेलचे नियम पाळा... तुम्हाला कडक वाटतील ही कदाचीत पण ते तुमच्या चांगल्या साठी आहेत हे लक्षात ठेवा...
गीतिका : हो मॅम!!
दिव्या : मॅम पण तीने आपलं हॉस्टेल सोडून सहा महीने झाले होते ना....
रेक्टर मॅम : हो... जेव्हापासून आम्ही हॉस्टेल चे नियम कडक केले तेव्हापासून तीने हॉस्टेल सोडलं. आम्ही ताराच्या पेरेंट्स ना वेळोवेळी कळवलं... पण त्यांनी आम्हाला काहीच प्रतिसाद दिला नाही....आता पश्चाताप करून काय फायदा....
दिव्या : ओह....
रेक्टर मॅम : मी माझं काम तर चोख बजावत आहे. पण तुमचं देखील कर्तव्य आहे व्यवस्थित राहण्याचं.... तुम्ही मला तूमची मैत्रीण समजा... काही अडचणी असतील तर मला सांगा... मला सांगण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुमची जी खास मैत्रीण आहे तीला सांगा... जी खास मैत्रीण असेल तीने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे म्हणजे असलं काही विपरीत घडणारच नाही....समजलं ना..
सगळ्या मुलींनी होकारार्थी माना डोलावल्या...
रेक्टर मॅम : बरं अश्या घटना वारंवार या पुढे घडू नये यासाठी आपल्याला काही करता येईल का?
गीतिका : मॅम!! मी एक सुचवू का??
रेक्टर मॅम : हो चालेल ना....
गीतिका : मॅम माझी आई समुपदेशक आहे. आपण तिचं एक मार्गदर्शन पर भाषण ठेऊ शकतो.... आणि माझ्या आईची एक खास मैत्रीण आहे.. ती स्त्री रोग तज्ञ आहे... त्या देखील आपल्याला मार्गदर्शन करतील....
रेक्टर मॅम :वा... का नाही... गीतिका!! तीन आठवड्यानी म्हणजे सतरा तारखेला आपला हॉस्टेल डे आहे... त्या दिवशी तुम्ही हे मार्गदर्शन ठेऊ शकता...तुझ्या आईला सांगून ठेव.....
गीतिका : हो मॅम!!
कॉलेज सुरु होण्याची वेळ झाली आहे.. संध्याकाळी सात वाजता परत एकदा भेटू त्या वेळी तुम्हाला मी हॉस्टेल डे बद्दल सांगेन चला मी निघते...असं म्हणून रेक्टर मॅम त्यांच्या रूममध्ये गेल्या...
कॉलेज सुटल्यावर प्रज्वल आणि अनुया कॅन्टीन मध्ये भेटले....
अनुयाने प्रज्वलला सलमा विषयी आणि त्यांची वॉर्डन सरांनी खरडपट्टी काढली हे सांगितलं...
प्रज्वल :आमचं बरं आहे... आम्हाला असा काही धाक नाही....
अनुया : हं...
प्रज्वल : अनुया!!तु सायली शी बोलली का??
सायलीशी कशाबद्दल... अच्छा रोहन बद्दल ना मी नाही पण नेहा बोलली...असं सांगत अनुयाने सायलीच्या मनात काय आहे ते सगळं प्रज्वलला सांगितलं...
प्रज्वल : अच्छा असं आहे तर....
अनुया : अरे हो तो रोहन रोज किंग झाला होता ना.... कुणी केलं ते समजलं का??
प्रज्वल : नक्की नाही माहिती पण विकी ने अंजली चं नाव सांगितलं....
अनुया :😳 काय?? अंजली?
प्रज्वल : कधी कधी विकी चं बोलणं मला खरं वाटत नाही...
अनुया : हं...ते जरी खरं असलं तरी अंजली देखील एकामागून एक धक्के देतच असते...हे ही तितकंच खरं आहे🙄....अनुयाने तारा बद्दल सकाळी काय काय झालं ते देखील प्रज्वलला सांगितलं...
प्रज्वल : 😳 बापरे... खरंच ती तारा आज कुठल्या परिस्थितीत असेल नाही....
विश्वास आणि श्रावणी आता जरा नियमित भेटायला लागले होते...
श्रावणीने विश्वास बद्दल तिच्या आईवडिलांना सगळं सांगून टाकलं होतं....
श्रावणीचा भूतकाळ बघता तिच्या आईवडिलांनी काहीही अढेवेढे न घेता त्यांच्या नात्याला मान्यता दिली होती...
पण विश्वासच्या घरी थोडं राजकारणी वातावरण असल्यामुळे त्याने त्याच्या घरी सांगण्याची हिम्मत केली नव्हती...
विश्वासच्या गुंडगिरी मुळे तो इंजिनीरिंग पूर्ण करेल की नाही ह्याची त्याच्या आईवडिलांना खात्री नव्हती...त्या मुळे विश्वासने आधी फायनल ईयर इंजिनियरिंग पूर्ण करायचे ठरवले आणि मगच श्रावणी बद्दल घरी सांगायचं असं विश्वासने ठरवले....
ठरल्या प्रमाणे सात वाजता रेक्टर मॅमने मिटिंगला सुरवात केली...
रेक्टर मॅम : चला मुलींनो आपल्याला हॉस्टेल डेचं सेलेब्रेशन करायचं आहे. मला माहिती आहे की तारा सारखी मुलगी तिकडे हॉस्पिटल मध्ये मृत्यू शी झुंज देत असताना या विषयावर बोलणं योग्य नाही. पण आपल्या हॉस्टेल डे ची तारीख ही वरतूनच आल्यामुळे आपल्याला ते साजरा करणं जरुरी आहे.
नेहा : मॅम!!आता ताराची तब्येत कशी आहे??
रेक्टर मॅम : आता तशी ती धोक्याबाहेर आहे...थोडयाच वेळापूर्वी तिच्या वडिलांचा फोन 📳आला होता.माझी माफी मागत होते... म्हणत होते की जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं तेव्हाच ऐकलं असतं तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती....आता तुम्ही तीची काळजी घ्या मी मात्र फक्त ईतकंच त्यांना सांगू शकत होते....
नेहा : अच्छा...
रेक्टर मॅम : बरं आता हॉस्टेल डे बद्दल...तुम्हाला हॉस्टेल डे ला नाटक, स्किट, नृत्य... सोलो आणि ग्रुप मध्ये करायचं आहे..ते असं प्रभावी पणे साजरा करायचं तर आहे.पण तुम्हाला ट्रेझर हंट खेळ ठेवायचा आहे.
अनुया : ट्रेझर हंट म्हणजे लपवलेला कागद शोधायचा वगैरे असंच ना...
रेक्टर मॅम : हं... तसंच काहीसं.. पण यात सिनियर मुली तो गेम अरेंज करतील आणि ज्युनियर मुलींनी ते सगळं शोधून काढायचं.. खरं तर ह्या सगळ्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टी आहेत. पण या गोष्टीतून देखील तुम्हाला काही बोध होईल असं काहीतरी करायचं आहे. तुमचा हॉस्टेल डे सार्थकी लागला पाहीजे....
क्रमश :
भाग 54 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या