एका चाळीशीच्या आसपास असलेल्या महिलेला अगदी बेशुद्ध अवस्थेत काही लोक घेऊन आले होते.
सोबतच्या लोकांनी एकच गदारोळ केला होता.
मी तेव्हा स्री रोग विभागात स्त्री वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
एका प्रसूती होत असलेल्या स्त्री ला तपासून कर्तव्यावर असलेल्या पारीचारीकेला आवश्यक त्या सूचना देत होते.
लोकांचा गदारोळ ऐकला आणी मी लागलीच त्या बेशुद्ध स्त्री कडे पळाले.
तीला तपासले असता असे लक्षात आले की तीला मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता.
गळ्या भोवती आवळलेल्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.तसेच अंगावर काही जखमा ही दिसत होत्या.
मी उपचार सुरू केले,तिला ऑक्सीजन लावला.रक्तस्राव ही खूप झालेला होता.सलाईन इंजेक्शन वगैरे सुरू केले. आवश्यक त्या तपासण्या करून मग सोबत असलेल्या लोकांना तिच्या बद्दल विचारले. तर त्या पैकी एकही व्यक्ती तिला ओळखत नव्हती.
त्या लोकांनी सांगितले की ती आमच्या शेतात आम्हाला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली.
तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे असे जाणवले म्हणून आम्ही पळत तिला रुग्णालयात घेऊन आलो.
मी नियमानुसार लागलीच पोलिसांना कळवले की एक अनामिक स्त्री अश्या प्रकारे बेशुद्ध अवस्थेत रूग्णालयात दाखल झालेली आहे.पोलिसांना देखील ती स्त्री कोण आहे याचा सुगावा लागत नव्हता.
आता फक्त ती शुद्धीवर येण्याची वाट पहावी लागणार होती.दूसरा काही पर्यायच नव्हता.
दरम्यान ती उपचारास प्रतीसाद देऊ लागली होती. तिच्या सोबत कुणीच नसल्याने दवाखान्यातील सेवक,पारीचारीका आणी वैद्यकिय अधिकारी विषेश लक्ष देत होतो.जनू ती सर्वांच्या घरातील एक मेम्बर होती.आणी अचानक ती शुद्धीवर आली.सगळे ईतके खूष झाले.सर्वांच्या प्रयत्नांना यश आले होते. सगळीकडे एकच धावपळ सुरू झाली. सर्वच जन उत्सुक होते तिच्या सोबत काय झाले असेल जाणून घेण्यासाठी.तीने बोलण्यास सुरूवात केली.तीचे नाव चंद्रभागा सांगितले.नुकतीच पंधरा दिवसांपूर्वी तिची प्रसूती झाली होती.पण ती तीच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत काहीच बोलत नव्हती.पोलिसांना देखील तिला काहीच आठवत नाही असे दाखवत होती.तितक्यात तिच्याच गावातील एक माणूस तिच्या शेजारील रूग्णाला भेटायला आलेला होता.त्याने तिला लागलीच ओळखले. त्याने तिला स्वतःची ओळख सांगितली.तीने त्याला ओळखले आणी माझे बाळ कसे आहे असे विचारले.
त्याने सांगितले की ते बाळ आता या जगात नाहीये.
हे ऐकताच ती दोन मिनिटे स्तब्ध झाली. आणी एकच टाहो फोडला. मला पोलिसांना काही सांगायचे आहे असे बोलू लागली.मग पोलिसांना बोलावण्यात आले.
आणी तीने स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली. तीला पहिल्या पाच मुली होत्या. आणी आता सहावी देखील मुलगीच झाली होती.आणी तिला सगळ्या मुलीच होत होत्या म्हणून तीचा नवराच तिचं बाळ मारण्याचा करत होता.
ती विरोध करत होती तर तूला मुलीच कस काय होतात तुला पण जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही असे म्हणत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.आणी तीचा जीव गेला असे समजून तीला तसेच सोडून देण्यात आले होते.
तीने पण जेव्हा तीच्या बाळा बद्दल कळाले तेव्हाच तोंड उघडले.आईचं ह्रदय ते.मला तर तिच्या नवऱ्याच्या अज्ञानाची किव करावीशी वाटली.तीची खूप दया आली. (टीप:मूलगा किंवा मुलगी होणार हे वडिलांचे गूणसूत्र ठरवते) पण ती किती पक्की होती, स्वत:वर झालेल्या हल्ल्याबाबत एकही शब्द बोलायला तयार नव्हती.
नवऱ्याला पोलिस कोठडी होईपर्यंत ती मात्र रूग्णालयातच सुरक्षित होती.
डॉ सुजाता कुटे.
नवऱ्याला पोलिस कोठडी होईपर्यंत ती मात्र रूग्णालयातच सुरक्षित होती.
डॉ सुजाता कुटे.
0 टिप्पण्या