.. आता राज्य राखीव पोलीस बल इथे वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे आधीच्या कामापेक्षा आता नवीन कामाची पद्धत होती...
एव्हाना मी इथे रूळले होते...
जे आपल्या राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी तत्पर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना समजून घेण्याचं भाग्य मला लाभलं...🙏
त्यांना पाहून आपण खरंच किती नशीबवान आहोत...
कारण त्यांच्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत याची जाणीव देखील झाली...
वाटलं की खरंच यांच्यामुळे आपलं जगणं किती सुकर झालं आहे ना...
त्यांना मात्र कुठल्याही क्षणाला कुटुंब सोडून बंदोवस्तासाठी पळावं लागतं...
तसंच एका कामाचा भाग म्हणून.. मला अगदीच सकाळी सहा वाजता सुरक्षा रक्षक भरतीसाठी भरती होत असताना जर काही emergancy निर्माण झाली तर त्यावर उपचार करण्यासाठी मला हजर राहावे लागे...
भरती सुरू झाली.... त्या भरती मध्ये पगार अठरा हजार....
एवढा पगार असून देखील सरकारी नौकरी असल्यामुळे.. व देशासाठी जीव देण्याची तयारी असल्यामुळे....तब्बल अडीच हजार विद्यार्थी भरतीसाठी आले होते....
त्यातून काही दोन अंकी विद्यार्थ्यांची निवड होणार होती...
भरतीमध्ये प्रामुख्याने त्यांची वजन, उंची, छाती आणि इतर काही महत्वाचे parameters बघितले जातात...
आता तुम्हाला वाटेल की मी हे तुम्हाला सगळं का सांगत आहे... आम्हाला काय करायचं आहे...तर तसं नाही...
खरा अनुभव तर पुढे आहे... तर झालं असं... अचानक एक जण एकामागे एक खूप उलट्या होत आहेत म्हणून त्याला आणलं गेलं...
Vital parameter चेक केल्यावर त्याला dehyadration झाल्याचे लक्षात आले...
तसे त्याचे ब्लड प्रेशर नॉर्मल होते...
पण hydration मेन्टेनसाठी ताबडतोब iv लावले....
Iv संपल्यावर तो पूर्ववत झाला.. मग मी त्याला त्याची पर्सनल हिस्टरी विचारली... पर्सनल म्हणजे की जी हिस्टरी मेडिकल रेलटेड नाही.... तर तो कुठून आला.. कुठे थांबला वगैरे....
तो नांदेड जिल्ह्यातून आला होता... रात्री ग्राउंड वर झोपला होता... दिवसभर प्रवास करून संध्याकाळी ग्राउंड वर अन सकाळी वजन 60 kg भरण्यासाठी डझनभर केळी खाल्ल्या होत्या... परिणामी त्याला अपचन झाले आणि उलट्या झाल्या होत्या...
भरती प्रक्रियेत सर्वात महत्वाचे असते ती त्यांची शरीरयष्टी.... त्यांचे वजन... साठ किलो भरायला हवे..सोबत त्यांची running ऍक्टिव्हिटी... त्यात त्यांना 1600 मीटर धावायचं होतं...
व जो हे अंतर अगदीच चार मिनिटात कव्हर करेल त्याला पैकीच्या पैकी मार्क आणि त्या पेक्षा वेळेनुसार मार्क्स कमी...
सहा मिनिटाच्या पुढे zero मार्क्स...
स्पर्धा अगदी सकाळी सकाळी सुरू होते... त्यामुळे विद्यार्थ्यांना हजर राहताना आदल्या दिवशी हजर राहावे लागते ते ही स्व खर्चाने ....
अडीच हजार विद्यार्थी...
प्रत्येक जण स्वतःची राहण्याची सोय हॉटेल किंवा नातेवाईकांकडे करू शकत नाही....
काही जणांची परिस्थिती इतकी हलाखीची असते की त्यांना मुक्काम कुठे करायचा हा प्रश्न असतो... उघडया मैदानावर झोपतात...
विचार करा... त्यांना उघड्या मैदानावर रात्रभर झोप लागत असेल का....
दिवसभराचा प्रवास, थकवा, अशा प्रकारची झोप...
आणि सकाळी उठल्यावर सकाळच्या सर्व विधी उरकण्याचा देखील
स्पर्धेला सुरुवात होते.... त्यांची वजनाचे मोजमाप सुरू होते....
ज्या ज्या विद्यार्थ्यांचे वय एखादा किलो कमी असेल.... ते विद्यार्थी सकाळी डझनभर केळी खाऊन वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात....
बऱ्याच जणांना तर अनवाणी पायांनी पळायची सवय असते.....(दगड, गोटे, काटे टोचत असतील ना )
सोबत व्यवस्थित टी-शर्ट नाही... बनियन ही नाही... अशा अवस्थेत... उघड्या अंगाने.... कारण त्यांचा स्पर्धक क्र हा छातीवर लिहिला जातो...
व फक्त शॉर्ट्स घालून ... ही रनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात....
आता तुम्ही विचार करा... काय अवस्था होत असेल त्यांची...ह्या सर्व दिव्यातुन प्रत्येक स्पर्धकाला जावं लागतं....
मग उलट्यासारखे प्रकार होणार नाही तर काय होणार.... पण त्यांना तरी काय म्हणावं...
परिस्थिती समोर तेही हतबल झालेले असतात.....
त्यांना पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते.... खरंच आपण त्याच्यापेक्षा किती सुखी आहोत.... त्यांचे स्ट्रगल पाहिल्यानंतर आपले स्ट्रगल कमीच वाटते ना....
हिच खरी सत्वपरीक्षा आहे... हो ना
©®डॉ सुजाता कुटे
©®swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
Good job 👏 👍 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा