डॉक्टर डायरी (केस नंबर 1)

डॉक्टर वैदय तुम्हीच का?

 वैद्य हॉस्पिटलमध्ये,डॉक्टर वैद्यच्या केबिनमध्ये दोन-तीन पोलिसांची टीम आणि पीएसआय सोबत आले आणि डॉक्टरांना विचारू लागले...

 डॉक्टर वैद्य : हो हो मीच डॉक्टर वैद्य... पण तुम्ही असे एकदम कसे काय माझ्या केबिनमध्ये आले आहात... माझे पेशंट बघणे चालू आहे ना...

 पीएसआय : आम्ही एका केसच्या संदर्भात तुमच्याकडे आलो आहोत....

 डॉक्टर वैद्य : ठीक आहे.. तुम्ही पलीकडे सोफ्यावर बसा... मी माझा इतका पेशंट बघतो... आणि तुमच्याकडे येतो...

 असं म्हणून डॉक्टर वैद्यने शांतचित्ताने आपला पेशंट तपासला....

 पेशंट केबिनच्या बाहेर गेल्यावर...
डॉक्टर वैद्य... पी एस आय ला म्हणाले...

सॉरी... पण तुमची ही अशी येण्याची पद्धत योग्य नाही....
माझी आणि माझ्या हॉस्पिटलची मानहानी होते...बरं तुम्ही आले तर आले....टीम समवेत आले... जसं की मला अटक करायलाच आले आहेत?

 पीएसआय : उलट तुम्ही आम्हाला धन्यवाद म्हणा.. की त्या पेशंट समोर आम्ही  तुमच्या बाबतीत अटक हा शब्द वापरला नाही....

आणि बरोबर ओळखलंत आम्ही तुम्हाला अटक करायलाच आलो आहोत....

 डॉक्टर वैद्य : अटक करायला?? पण का... अशात तर माझ्या हॉस्पिटलमध्ये असं काहीच घडलं नाही... मग कशासाठी...
मला वॉरंट दाखवाल प्लीज 

 पीएसआय : हे बघा....

 पीएसआय ने डॉक्टर वैद्यंना वॉरंट दाखवला...

 अरे हो खरच की.... काय कारण आहे? क्रिमिनल निग्लीजन्स...मला असं काहीतरी दिसत आहे... मी काय क्राईम केलं? चला आता जाऊन बघावं लागेल....

डॉक्टर वैद्य : ठीक आहे... मी सोबत येतो... असं म्हणून  डॉक्टर वैद्य नी ताबडतोब हॉस्पिटल बंद करण्याच्या रिसेप्शनिस्ट ला सूचना दिल्या...

 बाह्य रुग्ण विभागातील वेटिंग मध्ये असणाऱ्या पेशंटला जर इमर्जन्सी असेल तर दुसऱ्या डॉक्टरला दाखवा..व मलाच दाखवायचे असेल तर पुढच्या आठवड्यात या अशी सूचना केली...

पोलिसांच्या परवानगीनेच त्यांनी त्यांच्या वकिलाला फोन लावला आणि पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले....

 त्यानंतर डॉक्टर वैद्य  पोलिसांच्या गाडीत पोलिसा समवेत पोलीस स्टेशनला पोहोचले....

 तिथे पोहोचल्यानंतर त्यांना दोन दिवसापूर्वी एका दीड वर्षाच्या बाळाला तपासण्यासाठी  घेऊन आलेल्या मनुष्य दिसला....

 त्याला पाहताच  डॉक्टरांना.. त्या बाळाची आठवण झाली.... त्या बाळाला सर्दी ताप खोकला होता.... डॉक्टरांनी त्या बाळासाठी काही औषधे लिहून दिली होती....

 पण तो मनुष्य...  डॉक्टरांना मी परिस्थितीने खूप गरीब आहे... औषधी घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही... आणि माझ्या बाळाला अधून मधून खूप जास्त ताप येतो....

 असे म्हणून रडून विनंती करत होता....

डॉक्टर वैद्यना त्याची दया आली व त्यामुळे डॉक्टरांनी एकतर त्या बाळाला तपासण्याची फीस तर घेतली नाही व स्वतः जवळ असणारे  एमआर ने दिलेले सॅम्पल त्या बाळाच्या उपचारासाठी दिले.....

 हे सर्व आठवल्याने  पोलीस स्टेशनला असताना देखील त्या बाळाच्या वडीलाजवळ बाळा विषयी डॉ वैद्य नी चौकशी केली...

 बघा साहेब हा डॉक्टर कसा नाटक करत आहे.... एक तर माझ्या बाळाला मारून टाकलं... अन आता विचारत आहे की तुमचं बाळ कसं आहे म्हणून ..... त्या बाळाचे वडील पोलिसांना म्हणाले....

 त्या बाळाच्या वडिलांचं ते वागणं बघून... डॉक्टर वैद्य एकदम गोंधळून गेले....

 काय? मी 🤔.....त्या बाळाला मारलं आणि ते कसं?

 पीएसआय : तुम्ही म्हणे  जे औषधाचे  सॅम्पल दिले... ते विष होते....?

 डॉक्टर वैद्य : काय? विष... कसं शक्य आहे.... अहो सर....मी सॅम्पल जरी दिलं... तरी ते सील बंद होतं ना... विष कसं असेल ?

आता मला लक्षात येत आहे.. मला तुम्ही का इथे आणलं आहे ते....

 इतक्यात डॉक्टर वैद्यचे वकील आले... आणि त्यांनी  जामीन मिळवून देण्याची प्रोसिजर पूर्ण केली....

 वकील : माझा आशिल निर्दोष आहे... तुम्ही मात्र आता हा काय प्रकार आहे तो लवकर शोधून काढाल... अशी अपेक्षा करतो...

आणि काय राव तुम्ही  एका प्रतिष्ठित माणसाला आणण्यासाठी एखाद्या आरोपी सारखं आणता?

 पीएसआय : आरोपच तसे होते....आम्ही तरी काय करणार? आम्ही फक्त आमचं काम केलं?

वकील : बरं बरं.... आमचा आशील नक्कीच उपस्थिती देईल... पण त्यांना जरा मानाने वागवाल ही अपेक्षा...

 असं म्हणून दोघांनी तिथून रजा घेतली .....

 डॉक्टर वैद्य : काय झालं असेल बरं? मी तर व्यवस्थित औषधी दिली होती...मग असं?

 बाळाचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले.... आणि ते पाहून सगळ्यांना धक्काच बसला....

 रिपोर्ट असा होता... की बाळाला उंदीर मारण्याचे विष देऊन मारण्यात आलं होतं... आता पोलिसांचा संशय  बाळाच्या वडिलांवर  बळावला.....

 पोलिसांनी चौकशीसाठी म्हणून बाळाच्या वडिलांनाच ताब्यात घेतले.... सुरुवातीला  काहीही न बोलणारे बाळाचे वडील.. थर्ड डीग्री पडल्यावर पोपटासारखे बोलायला लागले....

 हो मीच मारलं आहे बाळाला .....

पीएस आय : पण का? आणि पोस्टमार्टमच्या पंचनाम्यात तर बाळाचे वडील म्हणून तुमचं नाव नाही... तुमचं आडनावही नाही...  म्हणजे तुम्ही बाळाचे वडील नाहीत?

  तो माणूस : हो साहेब मी त्या बाळाचा वडील नाही....
मी वडील बनून हॉस्पिटलला औषध आणण्यासाठी गेलो होतो....
मला वैद्य डॉक्टरांचा स्वभाव माहित होता...
आपण थोडं रडलं पडलं की ते त्यांच्या जवळचं सॅम्पल देतील म्हणून मी त्यांच्याजवळ गरिबीचं नाटक केलं.... योगायोगाने माझ्या प्लॅन प्रमाणे डॉक्टरांनी त्यांच्या जवळचे  सॅम्पल मला दिले.... 
 
पीएस आय : वारे वा.... ज्याचं करावं भलं ते म्हणतात आपलंच खरं.... ग्रेट... पण त्या बाळाला मारण्याचे कारण काय...

 तो माणूस : ते बाळ माझं नाही... चंदाचं आहे... चंदा आणि मी  लग्न करणार होतो... पण त्या बाळामुळे करता येत नव्हतं....

 कारण मला दुसऱ्याचे मूल नको होतं....
चंदाचा नवरा दोन वर्षांपूर्वीच अपघातात गेला होता....

चंदा डिलिव्हरी साठी माहेरी आली... सासरच्यांनी तिला परत घरात घेतलं नाही....
 तिचं आणि माझं सूत जुळलं...
या बाळाची विल्हेवाट लावण्यासाठी मी हा प्लॅन आखला.... औषधांमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून  बाळाला पाजले..

पीएसआय : अरे मुर्खा.... तुला काय वाटले... की तू मस्त मज्जा मारशील... पकडला जाणार नाहीस.... तसं नसतं...

पण कमाल आहे...यात त्या बाळाचा काय दोष होता ....
तू जर तुझं मन मोठं केलं असतं...  तर तुला लोकांनी आज आदर्श मानलं असतं... पण आता तू केवळ एक आरोपी... चंदा सोबत आयुष्य जगायचं तर दूरच राहिलं...

 गुन्हेगाराचा गुन्हा झाला... पोलिसांनी त्याला पकडले ही... पण... डॉक्टरांना मात्र अति चांगुलपणा नडला... सांगा डॉक्टरांनी वागायचं कसं?
©®डॉ सुजाता कुटे
©®swanubhavsaptarang 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. छान लेख आहे 👍👍👍
    Doctor नी वागायचे कसे ❓
    Don't warry Dr ने चांगल्या भावनेतून मदत केली होती हे शेवटी police च्या तपासातून निष्पन्न झाले...

    उत्तर द्याहटवा
  2. छान लेख आहे 👍👍👍
    Doctor नी वागायचे कसे ❓
    Don't warry Dr ने चांगल्या भावनेतून मदत केली होती हे शेवटी police च्या तपासातून निष्पन्न झाले...
    🙂🙂🙂
    -विजय घुगे

    उत्तर द्याहटवा
  3. चांगलं काम करतेवेळी एखादी वेळी थोडीशी अडचण येते पण खरं काय ते कळत असते

    उत्तर द्याहटवा