पालकांनो आता तरी जागे व्हा

अनु ने आपली पर्स चेक केली, हे काय एकदम ठणठणाट,अनु मटकन खाली बसली. दुसरा महिना होता,अनुच्या पर्स मधून पैसे गायब झालेले होते.तेहीअजून पूर्ण महिना बाकी होता.
अनु इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षाला होती. ती हॉस्टेल मध्ये राहत होती. परिस्थिती साधारण होती.तिचे आईवडील एक छोटेसे किराणा दुकान चालवत. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. अनु हुशार होती. तिचा गुणवत्तेनुसार सरकारी इंजिनीरिंग कॉलेज ला नंबर लागला होता. कॉम्प्युटर ब्रांच मिळाली होती.सर्व काही व्यवस्थित चालू असताना आता तीला व तिच्या वसतिगृहातील  मैत्रिणींना दर महिन्याला एका नवीन आव्हानाला सामोरे जावं लागत होतं."दर महिन्याला कुठल्याही मुलींच्या आईवडिलांनी खर्चासाठी पैसे दिले की ते दोन दिवसात चोरी होत होते."
"चोर मात्र सापडत नव्हता "खूप शोधण्याचा प्रयत्न झाला,पण व्यर्थ.....
आता मेस चा एक वेळचा डब्बा खायचा पण घरी आईवडिलांना काहीच कळू द्यायचे नाही, असे अनुने ठरवले. कित्येक रात्री तिने फक्त पाणी पिउन काढल्या. त्या चोराचा तिला खूप राग येत होता पण ती काहीच करू शकत नव्हती.
आज तर अतिरेक झाला चोराचा, अनुच्या मैत्रिणीचे पूनम चे परीक्षा फीस चे पैसे चोरले. आता मात्र अनुच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने चोराचा छडा लावण्याचे ठरवले. कुणाच्याही नकळत ती सर्वावर पाळत ठेऊ लागली. तिला लक्षात येत होते की चोर हा आपल्याच वसतिगृहातील आहे. फक्त कोण आहे ते आपल्याला शोधून काढायचे आहे. आपण फास्टर फेणे झालो असे क्षणभर वाटून अनु मनोमन सुखावली.
वसतिगृहातील प्रतीमा आणी तिची रूम पार्टनर दिव्या या दोघींचा अचानक गोंधळ सुरु झाला.
अनुने कान टवकारलें,काय गोंधळ सुरु आहे ते जाणून घेण्यासाठी....
दोघींच्या ही पैश्यांची चोरी झाली होती, दोघी खूप रडत होत्या, आता कसे होणार आपले "माझी तर फीस भरायची बाकी आहे असे दिव्या म्हणत होती "तर माझे मेस चे पैसे भरायचे असे प्रतीमा म्हणत होती.

अनु लगेच शोधमोहिमेकडे निघाली, कसं काय जाणून घेण्यासाठी, प्रतीमा आणी दिव्याला विचारले, पैसे चोरी कसे झाले? दिव्या म्हणाली मी माझ्या सुटकेस मध्ये लॉक करून ठेवते. लॉक काढून चोरी झालीये. तर प्रतीमा म्हणाली, पैसे चोरी होत आहेत म्हणून मी दिव्याला सुटकेस मध्ये ठेवायला दिले होते. अनु म्हणाली काळजी करू नका लवकरच आपण चोराला पकडू.
अनु सगळ्या चोऱ्यांना वारंवार आठवत होती, कसं झाला,काय झाला आणी टॉक..... तिला एकदम क्लिक झाले.
अरे आपण असा विचार का नाही केला, करणार तरी कसा तो चोर किती श्रीमंत आहे. जिथे आपल्याला महिन्याला दोन हजार रुपये खर्चायला मिळतात हिला पंधरा हजार पण पुरत नसतील का? पण ती तर स्वभावाने खूप मन मिळाऊ होती. सगळं काही होतं तिच्या कडे.नक्की तीच ना,
चोर तर कळलाय पण आता त्याच्या कडनं कबूल कसं करून घ्यायचं.... आणी जर माझा अंदाज चुकला तर? तिने असे केले नसेल तर.....
 अनुला एक छानशी कल्पना सुचली,तिने संपूर्ण वसतिगृहात पसरवले की तीला चोर कोण आहे हे कळाले आहे.आणी चोवीस तासाच्या आत जर तिने सर्वांसमोर कबूल नाही केले तर तिचे नाव कॉलेजच्या नोटीस बोर्ड वर लावण्यात येईल. मग त्यानंतर होणाऱ्या बदनामीला ती जबाबदार राहील.
साहजिकच चोर हे ऐकून बिथरला,थरथर कापायला लागला. आणी मग तो चोर अनुला भेटायला आला.
अनु म्हणाली बोल प्रतीमा का चोरी केलीस तू? प्रतीमा म्हणाली पण तुला कसे कळाले मी चोरी केली.
सोप्प आहे, अगं दिव्या च्या सुटकेस चे कुलूप दिव्या शिवाय फक्त तूच उघडू शकत होती. तिची रूम पार्टनर असल्या कारणाने, आणी दिव्या स्वतःच्या सुटकेस मधनं चोरी कशी करेल? आता सांग का केलस हे?
प्रतीमा बोलायला लागली, माझे आईवडील दोन्हीही कॉम्प्युटर इंजिनिअर, दोघांची कमाई अगदी लाखोंच्या घरात, मला कसलीच कमी नाही, पण मला इंजिनिअर व्हायचं नव्हतं. मला संगीत क्षेत्रात माझे करियर करायचे होते. माझे ऍडमिशन इथे झाल्यापासून माझे कशातच मन रमत नव्हते. इथे मी मित्र मैत्रिणी पार्ट्या यात देखील मन रमवायचे प्रयत्न केले. पण नाही जमले.

"म्हणून तू चोरी करायला लागलीस " अनु रागाने म्हणाली, अगं काहीजणांच्या परीक्षा फीस होत्या, तूला कसं काही वाटलं नाही.
प्रतीमा:"मला मज्जा वाटायची, या पैश्यांमध्ये मी मित्र मैत्रिणीसाठी गिफ्ट घ्यायचे"
अनु :थांब आता मी प्रिन्सिपॉलला सांगते
नको नको मी सगळ्यांचे पैसे परत करते पण प्रिन्सिपॉलला तू सांगू नकोस असे प्रतीमा विनवणी करत होती
अनु :ठीक आहे पण मला एकदा तूझ्या आईला बोलू दे.घाबरू नकोस मी तूझ्या आईला व्यवस्थित बोलेल.अनु ला एव्हाना हे लक्षात आले होते की प्रतीमाची वाटचाल ही मानसिक आजाराकडे चालली होती. आणी हे तिच्या आईला वेळेवर कळणे गरजेचे होते.
अनुने प्रतीमा कडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला व फोन केला काकू तुम्ही एकदा कृपा करून वस्तीगृहावर याल का?
प्रतिमाची आई :मला सुट्टी नाही, मी येणार नाही.
अनु:काकू आज जर तुम्ही इकडे वसतिगृहात आले नाही तर तुम्हाला न आल्याचा पश्चाताप होईल.
प्रतीमा ची आई काही यायला तयार नव्हती, शेवटी अनुने घडलेली सर्व हकीकत प्रतिमाच्या आईला फोन वर सांगितली.
प्रतिमाची आई धावत पळत वसतिगृहात आली आणी म्हणाली तीची कृपा करून कंप्लेंट करू नका मी तुमचे सर्व पैसे परत करते.
अनु :काकू कृपा करून तुम्ही आणी प्रतीमा समुपदेशन करून घ्या जेणेकरून पुन्हा असे घडणार नाही, ती खूप चांगली आहे पण प्रतीमाने जे काही केले ते मानसिक तानाने
©®डॉ सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या