"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी "

माझी सरकारी दवाखान्यात सकाळी 8ते संध्याकाळी 8 ड्युटी डाॅक्टर म्हणून ड्युटी चालू होती.
अंदाजे संध्याकाळी सहा वाजता एका नवविवाहित तरूणीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.तीला तिचे नातेवाईक घेऊन आले होते. सोबत तिचा नवरा आणी सासू सासरे होते.
मी लागलीच वेळ न दवडता उपचार सुरू केले. ती ईतके विष प्याली होती की ते विष काढण्याचा खूप खूप प्रयत्न केला. तीला विष उतरण्याचेऔषध (एन्टीडोट) ही देण्यात आले. ईतर तज्ञांना हि बोलावण्यात आले होते. तिला ईन्टयूबेट करण्यात आले.तीची प्रकृती चिंताजनक असल्याची नातेवाईकांना कल्पना देण्यात आली होती. दरम्यान पोलिसांना कळविण्यात आले होते.
पण माझी सगळी मेहनत व्यर्थ गेली.मी तीला वाचवू शकले नाही. तिचा मृत्यू झाला. मी हताश झाले.तिच्या नातेवाईकांनी काय ते समजून घेतले. तिच्या आई वडिलांना कळवण्यात आले होते.ते देखील ईकडे दवाखान्यात यायला निघाले होते.
एकच आक्रोश ऐकू येत होता. मला ते सगळे असह्य होत होतं.आई वडील आले खूप  आक्रोश वाढला.मलाही छातीत कसं कसं होत होते.
त्यानंतर तिचे पोस्टमोर्टम होणार होते कारण ती केस हूंडा बळी ची होती.
त्या काळात नियमानुसार रात्री पोस्टमोर्टम करत नसत म्हणून सकाळी 6 वाजता पोस्टमोर्टम करण्याचे ठरले.
पोलिस पंचनामा चालू झाला आणी आता मला नाण्याची दूसरी बाजू समजली.मी अवाक झाले. मुलीच्या आई वडिलांनी धिंगाणा सुरु केला. मला सुरुवातीला वाटले  मुलगी गमावली त्यानी. दुःख तर होणार. त्यांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. ते सासरच्या लोकांसोबत भांडण करत होते. म्हणत होते  तूम्हीच मारली तीला मी आता तुम्हाला सोडणार नाही. आणि बोली सुरू केली.ती अशी,मी हूंडा 2 लाख रुपये दिले आणि लग्नाचा खर्च हि 2 लाख रुपये आला. सासरचे लोक श्रीमंत होते. ते म्हणाले तूम्ही 4 लाख रुपये लावले मी 5 लाख रुपये देतो.पण हे कोर्ट कचेरी ही भानगड नको. मग काय आई वडिलांनी ती रक्कम घेतली आणि थोडया वेळाने वातावरण शांत झाले. मी सकाळी 6 वाजता पोस्टमोर्टम केले आणी  7 वाजता नातेवाईकांना शव घेऊन जाण्यासाठी सांगीतले. पण आता काय आई वडिल तर तिकडच्या तिकडेच निघून गेले होते.आणी सासरच्या लोकांनी लोक लज्जास्तव ते सकाळी 10 वाजता नेले.मी तर हे सगळे पाहून अगदीच सुन्न झाले.काहीच कळत नव्हते. कालचा आक्रोश खरा होता की कालची बोली? आईवडीलच होते ना ते.? असे कसे वागू शकतात?

 हा ईथे मांडण्याचा हेतू इतकाच की यावर चर्चा व्हावी आणी अशा गोष्टी मधून आपल्याला असे काही ज्ञान व्हावे की जेणेकरून पुन्हा एखादी नवविवाहित स्त्रि असे टोकाचे पाऊल उचलण्या आधी हजार वेळा विचार करेल.
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

 

©®डॉ सुजाता कुटे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या