जीवनगाणे गातच राहावे..... जीवनगाणे.. असे गुणगुणत तृप्ती तयार होत होती. आज तिला बघायला विवेक येणार होता.
विवेक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणी एका नामांकित कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर होता. तसेच त्याला एक डॉक्टर बहीण आणी त्याचे शिक्षक आईवडील असा एकंदर सुशिक्षित परिवार होता.
तृप्ती प्रत्येक क्षणाला विवेकचाच विचार करत होती, कसा असेल दिसायला, आपले स्वभाव मिळतील का? मी त्याला आवडेल ना? हुंडा वगैरे मागतील का? अश्या असंख्य प्रश्नाने तिच्या मनात घर केलं होतं. त्याच तंद्रीत असताना दरवाजाची बेल वाजली टिंग टॉंग... आणी तृप्ती भानावर आली.
अरे आपण तयार ही नाही झालो आणी पाहुणे आले की काय? हुश्श.. जे मध्यस्थ होते ते घरी आले होते तृप्तीने सुस्कारा सोडला.
लगेचच तृप्ती तयार होण्यासाठी ड्रेसिंग रूम मध्ये गेली. तीने आकाशी रंगाची सिन्थेटिक साडी नेसली साडीला गुलाबी रंगाची नखी. तिच्या गोऱ्या रंगावर खूपच खुलून दिसत होती. लांबसडक केस ते पण एकदम सरळ एका बाजूने फिक्कट गुलाबी रंगाचा गुलाब माळलेला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप. गुलाबी रंगाची मॅचिंग लिपस्टिक. अगदी नजर हटणार नाही इतकी सुंदर ती दिसत होती.
इतक्यात पुन्हा बेल वाजली टिंग टॉंग.... विवेक त्याची बहीण समीक्षा आणी आईवडील असे सगळेच जण तीला बघायला आले होते.
तृप्तीचे हृदय खूप धडधड करत होते. कसं जाऊ समोर? जी व्यक्ती मध्यस्त होती तिने बाहेर हॉल मध्ये तृप्तीला बोलावले. तृप्तीच्या आईने हातात पोह्यांचा ट्रे दिला. तृप्ती ने ट्रे हातात घेताच तिचे हात थरथर कापायला लागले. कसाबसा तो ट्रे सांभाळत तिने सगळ्यांना पोह्याच्या प्लेट दिल्या आणी विवेकला प्लेट देताना चोरट्या नजरेने त्याला बघितलं... Wow अगदी मनातल्या कल्पनेपेक्षाही देखणा, राजबिंडा... ती बघतच राहिली...कुणीतरी पाणी मागितले आणी तृप्ती भानावर आली. तीच्या मनात आनंदाची लहर होती.
इकडे विवेक तीची हॉल मध्ये येण्याची वाट पाहात होता... तीची entry झाली आणी तिला बघताच तिच्या सोन्दार्यावर पाहता क्षणीच विवेक तिच्या प्रेमात पडला. मनातल्या मनात.. पहीला पहीला प्यार है गाणं गुणगुणायला लागला.
दुसऱ्याच दिवशी तृप्तीच्या वडिलांचा फोन खणखणला. घरातील सगळ्यांनीच त्यादिशेने कान टवकारले, तृप्ती विवेक ला पसंत आहे असा तो फोन.. हे एव्हाना सगळ्यांना समजले होते.सगळे हर्षोत्सव साजरा करत होते. तृप्तीचे अभिनंदन करत होते. तृप्ती ही लाजून एकदम चूर झाली होती.
लग्नाची तारीख ठरली. थ्री स्टार हॉटेल मध्ये लग्न करायचं ठरलं. खर्च दोघांनी अर्धा अर्धा वाटून घ्यायचा ठरला. आपापला मानपान, आपापला बस्ता घ्यायचं ठरले म्हणजे कुणी नाराज होणार नाही. साखरपुडा, हळद आणी लग्न असं दोन दिवसात उरकायचे ठरले. पत्रिका वाटप झाल्या.
साखरपुडा झाला. मेहेंदी आणी हळद असे एकामागे एक प्रोग्राम रंगत होते. ती घटिका जवळ आली. लग्न लागायला एक तास बाकी होता तितक्यात विवेक म्हणाला मला तुम्हाला सगळ्यांना काही सांगायचं आहे. तृप्ती आणी तिच्या वडिलांना एकदम धस्स झालं... आणी काय आता?
विवेक म्हणाला माझे एका मुलीवर खूप प्रेम आहे. जरी आपले लग्न झाले तरी मी तिच्यावर प्रेम करत राहणार. आणी तिला नियमित भेटत राहणार. हे जर मान्य असेल तर मी बोहल्यावर चढेन. तृप्तीने हे ऐकल्यावर तीची एकदम कानठळी बसली. असं कसं काय? तृप्तीचे वडील तर तिथे असलेल्या खुर्चीवर मटकन बसले. हे असे कसे.?
विवेक म्हणाला तृप्ती ती मुलगी कोन आहे हे नाही विचारणार? ओल्या डोळ्यांनी आणी रागाने तृप्ती ने विवेक कडे बघितलं.
त्याने बोट दाखवलं विहान तृप्तीचा भाऊ त्याच्या कडेवर त्याची दीड वर्षांची मुलगी साक्षी होती तिच्याकडे... आणी तृप्ती पटकन उठली आणी चटकन विवेक जवळ आली आणी लडिवाळपणे त्याला मारू लागली. सगळीकडे एकच हशा पिकला.
विवेक म्हणाला तूझ्या आणी सासरेबुवांच्या चेहऱ्यावर लग्नकार्याचे खूप टेन्शन दिसत होते. म्हटलं थोडंसं वातावरण हलकं करावं.
आता तृप्ती च्या वडिलांची काळजी मिटली होती. त्यांचं मन म्हणत होतं विवेक तृप्तीला अगदी आनंदात ठेवेल.
आणी अश्या रीतीने खुशीखुशीने त्यांचे लग्न पार पडले. आली लग्नसमीप घटिका....... शुभमंगल सावधान
पोस्ट आवडल्यास like करावी. Share करायची असल्यास नावासहित share करावी.
फोटो साभार गुगल.
डॉ. सुजाता कुटे.

0 टिप्पण्या