"अज्ञानाचा बळी "

माझी प्रसूती विभागामध्ये ड्युटी चालू होती. मी तिथे ऍडमिट असलेल्या सर्व प्रसूती रुग्णांना तपासत होते. अचानक तालुक्यातिल रुग्णलयात  एक प्रसूती झालेली रुग्ण शारदा संदर्भित ( reffer in) स्ट्रेचर वर आणली होती.
स्ट्रेचर वर असतानाच शारदा खूप सिरीयस आहे असे दिसून येत होते. वेळ न दवडता आम्ही तीला ऑक्सिजन लावला. पल्स ऑक्स लावून तिचे सगळे महत्वाचे पॅरामीटर्स तपासून घेतले. तिच्या संदर्भ प्रमाणपत्रात ( reffer letter) तीचे हिमोग्लोबीन 3 gm% असे लिहिलेले होते.म्हणजे तिला गंभीर रक्तक्षय (severe anemia) झालेला होता. लागलीच तीला रक्ताची एक बॉटल चढवण्यात आली. आणि सोबतच तीची तब्येत खूप सिरीयस आहे. याची नातेवाईकांना लेखी कल्पना देण्यात आली होती. व त्यावर त्यांची सही घेण्यात आली. रक्ताची ती त्या रुग्णालयातील शेवटची बॉटल होती. पण एका बॉटलने तीचे भागणारे नव्हते. मग आम्ही तिला पुढे मेडिकल कॉलेज ला संदर्भित करण्याचे ठरवले. पण नातेवाईक काही ऐकायला तयार नव्हते.
शारदाचा नवरा :आम्हाला हिला कुठेही न्यायचे नाही. मरू द्या इथेच पण आम्ही पुढे नेणार नाही. व त्याने तसे लिहूनही दिले.
मी :तुम्ही असा का विचार करता, तुम्हाला सर्व सरकारी आहे एकही पैसा लागणार नाही मग कश्यासाठी तुम्ही आढे विडे घेत आहात.
शारदाचा नवरा :आमची तिथे सोय लागत नाही.
मी :ठीक आहे मग तुम्ही कुणीतरी रक्तदान करा अथवा कुठे तरी मिळते का बघा.
शारदाचा नवरा :एवढा मोठा दवाखाना आहे अन तुमच्यकडे रक्त कसे काय नाही (एकदम आवेशात येऊन )

मी :शांतपणे दवाखाना मोठा आहे तसेच रक्त लागणाऱ्या रुग्णांची संख्या पण जास्त आहे.आता ही भांडण्याची वेळ नाही तुम्ही काहीतरी पाऊले उचला. लवकर मेडिकल कॉलेज ला घेऊन जा.
इतक्यात शारदाचा रक्तदाब(B.P.) कमी झाला. तिचं हार्ट failure झालं (CCF)आणी मग ती त्यातून वर नाही येऊ शकली. तिचा मृत्यू झाला. मग काय एकच आक्रोश उठला. जोरजोरात लोकांचा आवाज ऐकू येत होता रक्त नसल्याने ती गेली तीचा मृत्यू डॉक्टर मुळेच झाला.
मी तर त्या सगळ्यांकडे शूण्यासारखी एकटक बघत राहिले. माणूस गेल्यानंतर त्यांना झालेल्या दुःखामुळे मी त्यांचा राग समजू शकत होते.
एखादा रुग्ण मृत्यू पावल्यानंतर दवाखान्यातील ज्या formalities असतात त्या पूर्ण झाल्यावर ते लोक तिचं शव घरी घेऊन गेले.
पण मी मात्र या घटनेच्या मुळाशी जायचे ठरवले.
तिला ज्या आशा वर्कर ने आणले होते तिला तिच्याबद्दल विचारले तर ती म्हणाली की कालच तिला माहेरी आणली होती आणी सासरच्यांनी तीची एकही तपासणी केली नाही. का तर आम्ही तिच्यावर इतके पैसे कसे खर्च करणार असाच प्रतिप्रश्न शारदाच्या सासरच्यांनी आशा वर्कर ला केला होता. तीचे रक्तातील हिमोग्लोबीन चे प्रमाण प्रसूती आधी फक्त 5 gm% (नॉर्मल 10 gm%) होते. आणी प्रसूती नंतर एकदम 3 gm% झाले होते. का झाले होते असे?गरोदर राहिल्यानंतर पुर्ण आठ ते नऊ महिने कालावधी असतो जिथे तुम्हाला शारीरिक रित्या तंदुरुस्त राहता येते. व्यवस्थित औषोधोपचार केला तर प्रसूती अगदी सुलभ होते.म्हणजे हे तुमच्या स्वतःच्या हातात असते. तिथे रक्त वगैरे लावण्याची गरज ही भासत नाही.
मला आता कळून चुकले की हे सर्व शारदा आणी तिच्या नातेवाईकांना असलेल्या अज्ञानामूळे झाले होते.
सख्यानो आता मात्र इथे मी काही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून जर आपल्या प्रत्येक सखीने आपल्या आजूबाजूला असलेल्या गरीब आणी गरजू लोकांना दिली तर निश्चितच प्रत्येक सखी मूळे खूप सारे रुग्ण वाचतील.

सरकार ने गरोदर मातांसाठी अगदी सगळ्या सेवा मोफत सुरु केलेल्या आहेत.
1)गरोदर असलेल्या स्त्रीने आपल्या जवळ पास असलेल्या सरकारी रुग्णालयात नाव नोंदणी करायची आहे.
2)मोफत गोळया औषधं आणी इंजेक्शन उपलब्ध असतात ते फक्त जाऊन नियमित घ्यायचं आहे.
3)मोफत रक्तांच्या तपासण्या, मोफत सोनोग्राफी, आणी मोफत स्त्रीरोग अधिकाऱ्यांकडून तपासणी होते.
4)मोफत प्रसूती, मोफत सिझेरिअन
5)प्रसूती कळा सूरू झाल्या आणी त्या लोकांनी फोन केला तर ऍम्ब्युलन्स घरी घ्यायला येते. व प्रसूती झाल्यावर घरी सोडायला देखील येते.
6)ऍडमिट असताना रुग्ण आणी तिच्या एका नातेवाईकाला मोफत जेवणही दिले जाते
आता मला सांगा पैश्याचा प्रश्न येतो कुठे. उलट रुग्णालयात प्रसूती झाली तर BPL  लोकांना आर्थिक साहाय्य पण मिळते. पण अज्ञानाने हे लोकं एवढी चांगली उपचार पद्धतीला मुकतात आणी परिणाम शारदा सारखा होतो.
©®डॉ सुजाता कुटे 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या