रेसिपी माझ्या मैत्रिणीची आहे. मला सोपी वाटली आणि पदार्थ आवडला म्हणून इथे share करत आहे.
साहीत्य :वाळवलेल्या मिरच्या 1 वाटी , 1मोठा चमचा तेल, दीड गाठा लसूण, 1छटाक तीळ, मीठ चवीनुसार
हिरव्या मिरच्या घेऊन त्या खुडायच्या. कडक उन्हामध्ये चांगल्या वाळवायच्या. वाळलेल्या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे.
एका कढईत मंद आचेवर तेल तापवायचे,तेल तापले की कुटलेला लसूण तेलात टाकायचा त्याला लाल न होऊ देता त्यात तीळ टाकायचे (तीळ भाजून घेतले तरी चालतील) लालसर होईपर्यंत परतायचं.. .. मग मिरचीचे तुकडे आणि मीठ टाकून छान परतायचं.. मिरच्या थोडया कुरकुरीत होईपर्यंत..
पोळीसोबत किंवा वरण भातासोबत मिरच्या खूप चविष्ट लागतात..
आठ ते दहा दिवस त्या आरामात टिकतात.
टीप :आवडीनुसार कडीपत्ताही टाकता येतो.

0 टिप्पण्या