"तयारी परीक्षेची "

जयंतची बारावीची परीक्षा सुरु झाली होती.. शेवटच्या दोन महिन्यामध्ये जयंतने दिवसरात्र एक करून खूप अभ्यास केला होता...सुरुवातीला असणारे भाषा विषयांचे पेपर देखील त्याला खूप छान गेले होते...
त्यामुळे परीक्षा देण्यासाठी आता आपण पूर्ण तयार झालो असेच त्याला वाटले.... मग आयुष्याचा turning point असणाऱ्या विज्ञान विषयातील physics चा पेपर होता.... त्याची revision जयंतने अगदी रात्रभर जागून केली होती...
सकाळी जयंत परीक्षा हॉल मध्ये गेला... परीक्षा सुरु झाली... प्रश्नपत्रिका हातात पडली... जयंतला प्रश्नपत्रिका वाचून खूप आनंद झाला... सगळेच प्रश्न त्याच्या ओळखीचे होते... त्यामुळे आता त्याने उत्तरपत्रिकेवर लिहायला सुरुवात केली...
पण हे काय??  जयंतला एकदम ब्लॉक झाल्यासारखे वाटले... खूप वेळ झाला त्याला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर आठवेना...
 तब्बल वीस मिनिटे वेळ गेल्यावर जयंतला पुन्हा उत्तर आठवायला लागले.... आणि तो पेपर लिहायला लागला...
पण या गोष्टीचा परिणाम असा झाला की त्याला प्रश्नपत्रिका सोडवायला वेळच पूरला नाही आणि मग त्याचा परीक्षेचा उत्साह नाहीसा झाला...
त्यामुळे आता जयंतने बारावीची परीक्षा देखील पूर्ण दिली नाही..
आयुष्याचा turning पॉईंट असल्याने आता जयंतला पुन्हा परीक्षा द्यावी लागणार होती...
का झाले होते असे?? काय कारण असेल?? जयंतने तर खूप अभ्यास केला होता.. अगदी दिवसरात्र एक करून... हे ब्लॉक होने म्हणजे काय?? आतापर्यंत तर त्याला असा कधी अनुभव नव्हता...
जयंतच एक वर्ष वाया गेलं आणि त्याला मात्र आता एक चांगला धडा मिळाला होता.... त्याने नवीन वर्षात मात्र आता अगदी नियोजन करून अभ्यास करायचे ठरवले....

जयंतने कुठलाही अवास्तव वेळापत्रक तयार केले नाही... त्याच्या क्लास च्या वेळे व्यतिरिक्त रोज फक्त दोनच तास अभ्यासासाठी दिले त्यात अगदीच रोजचे दोन विषय तो नियमित करत असे.... आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी ठरल्या दोन तासांपेक्षा.... एक तास जास्त अभ्यास करत असे....
त्यामुळे नियोजित वेळेत ठरलेल्या वेळापत्रका पेक्षा ही जास्त अभ्यास व्हायला लागला आणि त्यामुळे आता जयंतचा आत्मविश्वास खूप वाढायला लागला....
जयंतच्या आईवडिलांनी त्याच्या कडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.... विशेष लक्ष म्हणजे त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली....त्याला सकस आहार कसा मिळेल या कडे लक्ष देत...त्यात दूध आणि फळांचा समावेश केला...
 सगळ्यात मुख्य म्हणजे जयंतच्या आईवडिलांचा आपल्या मुलावर पूर्ण विश्वास होता.... त्यांना त्याला अभ्यास कर असं म्हणायची कधी वेळच आली नाही....
ते फक्त त्याच्या हालचाली दुरून बघत.... त्याला कधी कुठले टेन्शन आले की.... आम्ही तूझ्या सोबत आहोत तू फक्त तूझा अभ्यासातील नियमितपणा कायम ठेव... फळाची अपेक्षा आताच करू नकोस असे सांगत....
या सगळ्या गोष्टींमुळे कुठलाही ताण न ठेवता जयंत नियमित अभ्यासाला लागला.... आता मात्र नियमित अभ्यासामुळे जयंत साध्या test च्या दिवशी रात्री कधी जास्त जागत नसे... पूर्ण आठ तास झोप घेत असे.... test ला जाताना तो भरपेट नाश्ता करून जात असे.... या कारणामुळे जयंत ला आता test ला पैकी च्या पैकी गुण मिळायला लागले...
 वार्षिक परीक्षेतही आणि स्पर्धा परीक्षेतही तो अतिशय चांगल्या गुणांनी पास झाला आणि त्याला हव्या त्या क्षेत्रात प्रवेश मिळाला....
काही छोटया पण अगदीच महत्वाच्या गोष्टींमुळे त्याचे आयुष्य बदलून गेले
1 )सुरुवातीपासून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे केलेला अभ्यास
2) वास्तववादी वेळापत्रक
3) ताण न येता केलेला अभ्यास
4)घरच्यांनी वेळोवेळी दिलेली साथ
5) सकस आहार
6) परीक्षेच्या वेळेस पूर्ण झोप.... त्याचं आधीचं ब्लॉक होण्याचं कारण.... झोप व्यवस्थित झाली नाही तर मेंदू देखील तितकीशी साथ देत नाही....

7)परीक्षेच्या वेळेस भरपेट नाश्ता
8) परीक्षेचे हॉल टिकिट हे परीक्षेला नेणाऱ्या ट्रान्सपरंट पाऊच मध्ये आधीच ठेऊन देने... ट्रान्सपरंट पॅड वापरणे...
लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा...
©®डॉ सुजाता कुटे.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या