दोष कुणाचा सजा कुणाला... जिद्द परिस्थितीशी लढण्याची

नुकतेच जयाचे लग्न थाटामाटात पार पडले.जया दिसायला खूप सुंदर, गोरी गोमटी, बोलक्या डोळ्यांची आणि सुंदर लांबसडक केस. अगदीच राजकन्या भासत होती. आणि ती खूप खूषही होती कारण तिला एकदम राजबिंडा राजकुमार भासेल असा पवन तीचा आता तो नवरा होता. अगदी गर्भश्रीमंत घरामध्ये तीचे आगमन झाले होते.घर अगदी राजवाडाच.सासू सासरे खूप प्रेमळ स्वभावाचे होते. त्यामुळे जयाला असे वाटत होते की आपल्याला एकदम परिपूर्ण सासर मिळाले आहे.
जया आता नवीन ठिकाणी चांगलीच रुळली होती.लग्नाला सहा महीने उलटून गेले असतील की एकाएकी जयाला ताप यायला लागला होता. ताप येऊन वजन कमी व्हायला लागले होते. म्हणून ती दवाखान्यात तपासणी साठी गेली.काही तपासण्या झाल्या आणि जयाला एका समुपदेशिकेकडे पाठवण्यात आलं.तिथे जे काय तिने ऐकले तीचे हातपायच गळून गेले.ती जागीच बसली.तीच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली.तिने कसेबसे स्वतःला सावरले.नंतर ती समुपदेशक काय सांगत होती तिला काहीच कळत नव्हते.ती विचारात मग्न झाली.कसं झालं असं? तिचं डोकं सुन्न झालं होतं. जयाला hiv ची लागण झालेली होती.
जयाला पवनचा खूप राग यायला लागला होता.तिला लक्षात आले की आपली पुरती फसगत झालेली आहे.पण ही फसवणूक अशी होती यातून जयाला बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नव्हता. सगळीकडे काळोखच दिसत होता.
आता जयाने आत्महत्येचा विचार पक्का केला.व त्यासाठी ती रेल्वेरुळाकडे जाऊन उभी राहिली.जयाला माहिती होते की त्या वेळेला त्या रुळावरून रोज एक ट्रेन जाते.ती थोडासा आडोसा घेऊन ट्रेन येण्याची वाट पहात होती. तितक्यात एक साधारण 16 वर्षांची मुलगी त्या रुळाच्या दिशेने धावताना तिला दिसली. तितक्यात ट्रेन चा आवाज आला आता जया रुळावर जाणार तिथेच समोर ती मुलगी देखील रुळावर उभी दिसली.ती खूप रडत होती. जयाला लक्षात आले की ती मुलगी देखील आत्महत्या करायला आलेली आहे. ती पटकन त्या मुलीकडे धावली आणि तिला पकडून दोघीही रुळाच्या बाजूला झाल्या.धडधड धडधड...  एकदम बाजूने ट्रेन गेली.दोघीही सुरक्षित होत्या.
ती मुलगी जयाला म्हणाली का वाचवलंत मला? मरू द्यायचे असते ना. जया मनात म्हणाली कुणी कुणाला वाचवले? जया म्हणाली इतके काय झाले की तू आत्महत्या करायला निघालीस.ती मुलगी म्हणाली माझी दहावीची परीक्षा चालू आहे आणि मला गणिताचा पेपर खूप अवघड गेला.मला वाटते की मी पासही होते की नाही.माझ्या आईवडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.  हे ऐकून जयाने डोक्यावर हात मारला.बस इतकेच कारण? अगं परीक्षा पुन्हा पुन्हा देता येते पण आयुष्य हे एकदाच मिळते तू विचार केलास का? की तुझ्या आईवडिलांचे काय हाल झाले असते तू आत्महत्या केल्यावर.तू एकदा आई वडिलांना सांगून तर बघ पेपर अवघड गेलाय म्हणून माझी खात्री आहे ते तूला समजून घेतील.असे म्हणत जयाने तीचे समुपदेशन केले. आणि ती मुलगी एकदम आनंदाने घरी गेली.
त्या मुलीचे समुपदेशन करता करता जयाला हे लक्षात आले की अश्या कितीतरी स्त्रिया असतील त्यांची आपल्यासारखी फसगत होत असेल. आणि त्याही असे टोकाचे पाऊल उचलत असतील तर.... आपण जर त्यांच्यासाठी काही केले तर.आता मात्र जया घराकडे जायला निघाली एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन.
घरी गेल्यावर जया आता पवनशी भांडत बसली नाही कारण जो धोका व्हायचा तो झालेला होता.फक्त तिने विचारले हे असे कसे झाले. तेव्हा लग्नाआधी मी रेड light एरिया मध्ये गेलो होतो. अशी कबूली त्याने दिली. व अगदी काही दिवसांपूर्वीच मला hiv ची लागण झाली हे कळाले होते.तिने पवन च्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या. सोबत स्वतःच्या तपासण्या करून घेतल्या त्यात जयाला कळाले की जर आपण तब्येतीची काळजी घेतली तर आपण खूप वर्ष जगू शकतो अगदी नॉर्मल माणसासारखे आणि जर गरोदर राहिलो आणि वेळेवर औषधं घेतली तर मुलांनादेखील ही बिमारी होणार नाही.ही तिच्यासाठी आनंदाची पर्वणीच होती.
आता जया आणि पवनने hiv ग्रस्त स्त्रियांसाठी एक संस्था स्थापन केली ज्या मध्ये नुकतीच लागण झालेल्या स्त्रियांना समुपदेशन करत असत ते ही स्वतः चे उदाहरण देऊन......
त्यामुळे कितीतरी जया ह्या आता जगायला लागल्या.
लेख आवडल्यास like करा. Share करायचे असल्यास नावासहित share करा.
फोटो साभार गुगल
©® डॉ सुजाता कुटे 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या