सान्वीची वयाची तिशी आली होती... तरीही तीचे लग्न जमत नव्हते... कारणही तसेच होते... कारण त्यांच्या जातीमध्ये तिच्या इतकं शिकलेलं कुणीच नव्हतं... त्यांच्या जातीतील ती एकमेव मुलगी होती जी एम बी बी एस झाली होती...
त्यांच्या जातीतील कुठलाही मुलगा सान्वी एवढं किंवा तिच्या पेक्षा जास्त शिकलेला नसल्याने कुठलाही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता...
मग शेवटी लग्नासाठी सान्वीने आणि तिच्या आईवडिलाने एका मॅट्रिमोनिअल साईटवर तीचे नाव रजिस्टर केले... मग सान्वी रोज शेकडो प्रोफाईल त्या मॅट्रिमोनिअल साईटवर चेक करायची... तिला कुणीच आवडत नव्हतं...
प्रोफाईल सर्च करता करता तिला एक एम बी बी एस डॉक्टर ची प्रोफाईल दिसली.... त्याचं नाव शरद.... तिने त्याच्या प्रोफाइल वर त्याची पूर्ण माहिती वाचली.... त्याच्या अपेक्षा आणि तिच्या अपेक्षा अगदीच जुळत होत्या... तिला खूप आनंद झाला... आनंदाने सान्वीने शरदला मेसेज केला...
मेसेज केल्यावर ती रिप्लायची वाट पाहत होती... पण रिप्लाय काही आला नाही... दुसऱ्या दिवशी सान्वीने पुन्हा तिचा मेल इनबॉक्स उघडला.... तिथे शरदचा मेसेज दिसला...
शरदचा मेसेज पाहिल्यावर सान्वीने अक्षरशः आनंदाने उडीच मारली.... त्याने देखील तिची प्रोफाइल आवडली असे सांगितले..
मग काय शरद आणि सान्वीचे रोज सुरुवातीला चॅटिंग आणि नंतर फोनवर बोलणे होऊ लागले होते... कधी कधी विडिओ चॅटिंग होऊ लागले.. शरदचं बोलणं इतकं स्पष्ट आणि शुद्ध होतं.... आणि बोलताना तो इतक्या प्रेमळ गोष्टी करायचा की सान्वीला त्याच्या बोलण्यातून भुरळ पडत असे...
सान्वी तर आता शरदच्या प्रेमात पडली होती... त्याचं बोलणं इतकं लाघवी आणि प्रेमळ होतं की ती रोजच नव्याने शरदच्या प्रेमात पडायची.
मग या दोघांची एकमेकांची पसंती बघून सान्वीच्या आईवडिलांनी शरदची पत्रिका मागवली.... शरद ने त्याची पत्रिका पाठवली... सान्वी आणि शरदच्या पत्रिका मिळवण्यात आल्या.. ... दोघांचे अगदीच छत्तीस गुण जुळले होते...
आता सान्वीच्या आईवडिलांनी रीतसर शरदच्या घरी जाऊन त्याला मागणी घालायचे ठरवले...
सान्वीने ही आनंदाची बातमी शरदला देण्यासाठी विडिओ कॉल लावला... शरदने तो उचलला... विडिओ कॉल वर बोलत असताना तिला शरदच्या मागे असलेली एक फोटोफ्रेम दिसली... त्यात त्याचा फोटो आणि बाजूला पाकिस्तानी झेंडा दिसला....
असं कसं शरद आणि त्याच्या बाजूला पाकिस्तानी झेंडा...काहीतरी विचित्र आहे हे सान्वीला जाणवले... व विचार आला शरद भारतीय नसेल तर??
आता मात्र सान्वीच्या पाया खालची जमीन सरकली.... तिला पाहिल्यांदा शरदवर संशय आला.... बोलता बोलता सान्वीने शरदची एम बी बी एस ची बॅच आणि कॉलेज विचारून घेतले...
सान्वीचे शरदशी बोलणे झाल्यावर लागलीच त्याने सांगितलेल्या कॉलेजचा फोन नंबर सान्वीने गुगल वरून शोधला... फोन नंबर मिळाल्यावर तिने कॉलेज मध्ये अमुक अमुक बॅच मध्ये शरद नावाचं कुणी होतं का ते पाहिले...
सान्वीला कळाले की शरद नावाचं कुणीही त्या बॅच मधून एम बी बी एस झाले नाही.... सान्वीचा संशय खरा ठरला...
मग सान्वीने पुन्हा शरदला फोन लावला... तिने त्याला चांगलं झापायचं असे ठरवले होते...फेक प्रोफाइल लावून तो मुलींच्या भावनांशी खेळत आहे असे सान्वीला वाटले....
शरदने फोन उचलला... सान्वीने एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली...
एव्हाना आपण पकडले गेलोय हे शरदला लक्षात आले...
आता शरदने कंफेस केले... मी शरद नसून एक पाकिस्तानी नागरीक आहे आणि मी टेररिस्ट आहे....
हे शब्द ऐकताच सान्वीला एकदम धस्स झाले.... सान्वीने लागलीच फोन बंद केला आणि सगळ्या फोन साईट वर त्याला ब्लॉक केले...
वेळीच संशय आल्याने सान्वी सुरक्षीत झाली... आणि बदनामीच्या भीतीने तिने पोलीस कंप्लेंट केली नाही...
सत्य घटनेवर आधारीत
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा
©®डॉ सुजाता कुटे
0 टिप्पण्या