एक असाधारण व्यक्तीमत्व आणि त्यांना साथ देणारी त्यांची अर्धांगिनी डॉ एम के दराडे आणि श्रीमती सुमन दराडे हे माझे ड्याडी आणि मम्मी. ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आले ते ते सर्वच जण नतमस्तक असणार त्यांच्या कार्यासमोर.आणि मी ही स्वतःला खूप नशीबवान समजते की मी त्यांची मुलगी आहे.
माझे वडील डॉ एम के दराडे हे एम बी बी एस, एम एस सर्जरी आणि एम एस इ एन टी असे तज्ञ होते त्यांच्या कडे दोन स्पेशालिस्ट च्या पदव्या होत्या.मला आठवतं तसं माझे वडील औरंगाबाद घाटी रुग्णालयात इ एन टी विभागात विभागप्रमुख होते.
माझ्या वडिलांचा एक स्वभाव होता... सगळ्या रुग्णाशी ते प्रेमाने बोलत असत .... त्यांची वागणूक आपलेपणाची असे त्यामुळे औरंगाबाद घाटी रुग्णालयातील वॉर्ड बॉय ते सर्व जातीधर्माचे लोक असो की, आजूबाजूच्या पाच ते सात खेड्यातील लोक असो की कुणी साधू संत असो सगळे जण म्हणायचे आम्ही डॉ दराडेचे नातेवाईक आहोत आणि आम्हाला त्यांनाच दाखवायचे आहे. असा त्या लोकांचा हट्ट असायचा. आणि ड्याडी तो पुरवत असत.बाह्य रुग्ण विभागाची ऑफिशिअल वेळ संपली तरी शेवटचा रुग्ण होईपर्यंत ते तिथेच थांबत असत.
त्यावेळी माझे ड्याडी एकटेच थायरॉईडच्या अवघड अवघड शस्त्रक्रिया करायचे. बाकी शस्त्रक्रियाही खूप सहजासहजी करायचे. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की विभागप्रमुख असूनही ते बरीच कामे स्वतः करायचे.
एकदिवस माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांची उजव्या हाताची नस दबली गेली.आणि त्यांना उजव्या हाताला accidental पॅरालीसिस झाला.त्याचे दुखणे असे होते की जसे काय विंचू चावला आहे.आणि ते दुखणे सतत होते. तो हात उचलताना दुसऱ्या हाताची मदत लागत असे.पण ते इतके जिद्दी होते, त्यांनी हार मानली नाही आणि त्याच सतत दुखऱ्या हाताने ते शिताफीने कारची स्टेरिंग फिरवत, स्वीमिंग करत आणि इतकेच नव्हे तर ऑपेरेशनही करत.तेही एकदम व्यवस्थित. माझ्या वडिलांचे त्यांच्या विद्यार्थ्यांशी वागणे देखील मैत्रीपूर्ण असायचे.ते रेसिडंट डॉक्टर बऱ्याचदा कामानिमित्त आमच्या घरी येत असत.त्यावेळेस माझी आई देखील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना चहा नाश्ता द्यायची... कंटाळत नसे. आमच्या घरी ड्याडीच्या अश्या स्वभावामुळे सतत पाहुणे (रुग्ण )येत असत पण त्यांचंही स्वागत माझी आई प्रेमाने करत असे. कधीच चिडत नसे...... जणू काही ड्याडी सोबत तिनेही लोकसेवेचं व्रतच घेतलेलं होतं... आमच्या घरी फक्त आमचे आजी आजोबा नाही तर वडिलांचे दूर दूरचे नातेवाईक आणि त्यांच्या मित्रांचे दूरचे नातेवाईक, कुणी तरी टी बी झाला म्हणून घरात न घेतलेले नातेवाईक, असे सगळेच तब्येत ठीक होईपर्यंत आमच्या घरातच रहात असे.आणि त्यांची सेवा रुग्ण म्हणून दवाखान्यात ड्याडी आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था घरी मम्मी स्वतः करत असे. त्या सगळ्या रुग्णामध्ये कुणी टी बी, कॅन्सर,पॅरालीसीस आणि बाकी कान नाक घश्याचा आजार असणारे नातेवाईक असायचे.
मला आठवते की आमच्या घरी एक पाहुणा(रुग्ण ) येऊन गेला की दुसरा हजरच असे ती शृंखला तुटत नसे. आणि रोजचे येणारे लोक म्हणजे कधी कधी तर फक्त दरवाजा उघडून आणि फोन उचलूनच आमचे पाय दुखत असत.
माझ्या वडिलांना हार्ट प्रॉब्लेम मूळे 1मार्च 2010ला देवाज्ञा झाली. पण जेव्हा जेव्हा त्यांची आठवण निघते तेव्हा तेव्हा त्यांच्या कार्याची महिमाच डोळ्यासमोर दिसते...
म्हणूनच म्हणावेसे वाटते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.
लेख आवडल्यास like करा share करायचा असल्यास नावासहित share करा
©® डॉ सुजाता कुटे.

0 टिप्पण्या