एक उमरा नावाचे गाव होते. त्या गावात सोनू आणि मोनू अशी दोन अतिशय खोडकर, व्रात्य मुले होती.ती दोघेही इतकी खोडकर होती की चालता फिरता ते कुणाचीही खोडी काढत असत. कधीच कुणाचं ऐकत नसत.शाळेमध्ये पण ते कधी व्यवस्थित जात नसत.दिलेला गृहपाठ ते कधीच पूर्ण करत नसत. त्यामुळे रोज शिक्षकांचा ओरडा त्यांना मिळत असे.
शाळेतून घरी आल्यावर बॅग भिरकावून देत nसोनू,मोनू च्या अश्या खोडकर वागण्याला त्यांच्या घरचेच काय पूर्ण गाव कंटाळला होता.रोज एक जण सोनू मोनू च्या घरी भांडायला येत असत.सोनू, मोनू च्या घरचे त्यांच्या वागण्यामुळे हवालदिल झाले होते. त्यांना काही पर्याय सापडत नव्हता.
असंच खोडी करता करता एक दिवस सोनू आणि मोनू एका मोटरसायकल ची हवा काढू लागले.ते तिथे उभे असलेल्या पोलिसाने पाहीले. तो पोलीस काठी घेऊन त्यांच्या मागे पळाला. दोघेही जीव मुठीत घेऊन पळायला लागले. तो पोलीस खूप दूर पर्यंत त्यांच्या मागे होता म्हणून आता पुढे पाळण्याशिवाय दोघांकडे पर्याय नव्हता.
पळत पळत ते दोघेही एका अनोळखी ठिकाणी आले. त्या दोघांनाही आपल्या घराचा रस्ताच दिसेनासा झाला.आपण हरवलो आहे हे त्या दोघांनाही कळाले.रस्त्याच्या चारी दिशेने ते थोडे थोडे जात होते पण त्यांना घराचा रस्ता काही सापडेना. आता त्यांची चांगली घाबरगुंडी उडाली होती.खूप भूक लागली होती तहान लागली होती पण कुणाला मागायचे.विनंती करने तर दोघांनाही माहिती नव्हते.आता दोघांनाही आपल्या खोडी काढण्याचा पश्चाताप होत होता. दोघेही देवाला विनवणी करत होते की आमचे घर आम्हाला सापडू दे आम्ही पुन्हा कुणाला त्रास नाही देणार.
तिथेच फिरता फिरता ते दोघेही एका ओसाड ठिकाणी आले.त्या ठिकाणी त्यांना एक उजेड असलेली छोटीशी रूम दिसली. ते दोघेही त्या रूम कडे जायला लागले.त्यांना वाटले तिथे आपल्याला कुणीतरी खायला प्यायला देईल.इतक्यात दोघांनाही एक खूप मोठा आणि राक्षसी असा आवाज आला.दोघांनीही कानोसा घेतला तर ते लोकं दरोडेखोर होते आणि गावातील मोठया बँकेत दरोडा टाकण्याचं ते प्लांनिंग करत होते.ते ऐकून सोनू, मोनू नुसते थरथर कापायला लागले.आता जर या लोकांनी आपल्याला बघितले तर ते आपल्याला मारूनच टाकतील.तितक्यात त्यांची चाहूल एका दरोडेखोराला लागली.कोण आहेरे तिकडे असा भारदस्त आवाज आला. तितक्यात सोनुने मांजरीचा आवाज काढला. बाजूला असलेले छोटेसे किराणा दुकान त्यानी खूण म्हणून लक्षात ठेवले होते.
कसा बसा जीव मुठीत घेऊन दोघेही त्या रूमच्या विरुद्ध दिशेने पळाले. पळता पळता त्यांना रस्त्यामध्ये पोलीसची गाडी दिसली. त्या गाडीमध्ये सकाळी त्यांच्या मागे लागलेला पोलीस देखील होता.त्या दोघांनीही त्या रूमची व दरोडेखोरांची माहिती पोलिसांना दिली.पण तो एक पोलीस यांना चांगलाच ओळखत होता.दोघेही खूप खोटं बोलतात हे माहिती होते म्हणून त्या दोघांच्या सांगण्यावर विश्वासच ठेवत नव्हते.सोनू मोनू ला पोलिसाना कसे पटवायचे हे कळतच नव्हते.कृपा करून आमच्या सोबत चला खूण म्हणून लक्षात ठेवलेले किराणा दुकान त्यानी पोलिसाना सांगितले. एकदा शेवटचा या व्रात्य मुलांवर विश्वास ठेऊ असे म्हणत त्या रूम कडे ते आले. पाहिलं तर खरंच हालचाली सुरु होत्या पोलिसानी लागलीच आपला फौजफाटा बोलावला आणि सगळ्या दरोडेखोरांना पकडले.
इकडे सोनू, मोनू घरी आले नाही म्हणून पूर्ण कॉलनी दोघांच्या घरच्यांनी पालथी घातली होती. आणि आता पोलीस त्यांना घेऊन येत होते.ते बघून सोनू मोनू च्या घरचे लोकं परेशान झाले. आता काय केलं पोरांनी?
पण पोलिसांनी दोघांच्याही धाडसाचं खूप कौतुक केलं.
आता सोनू मोनू ला कळून चुकलं की चांगलं वागलं तर चांगलंच होतं. आणि खोडकर वागलं किंवा खोटं बोललं तर कुणीही आपल्यावर विश्वास ठेवत नाही.
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.
©®डॉ सुजाता कुटे.
0 टिप्पण्या