निमिषाला 🙎♀️आता तिच्या सासरची मंडळी खराब सून म्हणून ओळखू लागले होते...
कारण ती आता कुणामध्येच मिसळत नव्हती.... ती सर्वाना टाळू लागली होती.... आपण भलं नी आपलं चौघांचे👩👩👧👦 कुटुंब भले असच ती वागत होती....
तिला वाटायचं आपण नेहमी सासरी जात नाही ना मग सासरच्यांनी पण आपल्याकडे येऊ नये.... तिच्या अश्या वागण्यामुळे तिला नाठाळ सून म्हणून पदवी मिळाली होती....
निमिषाला ते समजले होते... पण तिला काहीच फरक पडला नाही.... तीने आनंदाने नाठाळ सून ही पदवी स्वीकारली होती...
निमिषा जेव्हा नववधू 👰म्हणून या घरात आली... त्यावेळी प्रत्येक नववधूचे आईवडील जसे सासरी वागण्याबद्दल शिकवतात तसे च निमिषाच्या आईवडिलांनी देखील निमिषाला शिकवले....
बेटा हे बघ आता ते घर तूझे आहे... तुझ्यामुळे तिथे कुणी दुखावलं नाही पाहीजे... सगळ्यांशी प्रेमाने वाग... आपली बाजू पडती ठेव... अहंकार बाळगू नकोस...
निमिषा देखील समजूतदार होती... तीने तिच्या आईवडिलांना सगळ्यांशी प्रेमानेच वागेल असा शब्द दिला....
नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना तसे निमिषाचे सुरुवातीचे दिवस खूप छान गेले.... सुरुवातीचे दिवस म्हणजे महिनाभर... कारण निमिषा ही एक शिक्षिका👩🏫 होती. आणि दुसऱ्या शहरात 🏢नौकरीला होती....
त्या महिनाभरात निमिषाचे तिच्या सासरी खूप कौतुक होत असे..
निमिषाला एक जाऊ आणि एक नणंद होती.... जाऊ ग्रॅज्युएट होऊनही गृहिणी होती आणि नणंद बारावी झाली होती...सासू अशिक्षित.. त्यामुळे निमिषाचे जास्त कौतुक होई...
निमिषाला स्वतःचा अभिमान वाटत असे.. .. आणि आपली सासरची मंडळी खूप चांगली आहे ह्या विचाराने तीला आपल्या आयुष्याचे सार्थ झाले असे वाटे..
महिना झाला आता निमिषाला नौकरीवर रुजू होने जरुरी होते... म्हणून मन सासरी गुंतलेले असतानाही जड अंतकरणाने तीने तिथून रजा घेतली...
ती व तीचा नवरा प्रदीप 👫या दोघांचीही नौकरी एकाच शहरात होती त्यामुळे दोघेही सोबत निघाले.....
संपूर्ण प्रवासात निमिषा आपल्या सासरच्या मंडळी बद्दल भरभरून बोलत होती...
प्रदीपला मात्र ते खटकत होतं.... त्याला वाटत होतं की निमिषाने जेवढ्यापुरतं तेवढं राहावं... जास्त गुंतू नये... पण तो निमिषाला काही बोलला नाही.... पण निमिषाच्या नजरेतून प्रदीपचे खटकणे सुटले नाही..... पण तरी निमिषाने दुर्लक्ष केले...
शहरी आल्यावर दोघांचा संसार सुरु झाला.... सुरुवातीला घर लावे पर्यंत दोघांनाही तारेवरची कसरत करावी लागे...
सुरुवातीला निमिषा सगळेच काम घरीच करत असे.... पण काही दिवसांनी तिच्या शाळेतील कामाच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या... त्यामुळे दोन्ही कामांचे संतुलन साधता येईना...
काम पूर्ण होत नाही म्हणून तीने धुण्याभांड्यासाठी आणि स्वयपांकासाठी बाई लावून टाकली.... आता निमिषा सगळं काम व्यवस्थित मॅनेज करत होती....
ती प्रदीपला देखील वेळ देऊ लागली होती.... दोघांचा संसार सुरळीत चालला होता....
निमिषाला वाटायचे की आपल्या सासूबाईंना सासरी काम करावे लागते.... इथे माझ्याजवळ आल्या तर त्यांचा चांगला आराम होईल.... त्यांना आम्ही किती छान राहतो हे बघायला देखील मिळेल.... म्हणून निमिषाने तिच्या सासूबाईंना बोलावले....
निमिषाच्या सासूबाई आल्या.... निमिषा खूप खूष झाली... दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी पासून धुण्याभांड्यावालीने काम सोडले...
निमिषाला वाटले की तीला पाहुणे सहन नसेल झाले... तिला धुण्याभांड्यावाली चा राग आला... वाटलं एकच तर व्यक्ती वाढली होती....
पण हे काय चौथ्या दिवशी स्वयंपाक वालीने काम सोडले.... निमिषाला काही समजेनासे झाले... आता सगळा कामाचा भार तिच्यावरच पडला...
रोज संध्याकाळी तिला तिच्या सासूबाईना एका नातेवाईका कडे न्यावे लागे.... तिची नुसती दमछाक होत असे.... आठ दिवस राहून तिच्या सासूबाई त्यांच्या गावी आल्या...
निमिषाने आता पून्हा कामवाल्या लावल्या आणि तिचं सगळं सुरळीत सुरु झालं....
पंधरा दिवसांनी निमिषाची नणंद घरी आली... तेव्हा देखील निमिषाला असाच अनुभव आला....
त्यानंतर पून्हा एका महिन्यानी तिच्या सासूबाई आल्या तेव्हा पून्हा तिच्या कामवाल्या सुटल्या.... सगळा भार तिच्याच अंगावर पडे....
या वेळेस निमिषाकडे आणि तिच्या मैत्रिणीकडे एकच कामवाली होती.... या वेळेसही तिच्या सासूबाई आल्या की ही देखील कामवाली सुटली....
आता मात्र निमिषाला काहीतरी वेगळंच आहे असं वाटायला लागली... निमिषा लगेच आपल्या मैत्रिणीकडे गेली... आणि तिथे असणाऱ्या कामवाल्या बाईला विचारले का गं तू का काम सोडलेस...
त्यावर ती कामवाली म्हणाली.... बाई तुमच्या घरी तुमच्या सासूबाई किंवा नणंदबाई आल्या की नको नको ते कामं सांगतात..घरातले जेवढे आहे नाही तेवढे सामान काढतात... वेळेवर घरातून बाहेर जाऊ देत नाहीत.....
तुमचे तर खूप गाऱ्हाणे करतात... म्हणतात काय होतं दोघांचच तर करायचं... तुम्हा बायकांची गरजच काय... मुद्दामून केल्यासारखं वागतात...
आता कालच !!!मला आधीच खूप काम होतं.... माहीती असून मुद्दामून घरातील सगळ्या चादरी धुवायला टाकल्या...
परत तूम्ही घर स्वच्छ ठेवत नाही म्हणत अख्खा घर धुवायला काढलं... बाई! मला घरी जायला उशीर झाला.... अर्धा घंटा माझ्या नवऱ्याने मला घरात घेतलेच नाही.....
म्हणून मी नंतर आलेच नाही...
बाई तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी इतकं प्रेमाने बोलता आमच्यावर कोण विश्वास ठेवणार.... म्हणून तूम्हाला कुणी काही सांगितले नाही...
त्याना नुसती तुमची फजिती बघायची असते.... त्यांना हे दाखवून द्यायचं की नौकरीवाल्या बाई पेक्षा आम्ही किती बऱ्या आहोत....
पण बाई !!! एक सांगू का?? साहेब खूप चांगलं ओळ्खतात आपल्या आई आणि बहिणीला... ते काही बोलूच देत नाहीत अगाव ची कामे काढू देत नाहीत.... पण तूम्ही दोघे नसले की आमची फार परेशानी व्हायची.... म्हणून काम सोडण्याशिवाय पर्याय नसे....
त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या भोळ्या स्वभावाची निमिषाला खूप कीव आली तरी तिचं मन मानत नव्हतं.... कारण तीने तर सर्वाना आपलं मानलं होतं.... तिच्या वागण्यामध्ये कधी दुजाभाव नव्हता...
या विषयावर ती पहिल्यांदा प्रदीपशी बोलली... प्रदीपला या गोष्टीची कल्पना असल्याने त्याने निमिषाच्या प्रश्नांना दुजोरा दिला....
आता मात्र निमिषा वागण्यात थोडी बदलली.... एकदम भोळेपणाने न वागता हुशारीने वागू लागली.... कामवाल्याना शक्यतोवर स्वतःच्या वेळेनुसार बोलवायला लागली.... इथेही ती आता व्यवस्थित मॅनेज करू लागली....
सासूच्या खट्याळपणा ला आपोआपच कात्री लागली...
मनासारखे काही होत नसल्याने सासूबाई आणि नणंद यांनी निमिषाकडे जाणे सोडले.... आणि ती किती खराब आहे हे लोकांना पटवून द्यायला लागले...
निमिषाने देखील नाठाळ म्हणून म्हणून कुठपर्यंत म्हणणार ( सरड्याची धाव कुंपणापर्यंत )असं मानत त्यांचा राग न धरता.... हो मी अशीच आहे हे मान्य केले....
तरीही निमिषा मात्र एकही सण सासरच्या लोकांसोबतच गावी येऊन साजरा करणे सोडत नसे... आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असे....
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा.
©® डॉ.सुजाता कुटे
0 टिप्पण्या