"पिंपळाच्या झाडाखाली "

देवेंद्र आपला भाऊ दिनेशच्या अंतिमसंस्कारासाठी गावाकडे 🚶‍♂️आला होता...
 
दिनेशच्या मृत्यू अचानक झाला होता.... त्याच्या मृत्यूचे  स्पष्ट कारण समजले नव्हते... त्यामुळे देवेंद्र खूप परेशान झाला होता... 

अंतिम संस्काराच्या वेळी होणारी लोकांची कुजबुज 👥त्याने ऐकली होती.... कुणी म्हणे अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली🌳 जायचं कशाला?? याच्या घरच्यांना माहीती नव्हतं का?? तिथे भूतबाधा ☠️👿होते ते ! आपल्या गावातील तीन चार माणसं असेच पागल होऊन देवाघरी गेले आता हा दिनेश !!!

देवेंद्र तेव्हा खूप दुःखात होता म्हणून त्या क्षणी काही बोलला नाही... पण ती कुजबुज करणाऱ्यांमध्ये त्याचा एक चुलत भाऊ होता" राजेश "त्याला त्याने सर्वांसोबत बोलताना पाहीले होते... 
थोडंसं सावरल्यावर देवेंद्रने राजेशला भेटून विचारले....

 त्यावर राजेश देवेंद्रला म्हणाला की मला नक्की माहीती नाही पण असं म्हणतात अमावस्येच्या🌌 दिवशी जो कुणी गावाच्या वेशीबाहेरील  पिंपळाच्या झाडाखाली🌳 जाईल त्याला भूतबाधा👿 होते... तो मानसिक रोगी होतो आणि पंधरा दिवसातच तो अपघात होऊन नाहीतर आत्महत्या करून मरतो.... 

देवेंद्रला भूताखेतांवर☠️💀 बिलकुलच विश्वास नव्हता.... त्याला घातपाताचा संशय येत होता... त्यामुळे आता त्याने दिनेशच्या मृत्यूचा छडा लावायचा ठरवला... त्यासाठी त्याने पूर्ण महिनाभर आपल्या नौकरीच्या ठिकाणी सुट्टी घेतली....

 तो गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाचे🌳 तिथे जाऊन निरीक्षण करायला लागला... 

वेळ तशी दुपारची होती... रण रण ऊन 🌄पडलेलं होतं... गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाचे झाड🌳 आणि तिथला आजूबाजूचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य होता... 

कदाचित भुतांच्या गोष्टीमुळे👹👿☠️👻तिथे कुणीच फिरकत नसावं.... असं वाटून त्या झाडाच्या दिशेने देवेंद्र चालू 🚶लागला.... 

बघूयात काय होते पिंपळाच्या झाडाखाली 🌳जाऊन असा विचार करत असतानाच झाडाच्या मागच्या बाजूने एका स्त्रीची 👤सावली त्याला दिसली... 

सावली दिसल्याने स्वतःची चाहूल लागू न देता हळूच तो झाडाच्या मागच्या दिशेने आला....

 पाहतो तर काय एक गोरीपान सुंदर स्त्री🙎‍♀️ आपले लांबसडक केस उन्हामध्ये🌄 वाळवत होती...तीने लाल रंगाची साडी घातलेली होती..त्यावर सोनेरी रंगाची किनार आणि सोनेरी रंगाचा ब्लाउज तीने घातलेला होता....  अगदीच कमनीय बांधा होता.... तीचा चेहरा म्हणजे एकदम सुबक आकृती सारखा होता... 

 ती स्त्री इतकी सुंदर होती की देवेंद्र आपले देहभान विसरून तिच्याकडे पहायला लागला होता.... 

तितक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या झुळूक सोबत त्याला कुणीतरी देवेंद्र असा अस्पष्ट आवाज ऐकू आल्यासारखा वाटला...

त्या आवाजाच्या भासाने त्याची तंद्री तुटली... त्या स्त्रीला आवाज देत देवेंद्र म्हणाला काय हो बाई तुम्हाला भीती वाटत नाही का?? गावातले लोकं म्हणतात की इथे भूत आहे म्हणून !!! 

तीने वळून बघितले आणि ती जोरजोरात हसायला लागली😂😂😂... इथे कुठे भूत आहे तूला दिसले का?? 
देवेंद्रने नकारात्मक मान हलवली.... 

काहीपण म्हणतात इथले लोक !! भूत असतं तर मला दिसलं असतंना मी तर नेहमीच इथे येते.... 
देवेंद्र :तुझे नाव काय आहे?? 

"नयन" माझे नाव... चल माझी आई माझी वाट पहात असेल असं म्हणून ती निघून गेली...

 तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे देवेंद्र मात्र बघतच राहीला होता.... ती जातानाही एक वाऱ्याची झुळूक आली आणि देवेंद्र नावाचा अस्पष्ट असा आवाज त्याला पुन्हा ऐकू आला.... 

नयनच्या विचारात गुंतलेल्या देवेंद्रला चालत चालत आपलं घर 🏡कधी आलं हे कळलंच नाही... त्याचं मन कशातच लागत नव्हतं... 

देवेंद्र प्रथमदर्शनीच नयनच्या प्रेमात पडला होता... स्वतःचं देहभान हरवून गेला होता... कुठे राहात असेल?? काय करत असेल ही नयन हिच्याबद्दल कुणाला माहिती असेल?? सतत देवेंद्रच्या मनात तेच तेच आठवणींचे चक्र आणि तेच तेच प्रश्न फिरत होते.... 

रात्रभर या अडंगावरून त्या अडंगावर करत देवेंद्रला झोप लागलीच नाही... देवेंद्र नुसता तळमळत होता... 

त्याला कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाच्या झाडाकडे 🌳जातो असे झाले होते.... 

एकदाचा दिवस उजाडला... 🌅

देवेंद्र पहाटेच आवरून गावाच्या वेशीबाहेर गेला... पिंपळाच्या 🌳झाडाजवळ गेला.... 

तिथे त्याला कुणीच दिसलं नाही.... 

थोडया वेळाने पुन्हा तीच मंद वाऱ्याची झुळूक आणि देवेंद्र असा आवाज... या वेळेस मात्र तो आवाज स्पष्ट होता... भास नव्हता...

 त्या आवाजाची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा चेहरा एकदम खुलला समोरून त्याला नयन🚶‍♀️ येताना दिसली... 

तिला पाहताच तो त्याला आलेल्या आवाजाबद्दल विसरून गेला.. 

त्याने लागलीच तीला आवाज दिला... नयन देवेंद्रला म्हणाली अरे इथे भूतं 👻👻आहेत असे तुमचे गावकरी म्हणतात ना..
 मग तू पून्हा कसं काय इथे आलास?? तूला भीती 😱वाटत नाही का?? 

देवेंद्र नयनला म्हणाला !! माझा नाही भुताखेतांवर💀☠️ विश्वास.. 

नयन :अस्स ! मी तर ऐकलं भुतं☠️ रात्री🌌 येतात... आणि अमावास्येच्या 🌌दिवशी तर नक्कीच येतात... खरं आहे का ते? 

देवेंद्र :मला नाही माहित.... अगं नयन मी नौकरीसाठी शहरात राहतो... माझ्या भावाचा मृत्यू झाला म्हणून मी आलो आहे... मला गावकऱ्यांनी सांगितलं की त्याचा मृत्यू इथल्या भुतामुळे 👻झाला आहे... पण मी नाही मानत भूत ☠️बित....
बर ते सोड ना तू इकडे कुठे राहतेस??? 

नयन :तूला यायचे आहे का??  चल मी तूला घेऊन चलते पण त्यासाठी तूला संध्याकाळी माझ्यासोबत यावे लागेल... कारण आता माझी आई घरी नाहीये... तिची पण भेट होईल.. 

देवेंद्र :तूझ्या घरी कोण कोण असतं?? तुझा फोन नंबर 📱तरी दे !!
नयन :अरे थांब थांब मी रात्री सगळ्यांचीच ओळख करून देते...फोन नंबरही देते.📱..  

देवेंद्र :चल भेटू या पुन्हा म्हणून देवेंद्र घरी🏡 आला... त्याचे पिंपळाच्या झाडाजवळ🌳 जाणे हे आता त्याच्या घरी माहिती झाले होते.. 

देवेंद्रचे वडील आता देवेंद्रला रागवायला😡 लागले... तूला कळत नाही का रे कश्याला त्या झाडाच्या 🌳नादी लागतो....
 आता मला तूला गमवायचं नाहीये.... असं म्हणत त्याची आई 😭 रडायला लागली.... 

देवेंद्रने मोठया मुश्किलीने त्याच्या आई आणि बाबांची समजूत काढली... आणि संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहू लागला.... 

संध्याकाळ झाली ठरल्याप्रमाणे देवेंद्र पिंपळाच्या झाडाकडे 🌳आला.... पुन्हा तीच वाऱ्याची झुळूक तोच स्पष्ट अशी देवेंद्र नावाची हाक आणि समोर नयन.... 

नयनला बघून पून्हा देवेंद्र देहभान हरवला🙎‍♀️... तिच्याकडे एकटक बघायला लागला...

 अचानक नयन जोऱ्यात चिरकली... देवेंद्र मला वाचव... असं ओरडायला लागली तितक्यात देवेन्द्र नयनकडे पळाला🏃!! 
तोच नयनने अक्राळ विक्राळ रूप🧟 धारण केले.. जोरजोऱ्यात हसायला लागली👹😂😁😁..तीने गर्रकन पूर्ण मान वळवली... . आणि म्हणायला लागली... देवेंद्र तूला माझा नंबर हवा आहे ना.📱..असे म्हणून पुन्हा हसायला 😁😁😄लागली.... 

 तिचा आवाज भारदस्त होता.... नेहमीसारखा नव्हता... आणि ती देवेंद्रला म्हणायला लागली....... तूम्ही पुरुष🙍‍♂️ मेले सगळे सारखेच जरा कोणी चांगलं दिसलं की, केला तीचा पिच्छा... आता मी तूमचा पिच्छा करते असे म्हणत पून्हा जोरजोऱ्यात हसायला 😂😂😂लागली.... 

देवेंद्रची घाबरगुंडी 😰उडाली... तो लटलट कापायला लागला.... पळण्याचा 🏃प्रयत्न करायला लागला... पण त्याचे पाय उचलले नाही.. तो एकदम थंड पडला आणि तिथेच बेशुद्ध पडला... 

सकाळी देवेंद्र उठला🛌 बघतो तर काय???  तो त्याच्या घरी होता.... त्याच्या आईने गरम गरम चहा☕️ करून आणला... 

देवेंद्रचे बाबा : देवेंद्र तूला मी पिंपळाकडे 🌳जाऊ नको म्हणालो होतो. का गेलास तिथे?? बरं झालं पहाटे आपला सालगडी 👨‍🌾जवळून जात होता त्याने तूला पाहिलं नाहीतर काही खरं नव्हतं.... आणि मग तुला उचलून बैलगाडीत आणलं... थोडं तरी आठवतं का तूला.??

देवेंद्र :रात्री घडलेला प्रकार आठवायला🤔 लागला... ते आठवलं की त्याच्या काळजात धस्स होई... बापरे किती भयंकर होतं ते... नयन 🙎‍♀️आणि भूत👹?? 

 देवेंद्रने नयनबद्दल वडिलांना विचारायला सुरवात केली... बाबा ही नयन कोण हो?? 

देवेंद्रचे बाबा :देवेंद्र तूला नयन भेटली?? दिनेश ला पण भेटली होती... तू पण ना !!अरे ही तीच नयन आहे जी एका वर्षापूर्वी गावातल्याच एका माणसाने विष देऊन मारली होती.... 

देवेंद्र :का बरं?? विष देऊन मारण्याचं कारण?? 

देवेंद्रचे बाबा : ती खूप विकृत होती... ती गावातल्या तरुण 🙍‍♂️पोरांना नादी लावायची आणि तो तरुण तिच्यात गुंतला की त्याला सोडून द्यायची... 

देवेंद्र :असं वागण्याचं कारण?? 

देवेंद्रचे वडील : कदाचीत बदला घेत असावी.. ... तिच्या आईला एका सावकाराने असाच धोका दिला होता.... आणि त्यातूनच नयनचा जन्म झाला होता.... सावकाराने तीचे पितृत्व नाकारले होते... असा सगळा एकंदर अंदाज आहे.... 

देवेंद्र :याला उपाय?? 

देवेंद्रचे वडील :माहीती नाही म्हणून तर तिथे भूतबाधा ☠️होत आहे...कुणालाच उपाय सापडला नाही आणि कृपा करून तू उद्याच शहरात जा... कारण येत्या आमावस्येला 🌌ते भूत तूला सोडणार नाही... 

देवेंद्र :म्हणजे?? 

देवेंद्रचे वडील :दिनेश सोबतही असेच झाले... आधी नयन 🙎भेटली आणि मग अमावस्येच्या 🌌दिवशी आपोआपच त्याला घेऊन गेली... त्याच्या डोक्यावर परिणाम झाला... आणि त्याने विहिरीत उडी टाकली.... हे सांगताना त्यांना गलबलून आले.. डोळ्यातून😭 अश्रू वाहायला लागले.... 

देवेंद्र :आता आपलंही काही खरं नाही...आपण शहरात गेलेलेच बरे असे वाटून त्याने दुसऱ्या दिवशी शहरात जाण्याचा निर्णय घेतला... 

सकाळीच पॅकिंग🎒 करून तो शहराकडे निघाला... पण घरून निघताच त्याची गाडी 🛵पंक्चर झाली... आणि त्याची बस 🚍निघून गेली... त्याच्या जाण्यासाठी इतके विघ्न येत होते की जनू काही त्याला अप्रत्यक्षरित्या कुणीतरी अडवत होते....  

देवेंद्र आता पुरता फसला होता... नयनच्या चक्रव्युव्हात तो अडकला होता... त्यातून बाहेर निघणे त्याला आता कठीण वाटायला लागले होते 

 तितक्यात त्याचा एक मित्र "किरण" दिनेश चा मृत्यू झाला म्हणून त्याला भेटायला आला.... 

मित्र आला म्हणून देवेंद्रला थोडा मानसिक आधार वाटला... पण आपले आता काय होईल ह्याची भीती देखील त्याला वाटायला लागली होती....

 देवेंद्रने घडलेला सर्व प्रकार किरणला सांगितला... ... 
किरणला सगळं काल्पनिक वाटत होतं.... त्याचा देखील भुतांवर☠️ विश्वास नव्हता... भूत👻 कसं दिसतं हे त्याला बघायचं होतं.... 

रात्र झाली की आपोआपच नयनच्या ओढीने देवेंद्र गावाच्या वेशीबाहेरील पिंपळाकडे 🌳जाऊ लागला होता... तो भानावर नव्हता...

 देवेंद्रला असं चालताना पाहून त्याचा मित्र किरण 🏃देखील त्याच्या मागे मागे जाऊ लागला... 

देवेंद्र आणि त्याच्या मागे किरण असे दोघेही पिंपळाच्या झाडाजवळ🌳 आले.... 

पून्हा तीच वाऱ्याची झुळूक पून्हा तीच स्पष्ट अशी देवेंद्र नावाची हाक आणि तिथे अवतरलेली सुंदर नयन🙎‍♀️.... आता नयन देवेंद्र जवळ आली त्याच्यावर काही वार करणार इतक्यात तीने किरणला बघितले👀..... किरणला बघून ती चिरकली..... रागाने लालबुंद 😠😠झाली... पून्हा असे काय झाले की ती घाबरली 😢आणि तिथून पळून गेली🏃‍♀️.... 

देवेंद्र भानावर आला.... पिंपळाच्या झाडाखाली 🌳स्वतःला पाहून जाम घाबरला.... तितक्यात चल मित्रा घरी जाऊ असा किरणने आवाज दिला.... किरणला बघून देवेंद्रच्या जीवात जीव आला.... 

घराकडे जात असताना एक कमंडलू घेतलेला साधू महात्मा त्यांना भेटला...

त्यांना बघून" हर हर महादेव" असं म्हणायला लागला !

मग हळूच त्या साधूने देवेंद्रला विचारले :हा तूमचा मित्र तृतीयपंथी आहे का हो?? 

देवेंद्रला त्या साधू महात्म्याचे तसे विचारणे बिलकूलच आवडले नाही.... तो म्हणाला महाराज मी आपला आदर करतो... पण हा कुणीही असो... मनुष्यच ना... तूम्ही असं कसं विचारताय?? 

साधू महात्मा :देवेंद्र बाळा गैरसमज करून घेऊ नकोस... बड्या बड्या साधू महात्म्याला जे जमलं नाही ते आज याने करून दाखवलं... त्या नयन भूताला👻 घाबरवलं.... 

देवेंद्र :काय??  

साधू महात्मा : हो, तू नाहीतर आज तिच्या पूर्णपणे कचाट्यात सापडला होतास... आणि उद्या तर अमावस्या🌌... उद्या पून्हा ती प्रयत्न करेल... तूला पूर्णपणे अडकवण्याचा... 

देवेंद्र : मनातून खूप घाबरला... त्याने साधूना विचारले त्यावर काही उपाय?? आणि ती माझ्याशी असं का वागत आहे?? मी तर कुणाचच काही वाकडं केलं नाही !!

साधू महात्मा : या तूझ्या मित्राने त्या भूताला पळवून लावल्यावर🏃‍♀️... पौराणिक ग्रंथामध्ये लिहिलेल्या श्लोकाचा अर्थ मला समजला. 

त्यात लिहिले होते की या वाईट शक्ती चा नायनाट हा फक्त एक तृतीयपंथच करू शकतो.... ते देखील अमावस्येच्या रात्री  !!अर्धनारीश्वर देवतेची पूजा त्याच पिंपळाच्या झाडाखाली पिंड मांडून केली तर !!

ती जे वागतेय ते तिच्या आईला झालेल्या धोक्यामुळे आणि सावकाराने तीचे पितृत्व नाकारल्याने... 

तिला वाटायचे सगळे पुरुष धोकेबाज असतात... म्हणून ती जिवंत असतानाही हेच करायची.... पुरुषांना आकर्षित करायची आणि तो गुंतला की त्याला धोका द्यायची.. ... मग एकाने रागारागात तीला जेवणात विष देऊन मारली पण मेल्यानंतरही तीने पिच्छा सोडला नाही.... 

देवेंद्र :असं आहे तर !! आणि दिवसा भेट झाल्यावर तीने मला रात्री का बोलावले होते?? 

साधू :रात्री तिची शक्ती अफाट असते... त्यामुळेच तर तू हे गाव सोडून जाऊ शकला नाहीस... 

देवेंद्र :तुम्हाला सगळंच माहीती.... 

साधू :गावातील पहिल्या घटनेपासून मी या गोष्टीचा अभ्यास करतोय... त्यामुळे सर्व गोष्टी बारकाईने पाहतोय... आणि किरण तुझ्याच हातात गावकऱ्यांची सुटका आहे.....

किरण :मला काय करावे लागेल??


साधू :" किरण "कमंडलू घे, यात गंगाजल आहे... उद्या अमावस्या🌌 आहे... उद्या रात्री बरोबर आठ 🕗वाजता हे गंगाजल घेऊन तू निघायचं... 

देवेंद्र 🙍‍♂️तर भानावर नसेलच तो आधीच निघाला असेल.... तू तुझे काम करायचे... घरून निघालास की सरळ गावाच्या वेशीबाहेर यायचं.... 

लक्षात ठेव तू मागे वळून बघायचं नाही.... तूला चित्र विचित्र आवाज🔊🎼🎻🥁येतील... ओळखीचे आवाज ऐकू येतील... लक्षात ठेव हा तूला विचलित करण्याचा प्रयत्न असेल... तू विचलित झाला की देवेंद्रचा मृत्यू निश्चित आहे हे लक्षात घे... 
एकदा पिंपळाच्या झाडाखाली 🌳आलास की मग तूला कोणी थांबवू शकणार नाही...

 तिथल्या रेतीची हे गंगाजल वापरून पिंड स्थापित करायची आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणायचं.... बस्स नयनची आत्मा कायमची निघून जाईल... तुझा मित्र तर वाचेलच... पण पूर्ण गाव तिच्यापासून मुक्त होईल.... 

खरं तर किरण देखील मनातून घाबरला😢 होता... पण जर पूर्ण गाव यातून मुक्त होणार असेल तर.... जाऊदे आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही... त्यामुळे कुठल्याही तृतीयपंथीला कमी लेखले जाणार नाहीत.... 

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे किरण रात्री आठ वाजता🕗 कमंडलू हातात घेऊन निघाला...

 देवेंद्रतर भान हरवून अर्ध्या तासापूर्वीच तेथून निघून गेला होता... 

किरण रस्त्याने जात असताना खूप चित्र विचित्र आवाज🔊🎼🎻 येत होते... कधी पक्षांचा चिवचिवाट,🐦🐤🐓 तर कधी मांजरीची म्याव🐈, तर कधी कुत्र्याचा आवाज 🐕तर कधी घुबडाचे ओरडणे🐽... 

तरी किरण पक्का होता त्याने मागे वळून बघितले नाही... 

तितक्यात त्याला देवेंद्रने आवाज दिला... "किरण "हाक ऐकून एकदम थांबला... पण त्याला त्या क्षणी साधूचे ते वाक्य आठवले... (विचलित झालास की देवेंद्र... ) ओम नमः शिवाय म्हणत तो चालतच राहीला... 

हुश्श पोहोचलो एकदाचे पिंपळाच्या झाडाखाली!! म्हणत त्याने वेळ न दवडता महादेवाची पिंड स्थापित केली व ओम नमः शिवाय असं 108 वेळा म्हणाला... ... 

अचानक वीज ⚡️⚡️चमकावी तसा उजेड झाला... भयंकर स्फोटासारखा आवाज आला... आणि एक मोठा जाळ 🔥🔥🔥🔥झाल्यासारखा दिसला.... 

तितक्यात" किरण " देवेंद्रने आवाज दिला... 

किरण :देवेंद्र तू बरा आहेस ना??  बापरे मी तर खूप घाबरलो होतो... पण जाऊदे आता सगळं चांगलं झालं आहे ना.. 
देवेंद्र :किरण तू होतास म्हणून मी वाचलो... नाहीतर !! दिनेश नंतर माझाही नंबर होताच.... 

शेवटी दोघांनीही महादेवाच्या पिंडीचे दर्शन 🙏🙏घेतले आणि साधू महात्म्याची भेट घेऊन मनापासून आभार व्यक्त केले.... 

"पूर्ण गाव भयमुक्त झाला "

टीप :ही कथा निव्वळ मनोरंजनाचा एक भाग असून तीचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही... 

कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा. 
©® डॉ सुजाता कुटे. 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या