आज कविताने घराबाहेर पडायचे ठरवलेच.... धाकधूक तर खूप होती... कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास तिच्यासोबत नव्हता...
पण ! पर्याय नव्हता... तिला घराबाहेर पडणे भागच होते... कारण तिच्यासोबत धोका झालेला होता...
कविताचा नवरा कविताला व तिच्या दीड वर्षाच्या मुलाला सोडून परस्त्रीकडे निघून गेला होता...
कविता मात्र तशी खूप खंबीर होती.. पण लग्न झाल्यावर जवळ जवळ अडीच वर्ष ती घराच्या बाहेरच पडली नव्हती... तिने स्वतःला संसारात वाहून घेतले होते....
नवऱ्याकडून धोका झाल्याची कल्पना कविताने आपल्या आईवडिलांना दिली... पण त्यांच्याकडून देखील कविताला म्हणावं तसा प्रतिसाद मिळाला नाही...
त्यामुळे आता रडून पडून चालणार नाही... आपल्याला हातपाय हलवावे लागणार हे तिच्या चांगले लक्षात आले... इतक्या बिकट परिस्थितीतही कविता डगमगली नाही....
फक्त लढायचं आणि आपल्या बाळाला छान आयुष्य द्यायचं इतकंच तिने ठामपणे ठरवलं....
पण करायचं काय?? हा तिच्याकडे मोठा प्रश्न होता... तसं तीने लग्नाआधी फॅशन डीझायनिंगचा कोर्स केलेला होता... पण स्पर्धेच्या युगात ती किती टिकेल याची तिला गॅरंटी नव्हती..
कुठल्यातरी बुटीक पासून आपण आपल्या कामाला सुरुवात करू जेणेकरून लेटेस्ट डिझाईन काय चालू आहेत... लोकांची काय आवड आहे?? हे आपल्याला समजेल या हेतूने ती शहरातील प्रत्येक बुटीकला भेट देऊन नौकरी मिळते का ते बघू लागली...
पण दुर्दैव तीला कुठे नौकरीच मिळेना.... शेवटी दमून ती एका ठिकाणी रस्त्यावरच चहावाल्याकडून चहा घेत होती.... .
कविताच्या बाळाला कविता शेजारणीच्या घरी सोडून आली होती... आणि आता शेजारणीने बाळाला सांभाळण्याची वेळेची डेडलाईन संपत आलेली होती.... त्यामुळे घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता...
कविता चहा घेत होती तिथे समोरच ड्रेस डिझाईनिंगचे काम सुरु होते...
चहा घेता घेता सहजच तिची नजर तिथे गेली...
म्हणतात ना जिथे आपली आवड असते तिथे आपली बरोबर नजर जाते... तसं तिच्यासोबत झालं होतं.... तितक्या दुरून न्याहाळत असताना समोरची व्यक्ती ड्रेस उलट्या पद्धतीने डिझाईन करत आहे हे तिच्या दुरून लक्षात आले....
ती धावतच त्या कंपनीत गेली... आणिड्रेस चुकीच्या पद्धतीने डिझाईन होत आहे असे तिने सांगितले... ड्रेस तयार करताना काय चूक होत आहे हे ती सांगायला लागली....
सुरवातीला ते कुणी मान्यच केलं नाही... पण मग एका पेपरवर कविताने प्रात्यक्षिक करून दाखवल्यावर सर्वाना तिचं म्हणणं पटलं.... त्या कंपनीचा मालक कवितावर जाम खूष झाला...
त्या कंपनीत तिला डिझायनर म्हणून नेमल्या गेलं... जिथे ती पाच हजारावर नौकरी करणार होती तिथे आता तिला महिन्याचे बारा हजार रुपये मिळणार होते... आणि तिची पगार कंपनीला होणाऱ्या फायद्यानुसार वाढणार होती...
बाळाला आता कविता पाळणाघरात ठेऊ शकणार होती.... त्यामुळे तिची कमावण्याची आणि बाळाला सांभाळण्याची अशी दोहेरी काळजी मिटली होती....
कविता दिसायला तशी साधारण बरी होती.... नाकी डोळी नीटस गहू वर्णाची होती.... पण स्वभाव मात्र एकदम मनमिळाऊ बेधडक,.. सर्वाना आपलंस करून घेणारी होती...
त्यामुळे साहजिकच ती सगळ्यांना आवडती झाली होती....
हळूहळू कविताने डिझाईन केलेले कपडे सगळीकडे प्रसिद्ध होऊ लागले होते.... तिच्या कंपनीला तिच्या डिझाईन मुळे एक ब्रँड मिळाला होता.... त्यामुळे ती आता झपाट्याने प्रगती करू लागली होती....
हजारांपासून सुरुवात केलेली तिची कमाई आता लाखांवर पोहोचली होती.... त्यामुळे कविता आता चांगलीच स्थिरस्थावर झालेली होती... हे फक्त सहा महिन्यात झाले होते....
तिची ही प्रगती तिच्या नवऱ्यापासून लपली नाही....
वाईट हेतूने त्याने तिला एकटीच वाऱ्यावर सोडून दिल्यावर त्याचही दिवाळखोरं निघालं होतं.... म्हणतात ना जश्यास तसे.... तिच्या नवऱ्यालाही त्या परस्त्रीने धोका दिला होता....
मग काय?? कविताचा नवरा आला पून्हा कविताकडे.... सहा महिन्यात इतका बदल झालेला होता... की त्याच्या बाळाने देखील त्याला ओळखले नाही....
कविताच्या नवऱ्याचा अवतार म्हणजे मळके कपडे, दाढी वाढलेली असा होता... उलट त्याचा बाळ त्याला घाबरत होता...
कविताला देखील त्याची कीव आली... पण धोका झाल्याने ती आपल्या मतांवर ठाम होती....
सोन्याहून पिवळे म्हणजे बाळाने ओळखले नाही त्यामूळे तीने सरळ नवऱ्याला बाहेरची वाट दाखवली.... माझ्या घरात येऊ नकोस नाहीतर पोलिसांकडे तक्रार करेल..... अशी सरळ सरळ तंबी दिली... आणि त्याला घराबाहेर हाकलून दिले....
आता मात्र कविताच्या हितचिंतकांना जाग आली.... आणि म्हणायला लागले... असं कुठे असतं का?? नवऱ्याला घराबाहेर हाकलून देतात का?? फारच गर्विष्ठ बाई आहे.... पैसा आलाय म्हणून माजली आहे.....
हे ऐकून कविताच्या माहेरचे लोकं देखील कविताला समजावण्यासाठी आले...
कविताची आई कविताला म्हणाली कितीही केलं तर नवरा आहे तूझा असं त्याच्यासोबत वागू नये.... अश्याने तुझ्यासोबत आमचीदेखील बदनामी होईल.... तूझ्या छोटया बहिणीशी कोण लग्न करेल??
आता मात्र कविताचा संयम सुटला.... तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली...
ती तिच्या आईला म्हणायला लागली... आई !तू माझी आई आहेस का वैरीण?? कुठे होता तूम्ही?? जेव्हा याच नवऱ्याने मला आणि बाळाला एकटं सोडलं होतं तेव्हा.... कुठे होता तूम्ही?? जेव्हा आम्हा दोघांना तुमची जास्त गरज होती.... आधार हवा होता.... आज बरं तूम्हाला मीच अयोग्य वाटत आहे... कोणत्या शास्त्रात असं म्हटलं आहे?? की मोठया मुलीचा बळी देऊन छोटया मुलीला सुखी करावे....
आता कुठेतरी मी स्थिरस्थावर झाले आहे..... माझी मी आनंदी आहे... मला कुणाच्या सोबतीची गरज नाहीये.....
लवकरच मी घटस्फोट घेऊन या बंधनातून मुक्त होणार आहे... घटस्फोट घेतला तरच माझा नवरा मला येऊन त्रास देणार नाही....
तूम्हाला हे जर पटत असेल तर ठीक..... नाहीतर तूम्ही येऊ शकता.....
"मला एक प्रश्न पडतो ज्यावेळेस कविताला गरज होती त्यावेळेस तीने तिची लढाई एकटीने लढली.... नवऱ्याने इतका धोका दिला.... तेव्हा कुणी साधी कविताची विचारपूस ही केली नाही.... आणि त्याला कविताने घराबाहेर हाकलले.... तर त्या गोष्टीची इतकी चर्चा झाली.... तीच दोषी ठरली.... ही मानसिकता बदलणार कधी??
लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा.
©® डॉ. सुजाता कुटे
0 टिप्पण्या