वृंदा नौकरीच्या शोधात एका खाजगी कंपनी आली होती...
पेपरमध्ये तीने त्या कंपनीची walk in interview ची जाहिरात बघितली होती...
त्यामुळे आपला सी.वी. घेऊन ती त्या कंपनीत आपले नशीब आजमावण्यासाठी गेली...
पण तिथली गर्दी बघून काढता पाय घ्यावा की काय असा विचार करत असताना प्रत्येक व्यक्ती ऑफिस केबिन मधून अगदीच दर अर्ध्या मिनिटात बाहेर पडताना दिसत होती...
वृंदाला वाटले अश्या गतीने जर interview झाले तर आपलाही तासाभरात interview होऊन जाईल...म्हणून तीने आपला सी.वी. तीने सबमिट केला... शेवटी आपले नशीब
वृंदाला खरंतर नौकरीची खूप गरज होती... तिची विधवा आई सतत आजारी राहात असे... आणि भाऊ नुकताच बारावीत गेला होता... त्याच्याही शिक्षणाचा खर्च वाढला होता... आई पेन्शनर होती... पण ती पगार काही पुरत नव्हती....
वृंदा तिथेच असलेले मॅगझीन चाळत बसली होती...
अगदी अर्ध्या तासातच वृंदाचा नंबर आला....
वृंदाने मनोमन गणपतीला वंदन केले आणि केबिन कडे जाण्यासाठी निघाली....
केबिनमध्ये जात असताना वृंदला एका मोठया पॅसेज मधून जावे लागले... तीने पाहीले त्या पॅसेज मध्ये कुणीही नव्हते... तरी दोन पंखे चालू होते... दिवसा ढवळ्या लाईट चालू होते.... तीने सवयीप्रमाणे ते बंद केले आणि केबिन मध्ये शिरली....
वृंदा :may i come in sir?
बॉस(जय ) : there you are, अभिनंदन तूला नौकरी मिळाली..
वृंदा :प्रश्नार्थक चेहऱ्याने??
बॉस(जय ) : आश्चर्य वाटले ना? तूला काही प्रश्न न विचारताच तूला सिलेक्ट कसेकाय केले.
वृंदा :उत्तराची वाट बघू लागली.
बॉस (जय ): मी तूझा सी वी बघितला... आमच्या कंपनीच्या गरजेनुसार तो योग्य होता... पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे तू एकटीने एका जबाबदार व्यक्तीसारखे पंखे आणि लाईट बंद केले... म्हणजे तू अगदी स्वतःचं समजून हे केलंस... अशीच व्यक्ती आम्हाला पाहीजे होती..
वृंदाला अगदी दुसऱ्या दिवसापासून कामाला बोलावले गेले...
वृंदा मन लावून काम करायची...ती कधी कुणाला तक्रार करण्याची संधी देत नसे... त्यामुळे सगळेच जन तिच्या कामावर खूप खूष होते...
कंपनीतील कामाव्यतिरिक्त वृंदा सगळ्यांची आपुलकीने चौकशी करायची त्यामुळे ती चहावाल्याच्या राजू पासून ते बॉस जय पर्यंत सर्वांचीच आवडती झाली होती.
जयला कळत नकळत वृंदाची खूप सवय झाली होती. तिच्याशिवाय त्याचे पानच हलत नव्हते.
एक दिवस वृंदाचा बालमित्र अनिकेत तिला खूप दिवसांनी भेटायला तिच्या कंपनी मध्ये आला.
अनिकेत एकदम राजबिंडा, गोरा डॅशिंग लूक असणारा एकदम स्टायलिश असा होता.त्याला पाहताच तिच्या कंपनीतील सर्वजण इंप्रेस झाले...
अनिकेत एकदम वृंदाच्या बाजूला उभा राहीला.वृंदा त्याला पाहून खूप खूष झाली.
त्याने वृंदाला आवाज देताच ऑफिस मधली सगळी मंडळी आवक झाली.
वृंदाकडे बघायला लागली.
वृंदाने जयची परवानगी घेतली आणि अनिकेत सोबत ती बाहेर पडली.
ती बाहेर पडते न पडते तोच कंपनीतील सगळ्या लोकांची कुजबुज सुरु झाली.
कोण असेल तो? भाऊ नाही तीचा भाऊ तर बारावीत आहे. बॉयफ्रेंड?? की होणारा नवरा?? सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
वृंदाच्या कंपनीमध्ये होणारी तिची कुजबुज जयच्या कानावर पडली. ते ऐकून पहिल्यांदा जयच्या मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. त्याला असुरक्षित वाटायला लागलं.आपलं माणूस दूर तर जात नाही ना याची भीती निर्माण झाली.
जय( स्वगत ):मला हे काय होत आहे?? वृंदा तर आपल्या कंपनीतील फक्त एक एम्प्लॉयी आहे. आणि तिच्याबद्दल इतका विचार? तिचा बॉयफ्रेंड असो की नवरा आपण का इतकं अस्वस्थ झालो आहोत?? जयराव कामाला लागा उगाचच इकडे तिकडे भटकू नका असं म्हणत जयने कसंबसं आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं.
पण वृंदाचा विचार काही केल्या त्याच्या डोक्यातून जाईना. रात्रभर वृंदाच्या विचाराने त्याला झोपच लागली नाही.जय कमालीचा अस्वस्थ झाला. हे प्रेम तर नाहीना असं म्हणत स्वतःशीच गोड हसला.
पहाटेच सूर्याच्या किरणासोबत एक नवीन उत्साह घेऊन जय घराबाहेर पडला. नाश्ता करण्याचे भान देखील त्याला राहीले नाही...
क्रमश :
भाग 2 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇https://www.swanubhavsaptarang.com/2020/04/2.html
©®डॉ सुजाता कुटे
0 टिप्पण्या