जयला मनातून असे वाटत होते की वृंदा पून्हा येईल आणि सगळं सुरळीत होईल....
जय :आई मला जरा सावरायला वेळ हवा आहे....
जयची आई :अरे मी तूला उद्याच लग्न कर असं म्हणत नाहीये.... पण चांगली मुलगी हातची जायला नको...
हे बघ जय नुसतं ठरवून तरी ठेवू....
जय :खरं सांगू आई, माझं काही डोकंच काम करत नाहीये, वृंदाचा इतका राग येतोय ना.... का वागली असेल गं ती अशी... मी कुठे चुकलो??
जयची आई :परत वृंदा?? अरे जय तूला ती deserve करत नाही... तू नको रे बाळा तीचा जास्त विचार करू.... तिची लायकी नाहीये आपल्या घरी येण्याची....
जय :हं
जयची आई : मग आम्ही अनामिकाला रीतसर मागणी घालायला जाऊ ना??
जय :आई थोडी घाई होते आहे असे नाही वाटत का तूला??
जयची आई :तसं नाही जय.... उगाचच चांगलं हातचं स्थळ जायला नको....
जय : मी तर चुकलोय, तूला जे योग्य वाटते ते कर.... मला मान्य आहे सगळं...
जयचा होकार मिळताच जयचे आईवडील अनामिकाला रीतसर मागणी करण्यासाठी घराबाहेर निघाले....
जयचं मन मात्र काहीच मान्य करत नव्हतं.... त्याला वृंदाच हवी होती.... पण.... त्याला अनामिकाला आपण धोका तर देत नाहीये ना हा देखील प्रश्न पडला होता..सगळ्या गोंधळामुळे थकून त्याला दुपारीच झोप लागली....
तासादीडतासाने जयची आई घरी परत आली.... आणि जयला उठवायला लागली.... जय उठ... बघ माझ्यासोबत कोण आलं आहे??
जय ने त्याचे डोळे किलकिले केले... डोळे चोळून बघू लागला.... कोण?? वृंदा तू?? इथे??
जय ने स्वतःला चिमटा घेतला... नाही मी पूर्णपणे जागा झालोय....
आता कशाला आलीस?? तूझं प्रेम नाही ना माझ्यावर?? मग बघायला आलीस का मी कसा जगतो आहे ते?? जय त्वेषाने म्हणाला
जयची आई : जय मला माफ कर.... मी तूझी गुन्हेगार आहे.... वृंदाला काहीही नको बोलूस... तीचा काहीच दोष नाहीए....
जय :म्हणजे?? मला काहीच समजत नाहीये.... ती अशी वागली माझ्याशी.. माझा काहीच दोष नसतानाही...
जयची आई :अरे , ती तसं बोलली कारण मी तिला तशी विनंती केली होती....
जयच्या आईने जयला वैभव बद्दल आणि तिच्या अटीबद्दल सांगितले....
जय : आई, म्हणजे तू व्यवहार केलास?? .... का तर वृंदा तूला पसंत नव्हती म्हणून?? ... अगं आई तू नुसताच नकार दिला असतास तरी देखील वृंदा तयार झाली नसती....
जयची आई : हो रे ती माझी खूप मोठी चूक होती.... मला आज समजलं.... असंच समज ना मला आज साक्षात्कार झाला....
जय थोडासा रागाने आणि थोडासा गोंधळून
तो कसाकाय??
जयची आई : आम्ही अनामिकाला मागणी घालण्यासाठी म्हणून निघालो आपल्या गावाच्या वेशीबाहेर येतो ना येतोच काही बुरखाधारी गुंडानी आमची गाडी आडवली.....
बरं झालं तिथे योगायोगाने वृंदा हजर होती....
. वृंदाने दुरूनच पाहिले की तीन चार लोकांनी एक गाडी आडवली आहे....
वृंदाने आपल्या जीवाची पर्वा न करता धावत येऊन त्या लोकांशी दोन हात केले.... छान fight करते रे वृंदा...
त्यातले दोघे जण वृंदाला पाहून आधीच बिथरले होते...
वृंदा : जय अरे हे तेच गुंड लोकं होते.... ज्यांनी आपल्यावर हल्ला केला होता.....
जय : हो का??
जयची आई : हो रे जय तू मला सांगितलं नव्हतंस की या आधी तुमच्यावर हल्ला झालेला आहे...
जय : अगं तू उगाचच परेशान होशील म्हणून नाही सांगितलं... आणि त्या वेळेस देखील वृंदाने मस्त दोन हात केले होते....
जयची आई : पुढे ऐक तर... मग त्यातल्या एकाला वृंदाने पकडून जाब विचारलं.... सांग तूला कुणी पाठवलं.... नाहीतर पोलिसात देईन....
तेव्हा कळालं की हे गुंड म्हणजे तूझ्या चुलत काकाने दिलेली सुपारी होती... आपल्याला मारण्यासाठी... जुना प्रॉपर्टीचा वाद....
इतका वेळ न बोललेले जय चे वडील आता बोलायला लागले... जय बेटा मी तर तिथेच टाळ्या वाजवल्या.... आणि तूझ्या आईला बोललो... हे बघ जयची आई जर तू हिला नकार देशील तर ती सर्वात मोठी घोडचूक ठरेल....जयची पसंत अतिशय योग्य आहे...
आपण अनामिकाला मागणी घालायला नको... मला तर वृंदा सून म्हणून पसंत आहे...
जयची आई : हो जय... मला हिच्याशिवाय चांगली सून मिळूच शकत नाही.....
जयने ते ऐकले आणि वृंदा कडे बघायला लागला....
वृंदाने दुरूनच कान पकडून जयची माफी मागितली.... आणि जयला म्हणाली शेवटी दैवाचा खेळ आहे... जिथे मी कबुली दिली होती की आता तूला मी नाही म्हणनार... तिथेच आज हा सगळा प्रकार घडला...
लवकरच जय आणि वृंदाच शुभमंगल झालं... दोन्ही घरी आनंदोत्सव साजरा झाला.
समाप्त
©®डॉ सुजाता कुटे
0 टिप्पण्या