ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 11)

समीर मीराला असं शरदला बिलगलेलं पाहून पूरता गोंधळला.... 

शरद :असं काय बघतोस समीर?? माझी चांगली ओळख आहे मीराशी.... पण तू तर आज हद्द केलीस फक्त कॉल लिस्ट मध्ये मीराचं नाव बघितलं आणि तडक तिच्यावर आरोप केलेस?? काही पुरावा आहे का? मला माहिती आहे मीरा तूझा काहीच दोष नाही... तू सायलीला काही केलं नाहीस... 

मीरा : हो ना ! मी तेच कधीपासून समीरला सांगण्याचा प्रयत्न करत आहे... पण तो ऐकतच नाही... माझी आणि सायलीची पर्सनल ओळख नव्हतीच कधी की मी फोन करेल....समीर तुझ्यासोबत सायली असताना जी भेट झाली तितकच मी सायलीला ओळखते.... 

शरद :मीरा मला माहित आहे तू निर्दोष आहे... पण समीर फोन नंबरवर अडून बसला आहे ना. 

समीर : मी मीराची सिमकार्ड हरवल्याची तक्रार आहे का ते चेक केलं होतं आणि तिने अशी कुठलीही तक्रार केली नव्हती... ती ते नियमित वापरत होती.... 

शरद : हो??  कुठला नंबर आहे तो? तूझ्याकडे save आहे का? मीराच्या नावाने.... 

समीरने फोन काढून तो चेक केला... आणि नकारात्मक मान हलवली.... 
मीरा:बघू कुठला नंबर आहे तो? 
समीरने नंबर दाखवला... तो नंबर बघताच मीराला एकदम घेरी आली.... शरदनेच तीला सावरलं.... 

तितक्यात इनामदारचा शरदला फोन आला... त्यांचं काहीतरी बोलणं झालं.... 
शरद : मीरा, उठ  आपल्याला बसलेला धक्का जवळजवळ खरा आहे... 

मीरा :काय?? पण का??  कसं शक्य आहे....

समीर : काय म्हणाले इनामदार साहेब?? फोन होता ना.... 

शरद :तूम्ही पकडलेले समुद्री चाचे त्यांनी कबुली जबाब दिला आहे... 
समीर : त्याचं काय आता.... आणि काय संबंध... 

शरद :संबंध कसा नाही समीर?  त्यांनी कबूल केलंय की ते कुणाकुणाला ड्रग्ज सप्लाय करत होते ते... त्यात त्यांनी एक नाव घेतलं आहे..... ती व्यक्ती आणि  मीराचं सिमकार्ड वापरणारी व्यक्ती एकच आहे... 

समीर : कोण??  

शरद : "प्राची देसाई" मीराची प्राचीताई....असं शरदने जड अंतःकरनाणे सांगितलं.... 

समीर: प्राचीताई? समीरला देखील एकदम धक्काच बसला....पण का केलं असेल प्राचीताईने?? तीला काय फायदा होणार होता?? 

शरद : तेच तर!.. तिच्याकडूनच  कळेल आपल्याला.. 
प्राचीची आधार कार्ड वरील जन्म तारीख चुकल्याने तिने ते सीम कार्ड मीराच्या नावावर घेतलेले होते....  

समीर :अच्छा 

शरद :एक गोष्ट सांगू समीर, "प्राची माझी प्रेयसी आहे "... अलीकडे तीचे वागणे बदलले होते... 
 एकदा तिच्या तोंडून मी तूम्हा दोघांचे नाव ऐकले होते...

 मला तेव्हाच संशय आला होता की ती प्राची असावी.... पण माझ्या मनाला वाटत होते की प्राची नसेल कदाचित.... योगायोग असा झाला की मी नेमकेच डिटेक्टिव्हचे काम सुरु केले होते...मला संशय असल्याने मी तूमची केस निवडली.... तूमचा पाठलाग करत होतो..... 

मीरा : प्राचीताई?? मला अजूनही विश्वास बसत नाहीये तीच असेल म्हणून.... 

शरद : मला पण असेच वाटत होतं गं... पण तू थोडं लॉजिक लाव ना तूला देखील समजेल.... हे बघ तूझी ताई तूला कधी विक्षिप्त वाटल्यासारखी दिसली का म्हणजे अमली पदार्थांचं सेवन वगैरे.... 

मीरा :नाही !

शरद :मग ती कुणासाठी खरेदी करत होती??  सायलीच्या अपघाताच्या दिवशी सकाळीच समुद्री चाचेकडून ती खरेदी केली होती.... अशी कबूली चाचे लोकांनी दिली आहे.... 

समीर : आता समजत आहे... आधी सायलीला अमली पदार्थ देण्यात आले आणि मग कदाचीत गाडीत बसवून तसंच गाडी चालू केली असावी.... 

शरद : हं, असावं कदाचीत.... आता प्राचीच बोलेल... पण मीरा तू आता मन घट्ट कर... चाचे लोकांनी प्राचीचं नाव घेतल्यामुळे इनामदार साहेब तीला अटक करायला गेले आहेत... बघूयात काय होतं ते?? 

इनामदार प्राचीच्या फॅशन डिझाईन क्लासेस असणाऱ्या ठिकाणी गेले आणि तिथे प्राचीला अटक केली.... 

क्रमश :
©® डॉ सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या