खेळ कुणाला दैवाचा कळला (भाग 5)


वृंदा रूम मध्ये आली खरी पण आता मात्र ती देखील विचार करायला लागली.... अनिकेत म्हणतो ते खरे असेल का? जय ला मी खरंच आवडत असेल?? पण तसे असेल तर?? 

नको बाबा मोठया लोकांचे मोठे चोंचले आपण तसा विचारच नको करायला..... 
पण खरंच असं असेल तर?? वृंदा कळत न कळत सतत जयचा विचार करत होती....जयचं वागणं तिला थोडंसं वेगळं... असं जाणवत होत.. 
पण प्रत्येक वेळी वृंदा परिस्थितीची तुलना करायची.... स्वतःला म्हणायची वृंदा मॅडम जमिनीवर या....
डिनरची वेळ झाली.... जयने वृंदाला डिनर साठी हॉटेलच्या गार्डनमध्ये बोलावलं.... छान आल्हाददायक वातावरणात दोघांचं जेवण झालं.... दोघांनाही त्या वातावरणात खूप छान वाटत होते... सोबतीला कर्णमधुर संगीताचे बोल कानी पडत होते.... जय आणि वृंदाला दोघांनाही ही वेळ संपूच नये असच वाटत होत..... 
पण गाण्यांची मेहफिल संपली आणि दोघांचीही तंद्री तुटली... पहिल्यांदाच वृंदाला जय सोबत एक आगळा वेगळा आनंद जाणवायला लागला होता....
 वृंदाला जय आता आवडायला लागला होता.... 
वृंदाची जयकडे पाहण्याची नजर आता बदलली होती... 
गाण्याची मेहफिल संपली आणि आता दोघांनाही इच्छा नसताना आपापल्या रूम कडे जाण्याची वेळ आली..
 सोबत नकळत दोघांचा एकमेकांना हातांचा चोरटा स्पर्श झाला... तोच वृंदा लाजून एकदम लालबुंद झाली... येते सर म्हणून धावतच तिथून निघून गेली....दरम्यान तिच्या हृदयाची खूप धडधड वाढली होती.... 
दोघेही रूम्स कडे निघाले जय आपल्या रुमजवळ येतो न येतो तोच त्याला कुणीतरी आवाज दिला... 
मागे वळून बघतो तर तो अनिकेत होता...
अनिकेत : जय सॉरी थोडं पर्सनल बोलायचं होतं... 
जय : चल आपण रूम मध्ये बसू... 
अनिकेत : बसू म्हणजे?? बसायचं का? मला चालेल 
जयने पुन्हा खोटं स्मित केलं....दोघेही रूम मध्ये गेले.. 

जयने रूम मधील फ्रिज मध्ये असलेली व्हिस्कीची बॉटल काढली आणि दोन पेग तयार केले.... 
अनिकेत : वृंदाला ड्रिंक्स घेणं आवडत नाही बरं... आणि जयच्या एक्स्प्रेशन चा अंदाजा घ्यायला लागला... 
जय : एकदम चमकून... म्हणजे?? 
अनिकेत :तूला वृंदा आवडते ना... मला कॅफेटेरिया मध्ये अंदाजा आला होता.... 
जय: व्हिस्कीचा ग्लास एकदम तोंडाला लावला आणि एका घोटात संपवून टाकला... आश्चर्याने अनिकेत कडे बघायला लागला.... 
अनिकेत : अरे जय इतका बावचळू नकोस.. ती माझी फक्त नी फक्त चांगली मैत्रीण आहे....आमचं लहानपण सोबत गेलं इतकंच.... 

 सांग ना जय तूला ती आवडते ना?? 
जयने होकारार्थी मान हलवली 
अनिकेत :मग कधी सांगतोस?? का मी सांगू 
जयने एकदम अनिकेतकडे बघितले 
अनिकेत : हा हा हा... just kidding... तूच म्हण तिला... मी आहे चार दिवस तोपर्यंत तूला काही मदत लागली तर सांग.... 
जय :अनिकेत एक विचारू?? 
अनिकेत : बोल ना 
जय : तूझी नी माझी अगदीच कालची ओळख... तरीही तू मला मदत करतोस... म्हणजे मी खरंच गोंधळून गेलोय.. सॉरी माझा काल जळफळाट झाला होता.... पण काय करणार मला तू तिथे आलास नी जरा असुरक्षित वाटायला लागलं 
अनिकेत : its ok dear, जळफळाट वाटणं नैसर्गिक आहे.. आणि मी तुझ्यासाठी नाही वृंदासाठी इतकं करतोय... 
तूला माहीती जय वृंदा तिच्या वडिलांची खूप लाडकी मुलगी होती.... वृंदा निव्वळ दहा वर्षांची असेल तेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.... माझे वडील आणि वृंदाचे वडील एकदम जिवलग मित्र होते.... 
तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वृंदाचा आणि तिच्या घरच्यांना माझ्या वडिलांनी खूप आधार दिला... जणू वृंदाची जबाबदारीच आहे आमच्यावर 
आणि काल तूझा जळफळाट बघितल्यावर मी वृंदाला तूझ्याबद्दल काय वाटते याचा अंदाजा घेतला.... तिचं तुझ्याविषयीच मत एकदम आदरयुक्त होतं... सर्व काही चांगलंच बोलत होती... 
तूला माहीती जय वृंदा सहसा चुकत नाही... ती माणसं बरोबर ओळखते आणि कालपासून आजपर्यंत मी इथे कॉन्फरन्स मध्ये तूझी तारीफ ऐकत आहे... त्यामुळे माझी... आमची काळजी मिटली.... 
पण जय तू हे सर्व निभावणार ना?? मला एकतर वृंदा दुखावलेली बिलकुल चालणार नाही आणि तुमच्या दोघांच्याही परिस्थिती .... तूझ्या घरच्यांना हे मान्य होईल का?? 
जय : माझे आई वडील माझ्या शब्दाबाहेर नाहीत.... पण माझ्या आईला तिच्या माहेरची सून करायची आहे... त्यामुळे थोडं तिचं मन वळवायला वेळ लागेल.. पण आईच ती... माझ्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नाही.... 
अनिकेत : ठीक आहे मग... तू चालू दे तुझं... माझी काही मदत लागली तर सांग.... best luck..... येतो मी.. bye 
क्रमश :

भाग 6 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

https://www.swanubhavsaptarang.com/2020/05/6.html

©® डॉ सुजाता कुटे.


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या