ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 9)

समीर घरी आल्यावर सायलीच्या सी सी टी व्ही फुटेज सतत बघायला लागला.... 

तिच्या फुटेज बघताना समीर कधी भावनिक होई कधी डोळ्यातून घळा घळा अश्रूना वाट मोकळी करून देई.... 
सतत फुटेज पाहून देखील समीरला सावलीचा काही थांग पत्ता लागत नव्हता..... 

तरी एक एक कडी उकलतेय असच समीरला वाटत होतं...

आज झालेल्या सगळ्या गोंधळात अजितला भेटायचं राहून गेलं होतं.... अजितबद्दल समीरने एका माणसाला माहिती काढण्यासाठी सांगितली होती... त्याला समीरने फोन लावला.... 

त्या माणसाने जी अजित विषयी माहिती काढली ती विशेष अशी नव्हती.... संशय येईल असे काही नव्हती... तरी देखील एकदा खात्री करण्यासाठी समीरने अजितला भेटायचं ठरवलं..... . 

दुसऱ्या दिवशी समीर तडक अजितच्या घरी गेला.... 

अजितनेच घराचा दरवाजा उघडला..... 

समीर : हॅलो मी news रिपोर्टर समीर..... 

अजित : हो तूला कोण नाही ओळखणार?? नेहमीच तूझ्या news बघतो मी.... तूझे news कव्हर आवडतात मला.... 
पण इकडे कसंकाय येणं केलं?? 

समीर : तूझं आणि सायलीचं लग्न ठरलं होतं ना?? 

अजित :हो, पण ती आज हयात नाही... अपघात झाला होता तीचा.... 

समीर : अपघात नाही घातपात..... 

अजित : काय??  घातपात? पण कशासाठी?? 

समीर : मी जरा स्पष्टच बोलतो.... मी आणि सायली लग्न करणार होतो.....तूझं आणि सायलीचं लग्न मोडलं ?? .... 

अजित : म्हणजे तूला काय म्हणायचं आहे समीर?? मी सायलीला मारलं?? ... तेही लग्न मोडलं म्हणून?? 
अरे समीर माझे आणि सायलीचे लहानपणापासूनचे मैत्रीचे संबंध पण लग्नाचं म्हणशील तर ना मला तिच्याशी लग्न करायचे होते ना सायलीला माझ्याशी.... 
आम्ही दोघेही आमच्या वडिलांमुळे शांत होतो.... 

माझं काव्यावर प्रेम आहे मला तिच्याशीच लग्न करायचे आहे... 

आमचे लग्न मोडण्यासाठी मी देखील सायलीला विनवले होते.....

 इतकंच काय ते व्याजाचे चार लाख मी सायलीला देतो तेच पप्पाना दे असंही म्हणालो होतो.... 

पण सायली ठरली स्वाभिमानी तिने ते घेतले नाही.... आणि समीर तू म्हणतोस की मी सायलीला?? अजितच्या डोळ्यात सायली साठी अश्रू होते.... चाणाक्ष समीरपासून ते लपले नाही... समीरने अजितच्या खांद्यावर हात ठेवला.... आणि तिथून निघून गेला.....

समीर (स्वगत): काय यार ज्याला मी गुन्हेगार समजत होतो आणि असं वाटत होतं की सायलीच्या अपघाताला हाच कारणीभूत असावा पण तो तर सज्जन निघाला....

समीर अजितच्या घराबाहेर आला की समोरच त्याला शरद दिसला.... साहजिकच समीरच्या कपाळावर आठ्या पडल्या.... 

शरद : काय झालं.... हा पण??  नाही ना? 

समीरने नकारात्मक मान हलवली 

शरद : मला वाटलंच.... 

समीरने पून्हा चमकून शरदकडे बघितलं.... 

शरद :म्हणजे... माझं सिक्स सेन्स सांगत होतं... 

समीर ते ऐकून एकदम चिडला.... आणि शरदला म्हणाला.... तू जरा शांत बसशील का?? आधीच माझ्या डोक्याचा भूगा झाला आहे आणि आता तू??  

शरदने तोंडावर बोट ठेवले.... बरं बाबा राहिलं.....

समीर : चला आता माझ्या news चॅनेलच्या ऑफिस कडे जाऊ.... आजच्या अपयशाने मी जरा बोर झालो आहे.... 

शरद : ऑफिस आणि मी?? माझे तिथे काय काम?? 

तितक्यात समीरचा फोन वाजला.....समीरने फोन बघितला... इनामदारसाहेब??  यांना आता काय काम असेल?? 

समीर : बोला इनामदार साहेब कशीकाय आठवण केली?? 

इनामदार : आपण सायलीची फाईल रीओपन करत आहोत.... 

समीर :काय?? मी लागलीच येतो पोलीस स्टेशनला.... 

समीर आणि शरद दोघेही पंधरा मिनिटातच पोलीस स्टेशनला पोहोचले... 

समीर तडक इनामदारांच्या केबिन मध्ये गेला.... 

इनामदार : कसं आहे ना समीर जरी मी तूला तोंडी म्हणालो होतो की सायलीची फाईल क्लोज झाली तरी ऑफिशिअली ती पोस्टमॉर्टमचा  फायनल रिपोर्ट आल्याशिवाय क्लोज करत नाही.... 

समीर : हो ती तूमची procedure आहे.... मला माहिती आहे.... त्याचं काय?? 

इनामदार : प्रथमदर्शनी सायलीचा अपघाती मृत्यू झाला आहे असंच वाटत आहे... पण त्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर एक गोष्ट समोर आली आहे.... 

सायलीच्या रक्ताचा आणि व्हिसेराचा  केमिकल एनालिसिस चा रिपोर्ट आला आहे.... त्यात गुंगी आणणारे मादक द्रव्याचा अंश निघाला आहे..... म्हणजे तीने अपघात होण्याच्या आधी ते द्रव्य प्राशन केले असावे.... किंवा तीला दिले गेले असावे..... 

समीर : खूप मोठी गोष्ट हाताशी आली आहे..... आता  जो कोणी आहे त्याचं काही खरं नाही.... त्याची गाठ आता या समीरशी आहे..... 
क्रमश :
©® डॉ सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या