अर्ध्यावरती डाव मोडला.....


#अर्ध्यावरती डाव मोडला..... 

रीयाचे नुकतेच BDS झाले होते....तिची इंटर्नशिप सुरु झाली होती..

इंटर्नशिप जवळच्या मेडिकल कॉलेज मध्ये होती....

आज तीचा इंटर्नशिप चा पहिला दिवस होता... मनात धाकधुक चालू होती....

थोडंसं घाबरत घाबरतच रीया मेडिकल कॉलेज मध्ये पोहोचली.... तिथला सगळा गदारोळ पाहून ती गोंधळून गेली....
कॉलेज मधून गेट च्या आत मध्ये ती आली....
कॉलेज मध्ये पोहोचताच रीयाला एक स्मार्ट, गोरागोमटा, उंच मुलगा दिसला.... तो त्याच्या बाईक जवळ उभा होता

त्याला पाहताक्षणी तीच्या हृदयाचे ठोके एकदम वाढले... तिला त्याला पाहताच पहिल्या नजरेतील प्रेम आहे असंच वाटून गेलं....

रीया मनात म्हणाली, wow !किती हँडसम मुलगा आहे?? असा मुलगा आपल्या आयुष्यात आला तर आपलं आयुष्यच बदलून जाईल....

चला डेंटल डिपार्टमेंट कुठे आहे हे त्यालाच विचारू?? असं विचार करत ती त्याच्या जवळ गेली....

रीया : Excuse me,  डेंटल डिपार्टमेंट कुठे आहे?

तो (रोहीत ) :, नवीन आहेस का? तूला या आधी इथे कधी पाहिले नाहीना म्हणून?? चल मी तूला दाखवून देतो डेंटल डिपार्टमेंट कुठे आहे ते...

रीया तर मनातून खूप खूष झाली... दोघेही डेंटल डिपार्टमेंट कडे निघाले... जाता जाता तीला कळाले की त्याचे नाव रोहीत... त्याचं MBBS झालेले होते आणि तो MD ची तयारी करत होता.....

तितक्यात डेंटल डिपार्टमेंट आलं

रोहीत : हे बघ हे ते डिपार्टमेंट.... तूला काही अडचण आली तर सांग.... चल मला एंट्रन्स एक्सामचा अभ्यास करायचा आहे असं म्हणत त्याने तिथून रजा घेतली....

रीयाला रोहीत भेटल्याने आजचा दिवस म्हणजे तिच्या आयुष्यातील सोनेरी दिवस असच वाटायला लागलं होतं....

त्यानंतर रीया आणि रोहीतची रोज भेट होत असे... कधी कधी कॅन्टीनमध्ये देखील सोबत जात असत..... रीया रोहितवर, अगदी जीवापाड प्रेम करायची .... आणि रोहीत???

रोहीतला रीया आवडत होती....

पण रोहीतने स्वतःला समाजाच्या एका चाकोरीबद्ध वातावरणात बांधून घेतलेले होते....

रोहीत आणि रीयाची जात वेगळी असल्याने सुरुवातीपासूनच त्याने एक अंतर ठेवले होते....
त्याचा एक स्वभाव होता प्रत्येक गोष्ट तो मनात ठेवत असे.... कधीच कुणाला काहीच सांगत नसे अगदी स्वतःच्या मित्रांना देखील तो मोजकेच बोलत असे....

या उलट रीयाचे होते.... ती रोहीतवर प्रेम करते हे जवळ जवळ सगळ्यांनाच माहीती झाले होते.... ती कधी ते लपवण्याच्या भानगडीत पडलीच नाही....

दिवसांमागून दिवस गेले आणि रीयाच्या इंटर्नशिपचा शेवटचा दिवस उगवला.... रीयाने रोहीतला प्रपोज करायचे ठरवले....

रीयाने रोहीतला कॅन्टीनमध्ये बोलावले... रोहीतला अंदाजा आला होता की ती त्याला प्रपोज करणार आहे.... त्याला तीला दुखवायचे नव्हते म्हणून ते दोघे भेटले की त्यानेच सुरुवात केली...

हे बघ रीया मला माहिती आहे तूला काय बोलायचं आहे ते.... आपण ज्या समाजात वावरतो तिथे जातीला खूप महत्व आहे.... म्हणजे मी तरी तसे मानतो... तू खूप चांगली आहेस तूला खूप चांगला मुलगा मिळेल.... आणि मैत्रीण म्हणून तू मला हवी आहेस..... प्लीज तू नाराज नको होऊस.... विचार कर....

रीया : हे बघ रोहीत.... मी तूझ्यावर प्रेम केलं आहे.... मी त्याला मैत्रीचे नाव देऊ शकत नाही.... rather ते देऊन मैत्री या शब्दाचा अपमान करू शकत नाही....
मला हवं तरी काय??  तू तूझ्या आयुष्यात आनंदी रहा... मी जर तूझी मैत्रीण म्हणून राहीले तर  तूझ्या सुखी आयुष्यात ढवळाढवळ केल्यासारखं होईल.... त्या पेक्षा मी इथून पूढे तूझ्या आयूष्यापासून दूर जानेच बरे राहील..... डोळे पूसत पूसत रीया तिथून निघून गेली....

दोघेही जड अंतःकरनाणे आपापल्या घरी गेले....

रीया घरी जाऊन खूप रडली... पण" रीया "परिस्थितीला जबाबदार मानत होती.....

रोहीतचा पोस्ट graduation साठी त्याच कॉलेज मध्ये नंबर लागला.... दरम्यान तो रीयाला खूप मीस करायचा पण ती मैत्री नको असं म्हणाल्याने, आपण फोन तरी कुठल्या अधिकाराने करणार?? असा विचार करून तो फोन करणे टाळत असे....

इकडे रीयाला देखील तो त्याच मेडिकल कॉलेजमध्ये असल्याचा भास होत असे... .... पण ती प्रत्येक वेळेस समाजाला दोष देत अश्रूंना वाट मोकळी करून देत असे....

दरम्यान दोन वर्षांनी रोहीतचे लग्न झाले.... तो संसारात रममाण झाला.... पण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्याने रीयाला जपून ठेवले होते.... त्याला बऱ्याचदा तिची खूप आठवण येत असे पण व्यर्थ.... त्यात रोहीतची बायको थोडी अल्लड आणि बऱ्यापैकी भांडकुदळ होती.... त्याचा मानसिक त्रास देखील त्याला होत असे.... पण स्वभावाप्रमाणे तो या सगळ्या गोष्टींचा राग स्वतःवर काढत असे.... कधी उपाशी राहून तर कधी घराबाहेर राहून तो स्वतःला शिक्षा देत असे.... स्वतः कधीच मन मोकळे करत नसे....

असं करत करत त्याचं MD पण संपलं.... शेवटचा दिवस उगवला आता आपण हे शहर देखील सोडून जाणार.... म्हणजे रीया आपल्याला आयुष्यात पून्हा कधीही भेटणार नाही या विचाराने रोहीत परेशान झाला... शेवटी ना राहून रोहीतने रीयाला फोन लावला....

रीयाचा फोन तिच्या आईने उचलला... रोहीतने रीयाच्या आईला नमस्कार म्हणून मला रीयाशी महत्वाचे बोलायचे आहे असा निरोप दिला.....

रीया फोन विसरून क्लिनिकला गेली होती....घरी  आल्यावर तीला रोहीतचा निरोप मिळाला.... पण रीयाला आता रोहीतला फोन करायची हिम्मत झाली नाही.... तिला रोहीतचे लग्न झालेले माहीती होते...

इकडे रोहीत मात्र स्वतःच्या मनाला खूप खात होता.... आपण रीयाला गमावलंय याचं त्याला सतत दुःख होत होतं... रात्र रात्र तो जागत असे.... त्याचं कशातही मन लागत नसे आणि बायकोचा भांडकुदळ स्वभाव या चक्रव्युव्हात तो पूरता अडकला होता...

खूप प्रेशर वाढले.... रोहीत प्रत्येक वेळेस तणावात रहात असे..

एक दिवस त्याचा ताण इतका वाढला की रोहीतला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.....

रीयाला मात्र यातील काहीच माहीती नव्हते....

काही महिन्यांनी रोहीतच्या बॅचचे गेट..टुगेदर ठरले ....
रीयाला त्याची माहिती मिळाली.... चला आपण भेटून रोहीतला सरप्राईज देऊ असा विचार करून रीया छान तयार होऊन रोहीतच्या बॅचमध्ये गेली....

रीयाला पाहताच रोहीतच्या मित्रांचा चेहरा पडला... रीया मात्र सगळ्यांना एकदम नॉर्मल वाटत होती.... सगळ्यांचे पडके चेहरे पाहून रीयाने विचारले काय झाले???

रोहीतच्या एका मित्राने रोहीत बद्दल रीयाला सांगितले.... रीयाला ते ऐकून एकदम घेरीच आली.... रीया खाली बसली... रीयाने हंबरडा फोडला..... पण व्यर्थ आता तो हंबरडा रोहीत पर्यंत पोहचू शकणार नव्हता....
रोहीतचा डाव देखील अर्ध्यावरती मोडला......
.
सत्यघटनेवर आधारीत.....

जर रोहीतने स्वतःचे मन कुणाजवळ जरी मोकळे केले असते तर
रीयाने रोहीतशी मैत्री ठेवली असती तर
रीयाने पून्हा त्याला संपर्क करून त्याचे काय म्हणणे आहे हे एकदा ऐकून घेतले असते तर... कदाचीत आज परिस्थिती वेगळी असती.... कदाचित रोहीत आज हयात असता....
प्रकाशनाचे व वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव..... share करायचे असल्यास नावासहित share करा....

©® डॉ सुजाता कुटे


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या