किती सांगायचं मला (भाग 15)

तुषारला दीपकने सांगितलेल्या माहीतीमुळे आपण विचार केलाय त्या पेक्षा देखील सगळं वेगळंच आहे हे कळालं होतं...

नंतर दोघांनीही जेवण केले आणि मग आपापल्या घरी गेले...

तुषार ने समायराला मेसेज केला... उद्या सकाळी आठ वाजता ऑफिसजवळच्या बसस्टॉप जवळ जो कॅफे आहे तिथे भेट... मला महत्वाची माहिती मिळाली आहे... ऑफिसमध्ये सांगता येणार नाही... 

समायराने ok असा रिप्लाय केला.... 

सकाळी ठरल्याप्रमाणे तुषार आणि समायरा दोघेही महत्वाचे काम आहे असे सांगून घराच्या बाहेर पडले...
दोघेही सकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटले.... कॅफेमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या टेबल बघून तिथे दोघेही बसले आणि  वेटरला इडली वडा ऑर्डर केला...

समायरा : बोल तुषार काय महत्वाची माहिती काढली आहॆस 

तुषार : ऐक... आशिष मार्थाचा पुतण्या आहे हे तर आपल्याला कालच कळाले होते.... तर आशिषने एम बी ए ची एंट्रन्स exam दिली होती. त्यात त्याचा रँक आला नाही... म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप सुनावले घराच्या बाहेर काढायला निघाले होते... त्या वेळेस मार्थाच्या नवऱ्याने त्यांना आडवले व मी त्याला माझ्या कंपनीत ठेवतो असा विश्वास दाखवला... 

मार्थाच्या नवऱ्याचं(व्हिक्टर ) आणि  त्याच्या लहाण्या भावाचे(जॉन ) एकमेकांवर जीवापाड प्रेम होते... मार्थालाही लग्न झाल्यानंतर जवळ जवळ वीस वर्ष काही मुलबाळ झालेले नव्हते... त्यामुळे ती तिच्या दिराच्या जॉनच्या मुलांना खूप जीव लावत असे...त्यांना आशिष आणि जेनी (कन्या )अशी मुले...

नंतर आशिषचे आईवडील एका अपघातात देवाघरी गेले आणि त्यांचा सांभाळ मार्था आणि तीचा नवरा टोनी याने केला...

 व्हिक्टरला  काही वर्षांपूर्वी एका असाध्य आजाराने पछाडले आणि तो ही त्यात मरण पावला.... मरता मरता  त्याने सुहास सोबतचआशिषचा सांभाळ करायचा असं वचन घेतलं होतं... जेनीचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं... आणि सुहासचे नुकतेच graduation पूर्ण होत आले होते...व तो पोस्ट graduation साठी अमेरिकेला जाणार असे ठरले होते.... 

आशिषने राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी जॉईन केली आणि तो खूप मन लाऊन काम करू लागला... तो एक ना एक पैश्यांचा हिशोब मार्थाला देत असे ....कुठलाही धोका वगैरे करण्याचं त्याच्या मनात नव्हतं.... 

समायरा : मग डाळ कुठे शिजत आहे.... आपल्याला तर सरळ काहीच दिसत नाहीये 

तुषार :समायरा खरा व्हिलन आशिष नाही दिवाकर आहे.... 

समायरा : दिवाकर??  म्हणूनच तो आशिषच्या बाजूने बोलत होता... हो ना 

तुषार :हो, तर ऐक दिवाकर हा सगळ्यात जुना एम्प्लॉयी आहे... मार्थाने जशी कंपनी सुरु केली अगदीच तेव्हापासूनचा... तो मार्थाच्या लक्षात न येता छोटे मोठे हात नेहमीच मारत असे... 
पण आता पाच वर्ष झाले आशिषला कंपनी जॉईन करून 
सुरुवातीला दिवाकरला काही हात मारता येईना.... 

मग दिवाकरने आशिषचे कान भरायला सुरु केले.... त्याला सांगितलं की तुझाच अधिकार जास्त आहे या कंपनीवर!! तूच चांगला सांभाळत आहॆस... पूर्ण कंपनी तुझीच व्हायला हवी... 
आशिषला ते सगळे पटले आणि छोटे मोठे फ्रॉड करत आता दोघेही मोठा हात मारू लागले... मार्थाचा आशिषवर विश्वास असल्याने ती देखील आशिषने समोर केलेल्या कुठल्याही कागदावर अगदीच डोळे झाकून सही करायची.... चेकवर पण सही करायची त्यामुळे आपल्या मागे इतका फ्रॉड होत आहे ते तिच्या लक्षात आले नाही.... 

समायरा : बापरे !!
तुषार : भरीसभर म्हणून दिवाकरने आशिषला आपलं जावई करून घेतलं आहे.... 

समायरा : काय??  बापरे किती प्लांनिंग...कंपनी स्वतःची करून घेण्यासाठी.... 

तुषार :करेक्ट... दिवाकर मास्टर माईंड निघाला..... 

तितक्यात मागवलेला नाश्ता गरम गरम त्यांच्यासमोर आला.... पण विचारात मग्न असल्यामुळे दोघांनाही नाश्त्याची चव देखील समजली नाही.... 

समायरा : पण इतकी डिटेल माहीती... इतक्या लवकर त्या दीपकने कशी काढली... 

तुषार :योगायोगाने दीपकचे वडील आणि दिवाकर मित्र होते... पण दिवाकरच्या अश्या फ्रॉड करण्याच्या स्वभावामुळे त्यांची मैत्री तुटली होती... पण आधी बोलता बोलता दिवाकरने दीपकच्या वडिलांना त्यांचे प्लॅनिंग सांगितले होते.... 

नाश्ता उरकून दोघेही ऑफिस कडे निघाले.... 

तुषार : आता हा विषय बिलकुल तिकडे काढायचा नाही आणि आजच तूझ्या जाहिरातीसाठी आपण मार्थाची  परवानगी घेऊ.....

समायरा  : माझं तर डोकं सुन्न झालं आहे सगळ्या गोष्टी ऐकून....

तुषार : उलट आता टेन्शन कमी झाले आहे.... आपण आशिषसमोर आपली बाजू तितक्याच प्रगल्भतेने मांडायची.... जसं दिवाकर त्याला पटवू शकतो तसंच आपणही... पण आपल्याला आपण या बाबतीत खूप ढ आहोत याचा आव आणावा लागेल.... 
 क्रमश :
भाग 16 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
 
©® डॉ.सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या