किती सांगायचं मला (भाग 16)

समायरा :बरं झालं आशिषचं कोडं सुटलं.... नाहीतर आपण कुठल्या लेव्हलला यात गोवलो असतो आपल्यालाही कळाले नसते... आणि एखाद्या फ्रॉड मध्ये आपले नाव घेतले गेले असते.... 

तुषार : चला... आता हा विषय बस्स... आपण भलं नी आपलं काम भलं!!!

दोघांनाही आपल्या डोक्यावरचा भार आता खूप हलका झाल्यासारखं वाटत होतं... काम करण्याची एक निश्चित अशी दिशा ठरवता येत होती.... कुणालाही न दुखावता कसे काम करता येईल याच्याकडे त्यांचा कल होता...

दोघेही ऑफिस मध्ये पोहोचले... 

तुषार : आपण जाहिरातीचा विषय आधी आशिषजवळ काढू... त्याला जाहिराती दाखवू!!

समायरा : अरे तुषार,  पण तो objection घेईल ना !!

तुषार : त्याला सांगू की ह्या जाहिराती फक्त पॅकेजच्या आहेत... आपल्याला सॉफ्टवेअर अँप्लिकेशन(app) तयार करायचं आहे तिथे बराच पैसा लागेल.... जवळ जवळ पाच ते सात लाख रुपये... मग कदाचित तो या शुल्लक जाहिराती सोशल मीडियावर टाकण्यासाठी परवानगी देईल.... 

समायरा : हुशार आहॆस !! त्याची परवानगी पण मिळेल आणि कुणी नाराज पण होणार नाही.... आणि app च्या वेळेस घबाड मिळेल या आशेने तो या पॅकेजच्या जाहिरातीत पैसा काढण्याच्या मागे लागणार नाही... 

तुषार : चल समायरा, आशिष जिथे बसतो तिथे आपण जाऊ... म्हणजे त्याला रिस्पेक्ट दिलाय असं वाटेल... 

मग तुषार आणि समायरा आशिषजवळ आले.... 

तुषार : आम्ही एक जाहिरातीचा छोटासा प्रयत्न केला आहे... एक नजर फिरवतोस का?? 

आशिष : मला वाटतं मी तूला सांगितलं होतं की जाहिरातीचं मी बघतो काय ते??  आशिष थोडं रागात येऊन बोलला... 

तुषार :रागात येऊ नको आशिष !!आम्हाला एक खूप छान कल्पना सुचली आहे... ह्या जाहिराती त्याच्यासमोर काही नाही... 

आशिष : म्हणजे?? बरं एक मिनिट थांब... मी आपल्या ऑफिसचे सगळ्यात जूने सहकारी दिवाकर सर यांना बोलावतो.... मग सांगा तुमच्या डोक्यात काय आहे ते.... 

तुषार : ठीक आहे !!

आशिषने गणेशला आवाज देऊन दिवाकरला बोलावून घेतले.... 

तुषार : आपण आपल्या कंपनीचं एक सॉफ्टवेअर app तयार करू... त्यात ही पॅकेजची विभागणी, ratings, review, complaints, ऑनलाईन नोंदणी. ऑनलाईन payment ह्या सगळ्या गोष्टी येतील...

इतकंच काय ज्या हॉटेल सोबत आपण जोडले जाऊ त्यांच्या जाहिराती आपोआपच त्या app वर झळकतील... फायदा आपल्याला होईल 

आशिष : त्यामुळे अजून काय काय फायदा होईल?? 

तुषार : लोकं घरी बसल्या बसल्या माहिती काढून बुकिंग करतील आणि हिशोब करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची गरज राहणार नाही.... सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर राहतील.... पण आता ते app तयार करण्यासाठी पाच  लाख ते सात लाख रुपये लागतील...
 तूम्हाला एखादा app डेव्हलपर शोधावा लागेल... हे पैश्यांचं काम तूम्ही करा....आम्ही हे छोटं जाहिरातीचं फ्री मधलं काम करतो...
 
तुषार : समायरा ते जाहिरातीचे फोल्डर उघड आणि दाखव बरं..... 

समायराने फोल्डर उघडले आणि एक जाहिरात त्यांना दाखवली... 
 दिवाकरला कंपनीच्या सॉफ्टवेअर अँप्लिकेशन समोर म्हणजेच  सात लाखाच्या व्यवहारासमोर त्यांना जाहिराती चिल्लर वाटायला लागल्या.... 

दिवाकर : आशिषराव!! मला यांच्या जाहिराती खूप आवडल्या... समायरा !! जाहिराती एकदम छान झाल्या आहेत ... you are multi talented.... good keep it up 👍

तुषार :मग या आम्ही सोशल मीडियावर पब्लिश करू?? 
एकदम साळसूदपणाचा भाव चेहऱ्यावर आणून तुषारने विचारले.... 

आशिष : हो !!लवकर अपलोड करा... आधीच खूप उशीर झाला आहे... 

तुषार आणि समायराने खूपच युक्तीने आशिषला पटवले  होते....पण एकदा नियमाप्रमाणे दोघांनीही सगळ्याच जाहिराती मार्थाला दाखवल्या.... तिलाही त्या जाहिराती खूप आवडल्या..... तीने देखील जाहिराती अपलोड करण्यासाठी परवानगी दिली.... 

मग वेळ न दवडता समायराने जाहिराती अपलोड केल्या... 

तुषार :"आज तो सेलेब्रेशन बनता है " साप भी मरगया और लाठी भी नही टुटी 😀😀😉 

समायरा : खरंच... आजचा दिवस काही वेगळाच आहे... सकाळी सगळं किती अवघड वाटत होतं...  पण आता सगळं कोडं सुटलं.... 
क्रमश :
भाग 17 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇

कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
 
©® डॉ.सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या