किती सांगायचं मला (भाग 2)

समायरा तणतण  करत बाहेर आली समायरा त्या मुलाला म्हणाली काय म्हणालास तू?
मी आणि तूझी......??? 

तो मुलगा :hi... i am तुषार... माझ्याशी लग्न करशील?? 

समायरा :एकदम डोळे फाडून😳 तुषार कडे बघायला लागली... आणि म्हणाली तूझे काय स्क्रू ढिल्ले झाले आहेत का?? मगापासून बघत आहे मी तूझी आपली काहीही बडबड चालू आहे..... 

तुषार :🤦‍♂️ अगं तूला माझ्या म्हणण्याचा अर्थ समजलाच नाही... मी खरं लग्न थोडीच म्हणत आहे.... मी फक्त आपण नवरा बायको असल्याचं भासवायचं.... 

समायरा : एकदम अवाक होऊन, भासवायचं म्हणजे... 420 करायची... आणि तूला मीच सापडले काय असले फालतू धंदे करायला?? 

तुषार : अगं, मला या नौकरीची नितांत गरज आहे.... माझी आई खूप आजारी आहे....तिच्या औषधांचा खर्च खूप आहे ... मी सध्या जिथे काम करत होतो तिथे टेम्पररी होतो.... पण आता पर्मनंट व्यक्ती आल्याने मला सरळ काढून टाकलं आहे.... मी कसाबसा इतका महिनाच घर चालवू शकतो... माझ्यासाठी नाही, पण माझ्या आईसाठी मी तूला विनवणी करतो आहे.... 

समायरा : पण मीच का??  दुसऱ्या कुणाची मदत घे ना.... 

तुषार : अगं त्या unmarried लोकांच्या हॉलमध्ये तू एकटीच स्त्री होतीस ना.... बाकीचे तर मुलं आहेत... आणि  मला असं वाटतं की जितकी मला नौकरीची गरज आहे तितकीच तूलापण आहे.... त्या शिवाय का, 'तू' इतके married प्रतिस्पर्धी असताना interview साठी  वाट पहात होतीस.

समायरा तुषारचं बोलणं ऐकून विचार करायला लागली 'खरं तर आपल्याला देखील नौकरीची तितकीच गरज आहे, पण त्या साठी हा मार्ग योग्य वाटत नाही..... परंतु अमोघची फीस?? एक महिन्याचा कालावधी मिळाला होता फीस भरण्यासाठी.... काय करावं?? 

तुषार : excuse me !अगं इतका काय विचार करते आहॆस... त्या सगळ्या लोकांचे interview होऊन जातील आपल्याला interview न देताच तसंच जावं लागेल.... 

समायरा : पण ते कसं शक्य आहे....आपले documents वेग वेगळ्या नावाने आणि आपल्याकडे काहीच प्रूफ नाही... तिथे marriage certificate मागितलं तर काय उत्तर आहे?? 

तुषार : हे बघ असं सांगू की महिनाभरापूर्वीच आपलं देवब्राम्हनाच्या साक्षीने लग्न झाले आहे आणि आपण लिहून देऊ की उद्या फोटो submit करू आणि सर्टिफिकेट??  तयार झालं की सबमिट करू असं सांगू .. .. 

समायरा : सर्टिफिकेट?? बापरे इथपर्यंत जावं लागेल?? मला काहीच योग्य वाटत नाहीये... 

तुषार : हे बघ प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.... आपला फॉर्मुला चालला तर चालला...नाहीतर फार तर फार रिजेक्ट होऊ.... 

समायरा : हम..... 

तुषार : तूझं नाव नाही सांगितलंस?? 

'माझं नाव.... समायरा, तुषार मला खूप भीती वाटत आहे रे पण.... 

तुषार : nice name

समायरा  :काय?? 

तुषार :काही नाही.... हे बघ ही गोष्ट तूझ्या आणि माझ्यातच राहील.... इथे ऑफिस मध्ये कुणालाही भनक नको.... 

समायरा : नाही.... नकोच.... मी निघते.... मी नाही थांबत.... 

तुषार : हे बघ फक्त केबिन मध्ये जाऊन येऊ....ही बघ ती सेकंडलास्ट जोडी चालू आहे interview ची... आपल्याला आपले documents लवकरच रिसेप्शनिस्ट कडे सबमिट करावे लागतील.... दे तूझे documents... 

समायराने गोंधळून documents काढून तुषारच्या हातात दिले.... तिला ते तुषारजवळ देत असताना तिला एक अनामिक भीती वाटत होती.... असं वाटत होतं की तिथून काढता पाय घ्यावा.... पळून जावं... पण मग अमोघ आणि आईबाबांचा चेहरा  नजरेसमोर येत होता..... 

शेवटी मन घट्ट करून समायराने तीचे documents तुषारच्या हवाली केले.... आणि स्वतः married heading असलेल्या रूम मध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसली.... 

तुषारने समायराने दिलेले documents चाळले....अच्छा ही समायरा बी. कॉम, एम.बी. ए आहे तर?? आमच्या दोघांचं शिक्षण सारखंच, ' गूड ' म्हणजे आता या लोकांना आमचा संशय तरी येणार नाही.... 

तुषारने स्वतः जवळचे दोघांचेही documents अगदी व्यवस्थित सबमिट केले..... 

तिथल्या रिसेप्शनिसनीस्टने लग्न झाल्याचं प्रूफ मागितलं.... तुषारने' देवब्राम्हनाच्या साक्षीने एका महिन्या पूर्वी लग्न केले आहे,आणि उद्या लग्नाचे फोटो सबमिट करतो असे दोघांनीही अंडरटेकिंग लिहून दिले..... 

अंडरटेकिंग असल्यामुळे रिसेप्शनिसिस्टने सगळे कागदपत्रे घेऊन तुषार आणि समायराची एन्ट्री लिहून घेतली.... 

एकामागून एक जोडया interview साठी जात होत्या...interview देऊन आल्यावर कुणाच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नव्हती.... 

सगळेच तिथून निघून जाताना  त्या बॉसला 'किती खडूस आहे म्हातारी, तिला नीट प्रश्न विचारता येत नव्हते का?

 तर कुणी म्हणत असे म्हातारीचं नक्कीच बिनसलंय घरी.... इतकी चिडचिड.... उगाचच interview द्यायला आलो...... 

हे ऐकून समायरा तुषारकडे एकदम गोंधळलेल्या नजरेने बघायला लागली....तुषार मात्र डोळ्यानेच तिला धीर देत होता..... 

आता समायरा आणि तुषारची वेळ आली.... दोघेही अगदीच नवीन जोडप्यासारखे एकत्र बॉसच्या केबिन मध्ये घुसले.... 

सगळे interview होऊन देखील तिला मनपसंत जोडी मिळाली नव्हती.... 
त्यामुळे ती जरा घुश्श्यातच होती.... 

समायरा मात्र तीची केबिन न्याहाळून बघत होती.... तीची केबिन विलक्षण होती... त्या केबिन मध्ये एन्ट्री केल्या केल्या ताज्या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध येत होता..... एका कोपऱ्यात फिशपॉट दिसत होते.... त्यात विविधरंगीं मासे जणू पोहण्याचा आस्वाद घेत होते... केबिन खूप स्वच्छ होती... केबिनमध्ये वेगळ्या प्रकारचा जिवंतपणा जाणवत होता..... 

हॅलो मार्था, ' मी तुषार आणि ही समायरा, माझी wife 

तुषारचा आवाज ऐकून समायराची तंद्री तुटली.... आणि ती तुषारकडे बघायला लागली.... तिला एकदम आश्चर्य वाटलं, मॅडम तरी म्हणावं ना याने.... एकदम मार्थाच....

तुषारने ज्या पद्धतीने तिला मार्था म्हणून आवाज दिला.... ती एकदम खूष झाली.... आणि तीने बसल्या बसल्या दोघांच्याही documents वर नजर फिरवली..... 

मार्था : लग्नाचे फोटो उद्या देणार??  नक्की ना.... अंडरटेकिंग बघून मार्था म्हणाली.... 

तुषार : हो, नक्की... 

मार्था : दोघांचेही education, गुड, चला म्हणजे तूम्ही दोघे मला हवे तसं जोडपं आहात तर.... 

समायराने fingers क्रॉस केले.....

मार्था : तूम्हाला नौकरी कशासाठी करायची आहे?? 
समायरा काही बोलणार इतक्यात तुषार बोलायला लागला... 

तुषार : मार्था, आमचं स्वप्न होतं तुमच्या कंपनीत काम करायचं.... तूमची कंपनी म्हणजे आपल्या जिल्ह्यातील एकदम नंबर एक कंपनी.... तुमच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळेल..... 

समायरा तुषारच्या उत्तरांमुळे गोंधळून गेली होती...पण तिला एक लक्षात आलं होतं की तुषार मार्थाची स्तूती करण्याची एकही संधी सोडत नव्हता.... 

" आणि तूला गं?? कश्यासाठी नौकरी करायची आहे?? "

समायरा : आतापर्यंत जितके टूर्स तुमच्या कंपनीने arrange केले... माझ्या काही नातेवाईकांनी त्याचा लाभ घेतला... प्रत्येकजण तुमच्या टूर्स बद्दल खूप खूष होतं.... मग तो कुठलाही असो??  फॅमिली पॅकेज, सिंगल किंवा हनीमुन..... 

मार्था : चला म्हणजे एकंदर तूमचा अभ्यास चांगला दिसतोय...( मार्था स्तुतिसुमनांनी हुरळून गेली होती) मार्थाला मनासारखे जोडपे मिळाले होते..... 
भाग तीन वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇किती सांगायचं मला (भाग 3)

क्रमश :
भाग 1 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

 कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या