समायरा बस🚍 मध्ये बसली खरी पण डोक्यामध्ये सतत विचारचक्र चालू होते....
सकाळ पासून घडणाऱ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरूनअगदी एखाद्या पिक्चरसारख्या जात होत्या....
इतकं सगळं खरंच घडून गेलेलं होतं?? .... आजचा दिवस आपल्यासाठी नक्कीच काहीतरी वेगळं घेऊन आला होता...
समायराला एकीकडे नौकरी मिळाल्याचा आनंद झाला😊 होता.... पण ज्या पद्धतीने ती नौकरी मिळाली होती.तिला त्याचं दुःख😒 देखील होत होतं.....
बस थांबली, समायरा बसमधून उतरली.... घरी गेली....
समायराला साडीमध्ये बघून समायराचे आईवडील एकदम गोंधळले...
समायराची आई : हे काय?? तू आणि साडी... मला पक्क आठवतंय तू सकाळी ड्रेस घालून गेली होतीस ?? आणि ही कुठली साडी... तूला तर साडी घालणं आवडत नाही ना....
समायरा : अगं आई हो, हो जरा थांब, मला श्वास तर घेऊ दे.... अगं मी पाई जात असताना एका मोटर सायकल स्वाराने चिखल उडवला होता, नशिबाने नलिनीचे घर पूढे होते!!... मग तिच्या घरी मी कपडे बदलले.....
बरं आई, पप्पा आणि अमोघ तूम्ही तिघेही ऐका मला नौकरी मिळाली..... आता आपल्या अडचणी बऱ्याच कमी होतील.....
समायराची आई : अरे वा,अभिनंदन... समु बेटा आधी अंघोळ कर, देवासमोर साखर ठेव, दिवा लाव 🪔आणि नमस्कार कर....
ते ऐकून समायरा लागलीच बाथरूमच्या दिशेने गेली....
इकडे अमोघ आणि समायराचे आईवडील गप्पा करत होते....
समायराची आई : बघा, मी सकाळी म्हटलं नव्हतं आज आपल्या समुला नक्कीच नौकरी मिळणार.... किती गुणी आहे आणि एकदम सिन्सियर.... तिच्या त्या स्वभावामुळे तीला लागलीच नौकरी मिळाली....
समायराच्या आईचे ते शब्द समायराच्या कानावर पडले.... ते ऐकून समायराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले....
समायराला ज्या पद्धतीने नौकरी मिळाली होती... तीला आता एकदम अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं होतं....मनामध्येच समायरा आपल्या आईवडिलांची माफी मागत होती.... अश्रू पुसून ती देवाजवळ आली... दिवा लाऊन, देवाच्या पाया पडली... देवाची माफी मागितली🙏..... देवाजवळ साखर, ठेवून तीने सगळ्यांच्या हातावर साखर ठेवली....
घरी जेवणातही आईने समायराच्या आवडीची खीर केली... सगळेच आनंदाने जेवले... समायराला आज खऱ्या अर्थाने तिच्या आईपप्पांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते.....
झोपतानाही समायरा सोडून तिघांनाही छान झोप लागली.... समायरा मात्र जवळजवळ जागीच होती....तीला रात्रभर झोप लागलीच नाही.... सकाळी सकाळी झोप लागली.....जाग आली ते फोनच्या बेल ने....
समायराने फोन उचलला.... तुषारचा फोन होता.... फोनवर वेळ बघितले सकाळचे साडे नऊ वाजले होते.... समायराने कानाला फोन लावला....
तुषार : हॅलो, झाली का झोप??
समायरा : तूला कसं माहिती, 'मी ' आताच उठले ते??
तुषार :' तूझा आवाज सांगतोय'... बरं लवकर उठ आवर आणि माझ्या खास मित्राचा" प्रमोद फोटो स्टुडिओ"१ आहे.... तिथे फोटो काढूत.... त्याला मी सांगितलं आहे की एका कार्यक्रमातील नाटकासाठी आम्हाला फोटोसेशन करायचं आहे....मी भाड्याने शेरवानी आणि घागरा मागवला आहे...मुंडावळ्या आणि बाकी साहित्य पण आणलं आहे.... सोबत थोडं स्टिचिंग मटेरियल राहू दे... फिटिंग साठी लागेल... ....... मेक अप किट पण ठेव
समायरा कॉटवरून लगेच उठली... आणि तयार झाली चहा नाश्ता उरकला ....
समायराने मेकअप किट सोबत घेतला, आईच्या नकळत स्टिचिंग मटेरियल घेतलं आणि आईला सांगून घराबाहेर पडली..... पण तिला खूप विचित्र वाटत होते..... योग्य आणि आयोग्य असा सगळा विचारांचा गोंधळ सुरु होता....
ठरलेल्या ठिकाणी समायरा पोहोचल्यावर..... तुषारला पाहिल्यावर तिच्या जीवात जीव आला...
पोहोचल्यावर दोघेही छान तयार झाले... जणू आज त्यांचं खरोखरच लग्न होत आहे असं वाटत होतं.... फोटोसेशन झाले....
तुषारच्या मित्राने प्रमोदने बरोबर बॅकडेट मध्ये कॅमेरा सेट केला होता.... म्हणून फोटोवर बरोबर महिन्याभरापूर्वीची तारीख आली होती....
दोघांचेही फोटो खूप सुंदर आले होते....अगदीच हार तुरे घालताना देखील फोटो खूप सुंदर आले....
फोटोसेशन चे स्वरूप पाहून प्रमोदला मात्र वेगळाच संशय आला....
प्रमोद :तुषार खरं खरं सांग??? हे फोटो तूम्ही कश्यासाठी काढता आहात.... खरोखरच लग्न करणार आहात का??
तुमचं हे कधीपासून चालू आहे....
समायरा : काय?? तुमच्या मित्राने तूम्हाला काही सांगितले नाही का?? आमचं हे सहा महिन्यापासून चालू आहे ते ... हो की नाही तुषार.....
तुषार : गोंधळून!!!काय???
समायरा : असे कसे खास मित्र तूम्ही??सहा महिन्यात काहीच बोलला नाही का तूमचा मित्र??
प्रमोद : वा रे वा तुषार, चांगली मैत्री निभावलीस.... इतकी लपवा छपवी....
तुषार : अरे मित्रा, तू काय हिचं ऐकतोस.... ही खोटं बोलते आहे... मी तूला आता खरी गोष्ट सांगतो... मी हे सगळं नौकरीसाठी करत आहे........ i
nterview कसा दिला..... कसं सिलेक्शन झालं हे सगळं सांगितलं..... पण आता समायरा असं का बोलत आहे हे कळत नाहीये....
समायरा : गुगली काय फक्त तुलाच टाकता येते का?? मला पण टाकता येते.... आता कळालं असेल ना तू मला तिथे एकदम बायको म्हणल्यावर कसं वाटलं असेल ते....
क्रमश :
भाग पाच वाचण्यासाठी खाली निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©® डॉ.सुजाता कुटे
0 टिप्पण्या