नलिनी तडक तिच्या घरी पोहोचली... घरी पोहोचताच नलीनीने समायराला फोन लावला....
नलिनी :समायरा !! तुषार खरं बोलत आहे.... त्याच्या घरी जाऊन आले मी... त्याची आई होती घरी.... तीला बी पी आणि शुगर आहे....
समायरा : अच्छा !! असं आहे तर.... चला एक टेन्शन तर कमी झाले...
नलिनी : तू कामात असशील ना !! चल मी फोन ठेवते... नंतर बोलू...
असं बोलून नलीनीने फोन कट केला....
तितक्यात तुषारने एकदम विस्मयचकित होऊन त्याच्या जवळ असलेलं रजिस्टर समायराच्या पुढ्यात टाकले....
समायरा : हे काय??
तुषार :हे आपल्या राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स चं जुनं रजिस्टर आहे... आपली कंपनी तशी चालू होऊन बरेच वर्ष झाली आहे आणि मागील तीन वर्षांपासूनच्या हनिमून पॅकेज च्या एंट्री आहेत... त्यावर एक नजर फिरव... आपल्याला आपल्या प्रोजेक्टसाठी कामाला येईल....
समायरा : काय?? तीन वर्षांपासूनच्या एंट्री... या एकाच रजिस्टर मध्ये.... कसं शक्य आहे.... महिन्याला 4 एंट्री जरी पकडल्या तरी एक रजिस्टर पूर्ण होऊन जातात आणि या कंपनीचं नाव इतकं आहे की रोजच्या दहा तरी एंट्री असाव्यात....
तुषार : exactly !! मला काय म्हणायचे आहे हे तूला आता कळाले....
अगं भलेही सध्या आपला प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत हे काम आशिष सांभाळत आहे.....
समायरा : बापरे !! किती भीतीदायक?? ..... म्हणजे या बाबतीत खूप मोठा फ्रॉड झाला आहे तर....
तुषार : समायरा, हळू बोल... भिंतीलाही कान असतात....
आणि ही केवळ आपली शंका आहे.. आपण रजिस्टरचा एकदा अभ्यास करू....
समायरा : तुषार तूला काही क्लिक होत आहे का??? म्हणूनच आपल्या कंपनीत अजूनपर्यंत ऑनलाईन बुकिंग होत नाही... खास करून हनिमून पॅकेज....
तुषार : हो !! हळू हळू लक्षात येत आहे माझ्या.... आणि म्हणूनच तो आशिष माझ्यावर खार खाऊन असतो... नीट बोलत नाही.....
तुषार : समायरा !! हुशार आहॆस गं... नुसतं रजिस्टर समोर टाकलं तर तूला फ्रॉड आहे म्हणून लक्षात आलं
समायरा : हे तर कुणी पण सांगू शकेल... कुणी यात लक्ष नसेल घातलं इतकंच.... किंवा या फ्रॉड मध्ये अख्खी टीम इन्व्हॉल्व असू शकते....
तुषार : हे रजिस्टर मी गुप्त पद्धतीने ऑफिस मधून काढले आहे... पटकन तू याचे तूझ्या मोबाईलमध्ये फोटो काढून घे.... मला परत करायचं आहे....
समायरा ने फोटोस काढून घेतले.... तुषार ने लागलीच ते रजिस्टर ऑफिसमध्ये सबमिट केले....
समायरा: आपण मार्थाला सांगितले तर???
तुषार : अगं आताच नको... इतका पुरावा पुरेसा नाही.. नेमका घोळ आहे की अजून काही हे आपण
आधी बघू... नाहीतर आपणच तोंडावर पडायचो....
समायरा : तू म्हणतोस ते बरोबर आहे.. आपण अजून नवीनच आहोत.... इथला घोळ कितपत आहे?? आपल्याला काय माहिती??
तुषार : बरं झालं आपण चार्ज घेण्याआधी आपल्याला ह्या गोष्टी माहीती झाल्या... आता आपण काय करू सध्या ह्या हनिमून पॅकेजचा चार्ज ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच ठेवू... म्हणजे जमाखर्चाचे तो बघेल.... आणि आपल्याकडे प्रोजेक्ट तयार करताना आपण शून्यापासून खर्च दाखवू म्हणजे आपल्या आधी झालेला खर्च आपल्या नावावर खपवला जाणार नाही...
समायरा तूला एक गोष्ट लक्षात येते का?? ही लाखो रुपयांची अफरातफर असू शकते...
म्हणजे आपले एक एक पाऊल आपल्याला सावधपणे उचलावे लागेल.... समजतंय ना !!
आता मात्र समायरा आणि तुषार खूप टेन्शन मध्ये आले होते...
समायरा : हे लग्नाच्या नाटकाचे टेन्शन कमी होते का की अजून हे नवीन टेन्शन आपल्या पदरी आले 🤦♀️
तुषार : अगं उलट हे नशीब की वेळेवरच आपल्याला ह्याची कल्पना आली... पण आता आपल्याला अजून एक नाटक करावे लागेल... " मूर्खपणाचे !!!
तितक्यात मार्थाने तुषार आणि समायराला केबिनमध्ये बोलावलं....
दोघेही थोडे टेन्शन मध्ये केबिन मध्ये गेले...
मार्थाच्या केबिनमध्ये ऑफिसची सगळी मंडळी बोलावली गेली होती....
क्रमश :
भाग 10 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©® डॉ.सुजाता कुटे
0 टिप्पण्या