नववधू आणि नातेवाईक

गीता तशी सर्वगुणसंपन्न होती... 

अर्थातच सर्वगुणसंपन्न म्हणजे ती शाळेत होती तेव्हा नेहमी तीचा प्रथम क्रमांक असायचा...

गीता तिच्या घरी एकदम आज्ञाधारक होती. ...

गीताची सर्व काही शिकण्याची जिद्द.... 
ती मिळालेल्या वेळेचा नेहमीच सदुपयोग करायची.... सुट्ट्यांमध्ये भरतकाम विणकाम आणि स्वयंपाक देखील करायची.... 

गीताच्या हातचा स्वयंपाक म्हणजे ती एकदम सुगरणच.... प्रत्येक वेळेस गीताच्या पाठीवर कौतुकाची थाप असायची...
तिच्या कामाला कधीच नाव ठेवण्यासारखी जागाच नव्हती... 

गीता तशी खूप समजूतदार होती.. तिच्या अपेक्षा अगदी माफक होत्या.. राहणीमानही साधारण होतं खर्चिक अशी नव्हतीच कधी... 

अश्या सर्वगुणसंपन्न गीताचं आज लग्न होतं.... अरेंज मॅरेज... स्थळही खूप छान मिळालं होतं..अगदी सुशिक्षित कुटुंब होतं... 

सर्वजण खूष होते..

गीताच्या आईवडिलांना गीता ही एकुलती एक मुलगी होती त्यामुळे तीचे लग्न थाटामाटात झाले... 

गीताने नवीन घरात गृहप्रवेश केला... तिच्या घरी सासू, सासरे, नणंद, दीर, आत्या, आत्याचे पती आणि हे दोघे असा परिवार होता.. 

लग्नाचे सोपस्कार अगदी व्यवस्थित पार पडले... आता पहिल्या स्वयंपाकाची वेळ आली... तसं पहिला स्वयंपाक देखील नणंद मदतीला होती म्हणून पंचपक्वान्नांचा बेत झाला.....

जेवणाची खूप स्तूती झाली.... 
गीता खूप खूष झाली... 

आता गीताचा घरातील रोजचा दिनक्रम सुरु झाला.. 
गीता लवकरच उठायची पण त्या घरातील सर्वाना उशीरा उठायची सवय होती...

उशीरा उठल्यावर नाश्ता आणि जेवणाची वेळ ही जवळजवळ तीन वाजताची होती.... 

नवरा जेवल्यावरच आपण जेवायचे अशी गोड तंबी देखील आत्यासासूने बोलता बोलता सुनेला दिली होती..... तसंच सर्वांचा नाश्ता झाल्याशिवाय तीने नाश्ता करायचा नाही असा काहीसा नियम तयार केला होता.... 

जेणेकरून जर नाश्ता कमी झाला तर बाकी सर्व लोकांना पूरला पाहीजे...

गीता लवकरच उठल्याने तिला लवकरच भूक
 लागायची..
पण नवीन घरात स्वतःच्या मनाने कधी घेऊन खाण्याची हिम्मत झाली नाही..

स्वयंपाक करण्याची पद्धत देखील वेगळी होती.... ज्या भाज्यांमध्ये गीता कांद्याचा वापर करायची तिथे तिच्या भाजीला नाव ठेवलं जायचं... ह्या भाजीला कुठे कांदा असतो का नुसता लसूण टाकत असतात.... जिथे गीता लसणाचा कमी वापर करायची इतका कमी लसूण का म्हणून टोमणे मिळायचे..... खास करून आत्याचे टोमणे असायचे.... 
वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकारही करण्याची एकंदर पद्धत वेगळी होती... 

या सगळ्या प्रकारामुळे गीता गांगरून गेली.... म्हणावं तर हा सासूरवास नव्हता पण गीता मात्र बिलकुलच आनंदी नव्हती.... 

गीता नवऱ्याशी दीपकशी  देखील तितकंसं  खुलली नव्हती....

गीताच्या माहेरी तीला, सतत स्तुती ऐकण्याची सवय होती.... आणि सासरी तिला सतत नाव ठेवलं जायचं.... 
गीताची राहणीमान साधं होतं.... 

गीताला दागिन्यांची आवड नव्हती.. ... कमी दागीने वापरत होती... तिथेदेखील तीला नाव ठेवलं जायचं.... असं कुठे असतं का? नवीन सून कशी दागिन्यांनी लगडलेली पाहीजे.... सदैव दागिन्यांनी मढली पाहिजे, असा सगळ्यांचा अट्टहास होता.... 

त्यामुळे गीता खूप उदास राहायला लागली.... 
तीचे विचार नकारात्मक व्हायला लागले तिला हे सगळं असह्य होत होतं...

 एकदम परक्यासारखं वाटत होतं.... 
एकटं वाटत होतं... 
बऱ्याचदा जेवायला उशीर होत असल्या कारणाने तिला अशक्त वाटायला लागलं होतं.... अशीच एकदा दुखावल्या गेल्याने गीता एकदा स्वतःच्या रूम मध्ये एकटी बसून रडायला लागली होती..... .

 तितक्यात दीपक ऑफिसमधून लवकरच घरी आला... त्याने गीताला आवाज दिला....गीताला रडण्याचा नादात काही ऐकू आलंच नाही.... 

दीपक बेडरूममध्ये आला तेव्हा त्याला गीता रडताना दिसली...

 दिपकने हळूच गीताचा हात पकडला.... आणि म्हणाला गीता ! अगं काय झालं... अशीच एकटी इथे का रडत बसली आहॆस? . 

गीता म्हणाली काही नाही.... 

दीपक : कुणी काही बोललं का?  कुणी काही दुखावलं का? 

दिपकच्या त्या प्रश्नावर गीताला सावरता आलं नाही... दिपकच्या खांद्यावर ती मनसोक्त रडली.... 

दीपकने गीताला जवळ घेतले... अगं गीता असं काय करतेस... मी तूझाच आहे गं.... तूला काय वाटतंय ते मनमोकळेपणाने बोल.... आई काही बोलली का? अगं तू मला सांगितलं नाहीस तर कळणार कसं?? तूला असं रडताना पाहून मला कसं तरी वाटलं... अगं मला वाटायचं की इथे तूला काहीच अडचण नाहीस... तू खूप आनंदात आहॆस..... 

गीता : मला समजत नाहीये... पण आपल्या सवयींमध्ये खूप तफावत आहे.... जेवणाच्या पद्धतीत खूप तफावत आहे आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत खूप तफावत आहे... राहणीमान देखील.... मला सगळं शिकावं लागेल हे मान्य... पण त्यामुळे एक परकेपणा आला आहे.... 

दीपक ते ऐकून हसायला लागला आणि म्हणाला अगं वेडे इतकंच ना... यातून आपण सुवर्णमध्य साधू... मी आईशी बोलतो अगं ती खूप प्रेमळ आहे.... फक्त हे आत्या वगैरे घरी असेपर्यंत तूला मुद्दाम ते तसे वागवत असतील.... कारण दूरचे नातेवाईक खूप खराब असतात गं.... बाहेर दुसऱ्या नातेवाईकांमध्ये उगाचच बदनामी करतात..... त्यात आत्या खूप कडक तीचे आपले वेगळे फंडे..... आणि इथे कुणालाच नाही आवडणार, तूझी बदनामी केलेलं... उद्या आत्या जाणार ना ! त्यानंतर तू जशी माहेरी वागत होतीस तशी वाग... बघ कुणी काही म्हणणार नाही... अगदीच जेवणाबद्दल देखील......

 इथे माझ्या आईने स्वतः देखील ते पाळलं नाही... आणि पप्पांच्या जॉब पॅटर्नमुळे तर पाळूच शकत नव्हती ती....' बस एक दिन और.'.. असं म्हणत दिपकने गीताच्या गालावर ओठ टेकवले.... 

गीता आता मात्र पून्हा पहिल्यासारखी खुलायला लागली... आत्याने गीताचं जाता जाता तोंडभरून कौतुक केलं..... 

आत्या गेल्या गेल्या गीताच्या सासूने हुश्श असा सुस्कारा सोडला आणि गीताची सासू गीताला म्हणाली गीता आज तूझ्या पद्धतीने स्वयंपाक कर... मी पण येते किचन मध्ये... मलाही शिकायला आवडेल तुमच्या पद्धतीच्या भाज्या.... ते ऐकून गीता एकदम बावचळून गेली.... 

गीता :आई तूम्ही?? 

गीताची सासू : अगं काय करू... ताई कडक असल्यामुळे मला तूझ्या जवळ देखील येता येत नव्हतं... काही व्यवस्थित सांगता येत नव्हतं पण आता मस्त आपण तिघी मिळून स्वयंपाक करत जाऊ आज ना उद्या तूला जॉब पण करावा लागेल ना !. 
गीता : आई मी खूप नशीबवान आहे की असं सासर मला मिळालं.... माझा तर खूप मोठा गैरसमज झाला होता....मला वाटलं मला आता पूर्ण आयुष्य असंच राहावं लागणार..... 

गीताची सासू :अगं गीता नवीन सून आली की काही नातेवाईक तिला जज करतात जसं काय ते न्यायाधीश आहेत... बरं तितक्यावर ते थांबत नाहीत.... बदनामी करतात आणि मग नववधूला तो ठपका लागतो.... आता मला माझ्या नणंदबाईचा मान ठेवणं जरुरी होतं... आणि काही दिवसांचाच प्रश्न होता म्हणून मी थोडं कडक वागले.... 
ते ऐकून गीताच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.....गीताच्या सासूने तिला जवळ घेतले... आणि म्हणाली" वेडाबाई " चल स्वयंपाक करू.... 

  वितरणाचे आणि प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव... लेख आवडल्यास like करा share करायचा असल्यास नावासहित share करा 
    ©® डॉ.सुजाता कुटे.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या