का जीवास माझ्या हूरहूर ही लागली
मनाच्या गाभाऱ्याने जगाची रीत दाखवली
स्वप्नात देखील विचार केला नव्हता कधी
अशी तूझी चाहूल मला का लागली
समजत होते जगरहाटी असावी
तरी आस वेड्यासारखी दिसावी
पण तूझ्या स्वार्थी मनाची
मला चाहूल कशी नाही लागली
आता स्पंदने मात्र माझी
तूला अलविदा करत आहेत
श्वासात ज्याला जपलं होतं कधी
आज मुक्त मी करत आहे.
©® डॉ सुजाता कुटे.
0 टिप्पण्या