किती सांगायचं मला (भाग 32)

पहिल्याच दिवशी नलीनी चार ऐवजी पाच वाजेपर्यंत थांबली होती... 

आशिष आणि दिवाकरला तिच्या ह्या अती सिनसियर पणाचं कौतुक 🤗वाटत होतं... 

आणि नलिनी 😂😂😂समायरामुळे थांबली होती... दोघीना सोबतच मॉलला जायचे होते...  

ऑफिस सुटण्याची वेळ झाली... नलीनीने समायराला मेसेंजरवर ठरलेल्या ठिकाणी भेटण्यासाठीचा मेसेज केला... 

समायराचा  होकार 👍आल्यानंतर  सगळे जण आपापल्या दिशेने निघाले.... 

तुषारने नेहमीप्रमाणे समायराला बस स्टॉप वर सोडले...
 
समायरा : तुषार !! काय झालंय दुपार पासून बघते आहे तू एकदम शांत शांत वाटत आहॆस?? 

तुषार : काही नाही तूझ्या दुपारच्या बोलण्यावर मी सिरीयसली विचार करत आहे.... 

समायरा : गुड, आता जास्त विचार करण्यापेक्षा कृती झालेली बरी.... 

तुषार :"नलिनी "तूझी तिथे वाट पाहत थांबली आहे वाटतं.... 

समायरा : हो, आम्ही जरा मॉलला फेरफटका  येणार आहोत.... 

तुषार : ठीक आहे तूम्ही करा एन्जॉय.... असं म्हणून नलिनीकडे न बघताच तुषार निघून गेला.... 

नलिनी : समायरा !! असा काय आहे हा?? माझ्याकडे बघितलं पण नाही 😒  

 समायरा : हो गं थोडा डिस्टर्ब वाटतोय.... जाऊ दे नलिनी!! "सब्र का फल मिठा होता है "😉

नलिनीने स्वतःचा चेहरा झाकून त्यावर हेल्मेट घातला.. तर समायराने स्कार्फ....दोघीही स्कुटीवर मॉल मध्ये गेल्या.... 

समायरा : किती दिवस झाले गं मी मॉलमध्ये आलेच नाही... 

नलिनी : जबाबदारीच्या ओझ्याखाली माणूस स्वतःसाठी वेळ काढायचं विसरतो..... 

समायरा : नलिनी !! अगं ते पर्सचं शॉप दाखव ना?? 

नलिनी : हो ते उजव्यासाईड ला आहे.... 

दोघीही पर्सच्या शॉप कडे जाऊ लागल्या.... तितक्यात एका वाया गेलेल्या गुंड माणसाने समायराला जाणून बुजून  धक्का दिला... 

समायरा : ओ मिस्टर!! डोळे फुटलेत का तुमचे??  

तो गुंड माणूस :ओ बाई काय झालंय ओरडायला?? 

समायरा : चोराच्या उलट्या बोंबा.... बाजूला एवढा मोठा मोकळा रस्ता दिसत नाही का तूम्हाला?? धक्का देऊन चालले..... 

तो गुंड माणूस : असं !! हे काय?? दिला धक्का असं म्हणून त्याने तिला पुन्हा धक्का दिला.... 

त्याचं असं वागणं पाहून नलिनी आणि समायराला खूप राग😡 आला... पण तो डेंजर असल्याचा अंदाजा आल्याने दोघीही खूप घाबरल्या.... 

नलिनीची नजर आजूबाजूला कुठे security गार्ड दिसतोय का हे बघायला लागली....

नलिनी आणि समायराचे भेदरलेले चेहरे पाहून.. तो माणूस कुत्सित नजरेने हसू लागला होता..... 

आता तो अजून त्रास देण्याचा विचार करत असतानाच तिथे एक देखणा, रुबाबदार पुरुष आला..... त्याच्यासोबत त्याच्या एक दोन मैत्रिणी दिसत होत्या.... त्या त्याला टोनी  नावाने हाक मारत होत्या... 

त्यातील एक मैत्रीण :टोनी !! Let it be, आपल्याला काय करायचं.... 

टोनी : how rude?? तू पण एक मुलगी आहॆस ना... जर तुझ्यावर असा प्रसंग ओढवला तर?? असं म्हणत त्याने त्या माणसाची गच्ची धरली.... आणि म्हणाला.... माझ्या या बारीक शरीरावर जाऊ नकोस?? मी चांगला कराटे चॅम्पियन आहे... तसंही माझा आता हात खाजवायला लागला आहे..... 

टोनीने  ज्या प्रकारे त्याची गच्ची धरली होती त्या गुंड माणसाने आपले आता काही खरे नाही हे ओळखून घेतले.... 

तसंही टोनीचा  मारामारी करण्याचा काही हेतू नव्हताच...
टोनीला समोरच सिक्युरिटी गार्ड दिसला.... त्याने त्या गुंडाला त्याच्या हवाली केले....त्याच्याआधी त्याने त्या गुंडाला समायराची कान पकडून माफी मागायला लावली...

समायरा तर तो सगळा प्रकार पाहून खूप घाबरली होती... 

टोनी : तूम्ही खूप घाबरलेल्या दिसत आहात... थोडा वेळ इथे बेंच वर बसून  फिल्टर कॉफी घ्या बरं वाटेल.... 

टोनीने जबरदस्तीने समायरा आणि नलिनीला बेंच वर बसवलं आणि बाजूच्या छोटया कॅफे मधून फिल्टर कॉफी आणली 
कॉफी पिऊन दोघीनाही जरा बरं वाटलं...

आता तूम्ही निवांत शॉपिंग करा... आता काही भीती वाटत नाहीना टोनी समायराकडे पाहून म्हणाला... 

समायरा : नाही, its ok मी आता ठीक आहे.... by the way... माझं नाव समायरा आणि ही नलिनी !!आणि thanks a lot.... आम्ही खरंच खूप घाबरलो होतो..

समायराला टोनीचं दिसणं, अगदीच सौम्य भाषेत बोलणं त्या गुंडांशी एकदम कडक वागणं... आणि काहीही ओळख नसताना फिल्टर कॉफी ऑफर करणं हे मनोमन भावलं होतं.... 

टोनी : चला बाय.... निघतो मी.. 

टोनी तू पण एकदम फिल्टर कॉफी वगैरे...सगळं काही यु एस सारखं नसतं... त्यातली एक मैत्रीण म्हणाली.. 

she is supercute... तिथून जाता जाता टोनीने समायराकडे बघून 😉 डोळा मारला.... 

😊समायरा एकदम लाजली, त्याच्या तश्या वागण्यावर एकदम फिदा झाली होती ...

 एकाच माणसात तिने दिसणे, प्रेमळ बोलणे, लढणे, आणि फ्लर्ट करणे इतकी रूपे पाहीले होते... हा आपल्या आयुष्यात आला तर.... 🤔

नलिनी : समायरा !! अगं ती बघ पर्स ची शॉप.....  

समायरा : हाय नलिनी!!, मला चिमटा घे..... 

नलिनी : समायरा !!काय झालं?? .... 

समायरा :  किती हँडसम होता तो😍.... मला तर वाटत होतं त्याने जाऊच नये.... मला supercute 🥰म्हणाला.... मी तर खूप क्रेझी झाले आहे.... 
 
नलिनी :🤦‍♀️, समायरा !! I think आपण पर्स घ्यायला आलो आहोत...

समायरा : यार नलिनी मला तो खूप आवडला... नी त्याच्या नावाशिवाय आपल्याला काहीच माहीती नाही.. 

नलिनी : अगं समायरा तो मुलींसोबत होता... कश्यावरुन त्याची एखादी गर्ल फ्रेंड नसेल?? .... मला तर दिलफेक आशिक वाटत होता.... श्रीमंतांचे चोंचले...

समायरा : नाही नलिनी!! तू चुकते आहॆस.. या मॉल मध्ये हजारो लोकं आहेत.... आपल्या आजूबाजूला निदान शंभर एक लोकं असतील पण वेळेला तोच धावून आला....त्याच्या वागण्यावरून मला दोघींपैकी एकही गर्ल फ्रेंड वाटली नाही... जाऊदे.... काय माहिती पुन्हा भेट होते की नाही😒

 दोघीही पर्सच्या शॉप मध्ये आल्या... समायराने बरेच कप्पे असलेली पर्स निवडली.... लकीली ती सेलमध्ये होती अगदीच अर्ध्या किमतीत पर्स मिळाल्याने अजून काही खरेदी करण्याचा मोह आवरला नाही.... दोघीनी मॅचिंग इअररींग,स्कार्फ अशी छोटीमोठी खरेदी केली....

 अपेक्षेपेक्षा जास्त ठरवलेल्या बजेट मध्ये शॉपिंग झाल्याने दोघीही सुखावल्या 🤗होत्या.....

चल नलिनी मला आता घरी सोड.... या गुंड प्रकाराने  आपल्याला खूप उशीर झाला आहे..... 

तितक्यात समोरून एक लाल कलरची मर्सिडीज गाडी जात असताना दिसली.... 
समायरा त्या गाडीकडे बघत असताना तिला टोनी ती गाडी ड्राईव्ह करताना दिसला.... 
Omg टोनी आणि मर्सिडीज.... समायराला स्वतःच्या चॉईसचं कौतुक वाटलं.....

टोनीची नजर जाता जाता बाहेर उभ्या असलेल्या समायराकडे गेली... त्याने ड्रायव्हींग सीटच्या साईड चा अर्धवट खाली असलेला काच पूर्ण खाली केला... आणि स्टायलिश बाय करून निघून गेला......

समायरा तर नुसती बघत होती.... आणि मनोमन अजूनच सुखावली होती....
 क्रमश :
भाग 33 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇


नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या