किती सांगायचं मला (भाग 33)

समायराच्या एकेरी आयुष्यात आज टोनी डोकावला होता...."त्याने गुंडाशी केलेला सामना आणि स्टायलिश बाय" तिच्या नजरेसमोरून जातच नव्हता.... 

  त्यामुळे समायराची अवस्था एका तडफडणाऱ्या माशासारखी झाली होती.... पण टोनी बद्दल नावापेक्षा जास्त काहीच माहिती नसल्याने ती काहीच करू शकत नव्हती.... 

काय माहीती त्या टोनीला अशीच सवय असेल तर??? ... उगाचच मुलींना suprcute म्हणत असेल तर?? आपण उगाचच उड्या मारत आहोत.... पण ज्या पद्धतीने तो त्याच्या मैत्रिणींना बोलला त्या वरून तो मुलींचा रिस्पेक्ट करतो असं वाटतं.....असा विचार समायरा करत होती... 

इकडे तुषारची अवस्था देखील अशीच काहीशी झाली होती... मिसरूड फुटल्यापासून ते आजतागायत एक नौकरीची गोष्ट सुटली तर तुषार सगळ्या गोष्टी त्याच्या आईला सांगत असे..... 

त्याला नलिनीबद्दल आईला सांगायचं होतं पण सुरवात कुठून करावी हेच त्याला कळत नव्हतं....

नेहमी सुनेचा विषय काढणारी आई आज मात्र सून हा शब्दच काढत नव्हती....शेवटी न राहवून तुषार त्याच्या आईला बोलला.... 

तुषार : आई !! तू सतत सून सून करत असते ना.. 

तुषारची आई : हो रे बाबा आता नाही करणार... सहा महिन्याचा अवधी मागितला आहॆस ना तू... 

तुषारने डोक्यावर हात मारला🤦‍♂️.... आता काय बोलणार.... 

तुषार : आई !! ती आपल्या घरी एक मुलगी आली होती ना.... स्कुटी चालू करून द्या म्हणणारी.... 

तुषारची आई : हं, आता तिचं काय?? 

तुषार : तूला ती सून म्हणून चालेल?? 

तुषारची आई : काय?? 😳नाही चालणार... असं कसं कुणी पण.... जिच्याबद्दल काहीच माहिती नाही ती कशी सून म्हणून चालेल.... आणि मला नुसतं चालून काय फायदा तूला पण तर ती आवडायला हवी ना....तुषारच्या आईने मुद्दाम😇 फिरकी घेतली.... 

तुषार : अगं आई !! असं नको ना बोलूस... 


ऐक ना... ती मुलगी नलिनी... app developer आहे.... 

तुषारची आई : मला ती दुसऱ्यांदा घरी आली तेव्हाच संशय आला होता....

तुषार : अगं आई तसं काहीच नाही.... मी तिला अजून काहीच बोललो नाही.... 

तुषारची आई : पण तू तीची माहिती काढलीस का?? तीचे आई वडील??

तुषार : अगं तेच ना... तीचे वडील खूप कडक आहेत.....

तुषारची आई : असे ना का?? ... माझा मुलगा पण हिरा आहे... आणि एका शहीद माणसाचा मुलगा आहे... त्यांना तर अभिमान वाटेल तूला जावई करून घ्यायला.....तसं पोरगी खूप सुंदर🤩 आहे... मला तर ती तेव्हाच आवडली होती.....  तू म्हणत असशील तर मागणी घालायची आहे का?? 

तुषार : म्हणजे आई तूझा होकार आहे ना.... 

तुषारची आई : आजपर्यंत मी तूझ्या मनाविरुद्ध काही केलं आहे का?? 

तुषार : आई मी अजून नलिनीला काहीच क्लिअर बोललो नाही आधी तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतो.... मग मागणीचं बघू......

तुषारची आई : ठीक आहे, जशी तूझी ईच्छा...
 
असं म्हणून दोघेही आपापल्या बेडरूम कडे गेले... 

आता तुषारच्या डोक्यात नलिनीला कसं प्रपोज करायचं याची प्लॅनिंग सुरु झाली होती.... 

ईकडे नलिनी तुषारचा काही मेसेंजर वर मेसेज येतो का याची वाट पाहत होती.....

तुषार, समायरा आणि नलिनी यांच्या आयुष्यात आता एका वेगळ्या विरहाने आगमन केलं होतं.... 

समायरा तर या दोघांपेक्षाही जास्त अस्वस्थ झाली होती.... कारण सहजा सहजी तीला कुणी आवडत नव्हतं.... आणि जो आवडला तो परत आयुष्यात येणार की नाही याची खात्री पण नव्हती.... 

काहीही असो... तुषारचा तो डिटेक्टिव्ह मित्र.... काय त्याचं नाव "दीपक " त्याची मदत घेऊ पण त्या टोनीला शोधूनच काढू.... मला इतकं बैचेन केलंय त्यानी.... मी काय त्याला असंच जाऊ देणार?? समायरा एक एक गोष्ट ठरवू लागली होती.... 

सकाळी उठल्या उठल्या समायराने नलिनीला आपण आज संध्याकाळी अड्डयावर भेटू.... मला तूला महत्वाचे बोलायचे आहे असा मेसेज केला..... 

नलिनी : ok 

समायरा : आई !! मला आज पण घरी येताना उशीर होईल आणि तसंही नलिनी जो पर्यंत ऑफिसला आहे तोपर्यंत मला उशीर होऊ शकेल..

समायराची आई : बरं बाई !!नाही करणार काळजी....बरं ते डब्ब्यात आळू वडी जास्त घेऊन जा.... नलिनीला पण आवडते ना... .... 

समायरा  : आई !! किती गोड आहॆस गं तू... i love you आई.... 

समायराची आई : काय गोष्ट आहे... आज जरा जास्तच प्रेम उतू चाललंय??... प्रेमात बिमात पडली नाहीस ना 😉

समायरा : आई तू पण ना 🙄 काहीतरीच काय?? 

आपल्या आईपासून काहीच लपत नाही... आपल्या काय चेहऱ्यावर लिहून येतं की काय 🤔 समायरा विचारात पडली.... 

आज जवळ जवळ सहा दिवसांच्या अंतराने मार्था ऑफिसला येणार होती... 

त्यामुळे ऑफिसमध्ये सगळी रेलचेल चालू होती... मार्थाला असं आवडतं तसं आवडत नाही वगैरे असा प्रत्येकजण म्हणत होता....

सुहास देखील ऑफिसला येईल की नाही हा जो तो ज्याच्या त्याच्या परीने अंदाज बांधत होता....

मार्था आली... सगळ्यांनी वेलकम मार्था म्हणत तिचं आनंदाने स्वागत केलं.... 

मार्था : अरे असं माझं स्वागत करत आहात की माझा मुलगा नाही मीच US  वरून आले आहे.... 

दिवाकर :मार्था !! सुहासबाबा?? 

मार्था : दिवाकर !! सुहासला आताच ऑफिसला यायचं नाही म्हणे.... त्याला काही दिवस सुट्टी एन्जॉय करायची आहे... तसंही त्याचा आशिषवर प्रचंड विश्वास आहे... त्या मुळे त्याला इथल्या कामात लुडबुड करायची नाही असं त्याने ठरवलं आहे..... .. 

चला आता उन्हाळयाच्या सुट्ट्या जवळ येत आहेत... त्याच्या पॅकेजची प्लॅनिंग सुरु करा.... 

समायरा आणि तुषार!! How are you?? काम कसं चाललंय तुमचं.... 

समायरा : एकदम छान..... 

रजनी (मनात ):प्रत्येक वेळी समायरा आणि तुषारला स्पेशल attention 😏

मार्था :रजनी !!

रजनी (गोंधळून ): yes मार्था??. 

मार्था : तूझी engagement ची date fix झाली की नाही.... 

रजनी : yes मार्था !! या महिन्याच्या 25 th ला आहे... 

मार्था : गुड, आम्हाला बोलवायचं विसरू नकोस.. 

रजनी: हो,हो सगळ्यांनाच निमंत्रण देणार आहे... मार्थाच्या बोलण्याने रजनी जरा खुलली 🥰होती... 

तितक्यात नलिनीने ऑफिस मध्ये एंट्री केली.... 

मार्था : ही मुलगी कोण?? नवीन दिसत आहे?? 

आशिष : ही नलिनी, आपलीकडे app developer म्हणून आहे.... 

मार्था : काय?? कधीपासून?? मला हिच्या बद्दल कुणीच कसं सांगितलं नाही.... तुषार?? 

आशिष : मार्था !! हिला मी अपॉईंट केलं आहे....मी केबिन मध्ये तूम्हाला सगळं सांगतो.... 

मार्था : ठीक आहे..

मार्था,  आशिष, दिवाकर आणि नलिनी चारही जण मार्थाच्या केबिन मध्ये गेले.. 

आशिष ने कंपनीची app तयार करून त्याचा काय काय फायदा होईल हे मार्थाला समजेल अश्या भाषेत सांगितले... 

मार्था :( खूष होऊन ) गूड जॉब आशिष.... वेल डन.. तू... नलिनी ना?? आजकाल जरा नाव लवकर लक्षात रहात नाही.... 

नलिनीने होकारार्थी मान हलवली..... 

मार्था : तूला जमेल ना नलिनी?? 

नलिनी : हो, मार्था 

मार्था : गूड.... 

दिवाकर : मार्था !! NINA कंपनीची app तिनेच develope केली आहे.... तूम्ही तिथे review घेऊ शकता... 

मार्था : दिवाकर !! तू आणली आहॆस का तीला.. मग तर ती छान असणार..... 

दिवाकर : थँक्स मार्था.....

मार्था : चला आपापल्या कामाला लागा... मलाही सहा दिवसांच्या मेल्स चेक करायच्या आहेत..... 
क्रमश :
भाग 34 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या