तुषार हॉस्पिटलला जाऊन आला... त्याच्या आईची थोडी शुगर वाढलेली होती... त्याला थोडं टेन्शन 😰आलेलं होतं...
तुषार : आई !! आता तू तुझं व्यवस्थित walking🚶♀️ सुरु कर... डॉक्टरांनी हा जो डाएट चार्ट दिला आहे... इथे ओट्याच्या उजव्या बाजूला लावतो.... तू तो बघायचा... आणि त्याच प्रमाणे आपल्या घरात स्वयंपाक होईल किंवा फळे येतील...
तुषारची आई : तुषार !! तू इतकं टेन्शन नको रे घेऊस... ते डॉक्टर आहेतना काही पण सांगतात.... रोज कारल्याचा ज्युस पिला की होईल साखर कमी.....
तुषार : ई..... 😬 कारल्याचा ज्युस?? तूला कुणी सांगितलं??
तुषारची आई : अरे त्या शेजारच्या काकू आहेत ना... त्यांची एका आठवड्यात साखर कमी झाली म्हणे....
तुषार : मग या डाएट चार्ट मध्ये दिला असता ना कारल्याचा ज्युस.... आई !! मला इतकं तर कळतं की जे आपल्याला तज्ञ सांगतात त्या पाठीमागे त्यांचा अभ्यास आणि अनुभव असतो.... त्यामुळे याला त्याला फॉलो न करता आपला डॉक्टर आपल्याला काय सांगतो तेच आमलात आणू या..
तुषारची आई : बरं बाबा!! तू म्हणतो तसं... बरं नलिनीशी बोलणं झालं का आज....
तुषार : नाही गं आई, उद्या नक्की बोलेन...
तुषारची आई : लवकर बोल बाबा, आता मला लवकर सून पाहीजे.....
तुषार : हो आई....असं म्हणून तुषारने त्याचा मोबाईल हातात घेतला आणि मेसेंजर वर नलिनीला मेसेज केला...
तुषार :hi
नलिनी :hi
तुषार :काय करत आहॆस??
नलिनी : काही नाही थोडंसं लॅपटॉप वर काम करत आहे....
तुषार : अच्छा बाय....
नलिनी : काही काम होते का??
तुषार : हो मला तुझ्याशी बोलायचे आहे....
नलिनी :काय?? 🤔
तुषार :असं फोनवर 📳नाही... उद्या भेटून बोलू
नलिनी : अच्छा!! कधी आणि कुठे??
तुषार :ऑफिस सुटल्यावर, "स्नॅक्स अँड कॉफी " हॉटेल मध्ये....
नलिनी : ठीक आहे... भेटू उद्या.... बाय
तुषार :बाय...
नलिनीने मोबाईल डाटा बंद केला.... काय बोलायचं असेल तुषारला?? प्रपोज वगैरे.......असा विचार करत पण लॅपटॉपवर ती काम करू लागली....
इकडे समायरा टोनीचा काही मेसेज आला का सारखं सारखं चेक करत होती...
पण टोनी हुशार होता.... त्याला समायरा मनापासून खूप😍🤩🥰 आवडली होती... तीची पर्सनल स्पेस जपून त्याला तीला मिळवायचं होतं.... त्या मुळे मनात असूनही त्याने तीला मेसेज केला नव्हता....
समायरा मात्र खूप बेचैन झाली होती.. शेवटी आपण स्वतःहुन सकाळी टोनीला फोन करु असं समायराने ठरवले...
सकाळी तुषार तयार होत असताना तुषारच्या आईने पून्हा विषय छेडला....
तुषारची आई : आज नलिनीला बोलून घे.... म्हणजे आपल्याला पुढचं बघता येईल....
हो आई आज नक्की बोलतो...आरश्यात स्वतःला बघून केस विंचरत तुषार म्हणाला....
तर नलिनी मात्र स्वप्नांच्या दुनियेतुन बाहेर आलीच नव्हती..तुषार काय बोलणार आहे... काहीही असो मी देखील तुषारजवळ माझं मन मोकळं करणार... तो मला खूप आवडतो हे त्याला सांगणार.... पण कसं 🤔
नलीनीचे वडील :इतका वेळ कुठे झोपतात का?? नलिनी कशीकाय उठली नाही....
नलिनीची आई :अहो झोपू द्या तीला... रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत लॅपटॉपवर ती काम करत होती....
नलिनी खरं तर उठली होती पण जागेपणीच तुषारचं स्वप्न पाहत असल्याने आई बाबांचं बोलणं ऐकून देखील ती बेडवरुन उठली नव्हती...
ऑफिसमध्ये आल्या आल्या समायराने तुषारला विचारले... मग नलिनीला आज बोलणार ना??
हो, पण आता तीचा विषय इथे नको... रजनीची चाहूल लागल्याने तुषार बोलला....
समायरा : अच्छा, बरं ऐक ना एक माझ्या ओळखीची जोडी आहे... पुढील आठवड्यात त्यांच लग्न आहे....
कमीत कमी खर्च असणारं पॅकेज विचारत होते... पण ते ही त्यांना परवडणार नव्हतं... पण माझी खूप इच्छा आहे त्यांना atleast थ्री स्टार वालं पॅकेज तरी वापरता यावं...
समायराचे ते बोलणे ऐकून तुषार विचार करू लागला....
तुषार : समायरा !! पाच टक्के डिस्काउंट आणि काही कॉम्प्लिमेंटरी असं आपल्याला करता येईल...
समायराने लागलीच हिशोब केला....
समायरा : थँक्स तुषार !! आता हा प्लॅन त्यांच्या अवाक्यात आहे....
समायराने लागलीच त्या जोडीतील माणसाला कॉल करून माहिती दिली...
तुषार : समायरा !! तुझं ते मंगळसूत्र जरा आत टाक...तुझ्या ओळखीची जोडी आली तर पंचाईत व्हायची...
समायरा :तुषार !! बरं झालं आठवण केलीस....मला आता मुख्य दरवाजाकडे लक्ष द्यावं लागेल...नाहीतर चुकून कुणी मिसेस समायरा म्हटलं तर काय काय कूटाने करावे लागतील याचा न विचार केलेलाच बरा....
समायरा सतत मुख्य दरवाजाकडे बघत होती... तितक्यात तो ओळखीचा माणूस समायराला मुख्य दरवाजा जवळ दिसला... कुणी काही बोलायच्या आधी समायराने त्याला दरवाजाजवळ गाठलं आणि स्वतःच्या केबिन मध्ये घेऊन गेली.....
त्याच्या पॅकेज चे पूर्ण काम झाले की त्याला सोडण्यासाठी देखील दरवाजा पर्यंत गेली.... जेणेकरून तो माणूस दुसऱ्या कुणाशीही न बोलता बाहेर जाईल..
त्याला सोडून समायरा आत येत असताना रजनीने तीला टोकले....
रजनी : समायरा , !!आता काय तुमच्या प्लॅन मध्ये कस्टमरला दरवाजापर्यंत सोडायचं सुरु केले की काय??
समायरा रजनीच्या त्या प्रश्नाने थोडी चिडली...आणि म्हणाली :रजनी !! तूला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे गं... जेव्हा पाहावं तेव्हा वाकडं बोलत असतेस...
रजनी :मला जे समोर दिसतं ते मी बोलते.....
समायरा : तूला एक्सप्लेनेशन देण्याला मी बांधील नाही... तरी तूला सांगते तो कस्टमर माझ्या ओळखीचा होता...
समायरा थोडी तणतण करत आपल्या केबिन मध्ये गेली....
समायरा : ही रजनी काय समजते स्वतःला... जेव्हा पाहावं तेव्हा वाकडं बोलत असते....
तुषार ने पाण्याचा ग्लास समोर करत... हे घे समायरा पाणी पी....
पाणी देऊन तो समायराला म्हणाला : समायरा !! इतक्या महिन्यात तू, कोण कसं आहे हे ओळखायला हवं होतं... तीचा स्वभावच आहे तसा...काही लोकाना समोरची माणसं समाधानी बघून जलन होते....मग तेच लोकं असं कुचकट बोलतात....त्यांच्या त्या स्वभावामुळे ते कधीच समाधानी नसतात.....
समायरा : तू म्हणतोस ते खरं आहे....
तितक्यात ऑफिस मध्ये कसलातरी गोंधळ सुरु झालेला दिसला....
तुषारने तो गोंधळ बघून गणेशला आवाज दिला
तुषार : गणेश !! कसला गोंधळ आहे हा??
गणेश : सुहास येत आहे ऑफिसला??
तुषार : अच्छा?? मग त्याला बुके वगैरे मागवा....
गणेश : सुहासला असलं स्वागत आवडत नाही.. नाहीतर मार्थाने आपलं ऑफिस पूर्ण डेकोरेट केलं असतं पण त्याचं म्हणणं आहे हे सगळं माझ्या आई वडिलांनी कमावले आहे... मी त्याचा हकदार नाही...
तुषार : ग्रेट, मग तर मला नक्कीच भेटायला आवडेल....
समायरा : बापरे, किती उच्च विचार ते ही या कलीयुगात.... कुठे आशिष आणि कुठे सुहास??अमेरिकेला जाऊन पण त्याचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले दिसतात... खरंच मार्था सोबत याने पण या ऑफिसला काम केलं तर कंपनीचा खूप मोठा फायदा होईल...
क्रमश :
भाग 36 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
0 टिप्पण्या