सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती..... सगळ्या नवीन एम्प्लॉयीना सुहासला बघण्याची खूप उत्सुकता होती... त्यातल्या त्यात तो US रिटर्न असल्यामुळे सगळ्यांना तो कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, कसा वागत असेल याचा अंदाज बांधत होते...
तितक्यात दिवाकरचा आवाज आला... सुहास बाबा आला...सगळ्यांची नजर ऑफिसच्या मुख्य दरवाजाकडे गेली...
दरवाजा बाहेर लाल मर्सिडीज येऊन थांबली🚗 त्यातून मार्था आणि सुहास बाहेर आले....
समायराने सुहासला पाहीले... टोनी??टोनीला पाहून समायराला खूप मोठा धक्का बसला....
मार्था सोबत काय करत आहे..... हाच सुहास तर नाही ना त्या विचाराने तीला घेरी आली....टोनी आणि सुहास एकच व्यक्ती 😢 आता मी काय करू?? असा विचार करून समायरा तुषारला बोलली...
समायरा : तुषार !!मी जरा वॉशरूमला जाऊन येते....
टोनीला पाहून समायरा खूप अस्वस्थ झाली... आता मी माझे प्रेम त्याला काय कंफेस करणार... काय सांगू मी टोनीला... लग्न झाल्याचं नाटक करून मी तुमच्या कंपनी मध्ये काम करत आहे ते.... त्याला तर मग मी फ्रॉड आहे असेच वाटेल... माझी काय इमेज राहील त्याच्यासमोर??? देवा तुझ्या मनात काय आहे... तूला मी आनंदी राहावं असं वाटत नाही का?? समायरा वॉशरूम मध्ये सारखं सारखं तोंडावर पाणी मारत होती..... आणि तिथल्या आरशात स्वतःला पाहत होती....
ईकडे सुहास आला.... ऑफिसच्या सगळ्या एम्प्लॉयीनी त्याच्यासोबत हस्तांदोलन केलं... आणि प्रत्येक जण आपली ओळख सांगू लागला होता...
नलिनी तिचं काम उरकून आधीच निघून गेली होती... त्या मुळे तिचीही भेट झाली नाही....
सुहास : dear all, मी तुम्हाला जास्त वेळ डिस्टर्ब करत नाही... सध्या माझी इंटर्नशिप चालू आहे... अजून महिनाभर ती चालेल?? मग मी आपल्या ऑफिसला जॉईन करेन....आज मी फक्त तुमच्या भेटीसाठी आलो आहे...
रजनी : इंटर्नशिप इथे??
सुहास : नाही इथे नाही, अमेरिकेतच आहे... ऑनलाईन आहे... आपलं वर्क फ्रॉम होम कसं असतं ना तसंच काहीसं... म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण कश्या प्रकारे ऍडव्हान्स टेकनॉलॉजी वापरून काम करतो.... त्याची ट्रैनिंग असते....
रजनी : wow, म्हणजे नंतर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल.. हो ना...
सुहास : hope so..... चला best luck, आणि हे मी काही चॉकलेटचे बॉक्सेस US वरून आणले आहेत.... प्रत्येक एम्प्लॉयीच्या नावाने एक एक बॉक्स आहे... गणेश सगळ्यांना देशील आणि तू ही त्यातील एक घे....
प्रदीप : चॉकलेट्स आणि आम्ही....
सुहास 😊 तिथले स्पेशल आहेत...
प्रदीप :नाही मी सहजच विचारलं....
सुहास : चला.... मला US time फॉलो करावा लागतो... त्या साठी काही तयारी करायची आहे..... bye all.. असं म्हणून सुहास तिथून निघून गेला....
समायरा वॉशरूम मधून घाबरत घाबरत बाहेर आली... काहीही असो टोनीचा सामना करायचा असा विचार करून तिने तीचे मन घट्ट केले होते.... पण बाहेर बघते तर काय सगळे जण आपापल्या कामात व्यस्त झाले होते.... आपापल्या जागेवर जाऊन बसले होते....
समायरा हळूच आपल्या केबिनमध्ये गेली....
समायरा : सुहास आहे की गेलाय??
तुषार : गेला, महिन्याभरानंतर तो आपल्या ऑफिसला जॉईन होणार आहे... सध्या त्याची काहीतरी ऑनलाईन इंटर्नशिप चालू आहे म्हणे...पण समायरा !! कुठे होतीस तू... अगं आम्ही सुहास सोबत किती गप्पा मारल्या...
तुषारच्या त्या प्रश्नावर समायराला एकदम रडू कोसळले... हळुवार आवाजात पण समायरा हमसून हमसून रडायला लागली...
तुषारने समायराचे ते रडणे बघितले आणि तो परेशान झाला....
तुषार : समायरा !!काय झाले का रडत आहॆस??
समायरा : तुषार !! कुठून दुर्बुद्धी सुचली रे आपण हे married couple चं नाटक केलं ते.... किती महागात पडत आहे....
तुषार : आता आणखी काही झाले का?? अगं समायरा आतापर्यंत जसे सगळेच प्रॉब्लेम सोडवले तसा हा ही सुटेल...
समायरा : नाही, मला हा प्रॉब्लेम कुणाला धोका देऊन सोडवायचा नाही..... मी तर आता खरंच नौकरी.....
तितक्यात समायराचा फोन 📳वाजला....
समायराच्या आईचा फोन📳 होता......
समायरा : हं आई !!बोल... काय झालं आहे तूझा आवाज असा घाबरल्यासारखा का येत आहे....
समायराची आई : अगं तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे.... मी हॉस्पिटलला आले आहे.. तू तिथेच ये...
समायरा : तुषार !!
समायरा तू जा... मी मार्थाला सांगतो... हे बघ मी तूला कॅब बुक करून देतो... कॅब ने जा.... तू इथली काळजी करू नकोस आणि काही मदत लागली तर सांग.....तुषारने समायराचे बोलणे ऐकल्याने लागलीच ही पावले उचलली होती....
समायरा : थँक्स अ लॉट तुषार.....
तुषार : समायरा !! Cab आली... otp 2381 आहे... पैसे मी ऑनलाईन paid केले आहेत.... तू काळजी करू नकोस..
समायरा धावत धावत मुख्य दरवाजाकडे गेली....
रजनी : समायरा!! काय झालं आहे??
आधीच समायराचा मूड खराब असल्याने... रजनीच्या टोमण्यांचा सामना करायची अजिबात ईच्छा नव्हती.... समायरा काहीच न बोलता तिथून निघून गेली...
रजनी :तुषार जवळ गेली आणि म्हणाली... अशी काय आहे ही?? रिप्लाय द्यायला पैसे पडतात का??
तुषार : रजनी !!अगं ती टेन्शन मध्ये होती... बरं मला मार्थाला समायरा बद्दल इन्फॉर्म करायचे आहे तो पर्यंत इथे आलेले कस्टमर थांबवशील का??
रजनी नाखुशीने : ठीक आहे.... काय जमाना आला आहे... ज्युनिअर सिनियरला काम सांगत आहे 🙄
तुषार : रजनी !! तूझा इगो आड येणार असेल तर नको थांबवुस... पण i think, सिनियर, ज्युनियर असा काही फरक होऊ नये म्हणून मार्थाने कुणाला सर आणि मॅडम म्हणण्याची पद्धत आपल्या ऑफिसला ठेवली नाही.....
रजनी : ठीक आहे,पटकन मार्थाच्या केबिन मध्ये जाऊन ये... मलाही खूप काम आहे....
तुषार मार्थाच्या केबिन कडे गेला...
तुषार :may i come in मार्था !!
काही टेबलवरच्या फाईल्स चाळत असलेल्या मार्थचे लक्ष केबिनच्या दरवाजा जवळ उभ्या असलेल्या तुषार कडे गेले.. स्वतःचा चष्मा घालून तुषार क्लिअर दिसल्यावर मार्था म्हणाली.... yes, प्लीज.....
तुषार : मार्था !! समायराच्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे... त्यामुळे समायरा हॉस्पिटलमध्ये गेली आहे... तेच इन्फॉर्म करायला मी आलो आहे....
मार्था : अच्छा, ठीक आहे... तूलाही जायचे आहे का??
तुषार : नाही, सध्या तरी नाही......
मार्था : ठीक आहे,काळजी करू नका... समायराला सांग take care.... इथलं टेन्शन घेऊ नकोस म्हणावं....
तुषार :इथलं सगळं मी सांभाळून घेतो... काहीच डिस्टर्ब होणार नाही....
मार्था : मग समायराला सांग, हवा तितका वेळ घे......
समायरा लवकरच हॉस्पिटलला पोहोचली... घाबरत घाबरतच ती हॉस्पिटलच्या आत आली... हॉस्पिटलच्या रेसेपशनिस्ट ला तीचे बाबा कुठे आहेत ते विचारून घेतलं....
धावत पळत वॉर्ड कडे गेली... तिथे डॉक्टर समायराच्या आईशी काही बोलत असताना दिसले....
समायरा त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली.....
डॉक्टर : तूम्ही त्यांना आता भेटू शकता.... इतकंच काय सलाईन संपलं की घरी घेऊन जाऊ शकता.....
समायरा मात्र पुरती गोंधळून गेली होती
समायरा : आई !! काय झालं होतं बाबांना??
समायराची आई : अगं !! सकाळ पासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं... आणि आता छाती दुखत होती म्हणून आम्ही घाबरलो होतो....
डॉक्टरांनी काही नाही त्यांना "अपचन" झालं आहे असं निदान केलं आहे...
त्यांच ई.सी.जी. काढलं... नॉर्मल आहे... काही बेसिक रक्ताच्या तपासण्या करून घेतल्या... रिपोर्ट यायला वेळ लागेल पण तो पर्यंत ऍडमिट राहण्याची गरज नाही म्हणाले....
समायराने ते ऐकून सुस्कारा सोडला... पण दुपारपासून जे जे काही घडत होतं ते सगळं साचलं होतं.... त्यामुळे समायराने तिच्या आईला मिठी मारली आणि तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली....
समायराची आई : समु बेटा, अगं बाबा ठीक आहेत...त्यांना काहीच झालं नाही... फक्त त्यांच्या अबर चबर खाण्याला आपल्याला बंद करावं लागेल.. ...
हो आई !! डोळे पुसत, स्वतःवर संयम ठेवत समायरा म्हणाली....
समायराने हॉस्पिटलचं बिल भरलं.... त्या वेळेस तिच्या लक्षात आलं की आपल्या लोकांना आपली आणि आपल्या नौकरीची किती गरज आहे.... नाही मी नाही सोडणार नौकरी.... जे होईल ते होईल.... असा एक ठाम निर्णय समायराने घेतला
क्रमश :
भाग 37 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
©® डॉ. सुजाता कुटे .
7 टिप्पण्या
Chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाTumche blog etake chan astat na next blog chi aaturata vadat ch jate. 😊
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद
हटवा@Swati Mohite
उत्तर द्याहटवा👍👍
हटवाKhup mast
उत्तर द्याहटवा