समायरा आपल्याला का टाळते आहे. काही चुकलं का माझं... तिचं होकारार्थी स्माईल😊 मी कधीच विसरू शकत नाही... टोनी सतत समायराचा विचार करू लागला...
असं अचानक काय घडलं असेल की समायराने मला ब्लॉक करण्याची वेळ यावी... ब्लॉक..अरे हो हे मला आधी का नाही सुचले.....
टोनीने दुसऱ्या नंबरवरून समायराला फोन 📳केला...
एखाद्या कस्टमरचा फोन असेल असा विचार करून समायराने फोन 📳उचलला....
टोनी : hi समायरा !! काय झालं आहे तूला?? तू माझा नंबर का ब्लॉक केलास....
समायरा : हॅलो, कोण बोलत आहे??
समायरा!!इतक्या लवकर विसरलीस का?? मी टोनी... तूला बीचवर भेटलो होतो... नको गं असा जीवघेणा खेळ खेळूस.... टोनी एकदम भावनीक होऊन म्हणाला....
समायरा : हे बघ टोनी !! I am not inteurested in you.... मला अजून काही बोलायचे नाहीये ...
हे खोटं आहे समायरा !! मला नाही माहिती तुझ्या मनात काय चाललं आहे... पण होणार तर तू माझीच आहॆस असं म्हणून रागातच😡 टोनीने फोन ठेवला.....
तुषार : समायरा !! कुणाचा फोन होता....
समायराच्या डोळ्यात अश्रू होते पण ते ती तुषारपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती..... काही नाही रे डोळ्यात कचरा गेला आहे....
तुषार : समायरा!! मी कालपासून बघत आहे... तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहॆस..... हे बघ तुला मला सांगायचे नसेल तर नको सांगू.... निदान नलिनीजवळ तरी बोल... तू अशी दुःखी चांगली वाटत नाहीस....
समायरा काही बोलणार तितक्यात तिथे कस्टमर आला
समायराच्या वागण्याने टोनी देखील हवालदिल झाला होता.... ही समायरा अशी का वागत आहे याचा छडा लागलाच पाहिजे... टोनीने पक्क ठरवून टाकलं...
पण समायराच्या फोन नंबरशिवाय आपल्याला काहीच माहित नाहीये पण तसंही तिचं लोकेशन शोधणं इतकं पण अवघड नाही असा विचार टोनीने केला....
इकडे तुषारच्या आईने तुषारच्या काकाला नलिनीविषयी व तिच्या वडिलांविषयी फोनवर सांगितले....
तुषारचे वडील वारल्यानंतर तुषारच्या आईला तुषारच्या काकांनी काहीच मदत केली नव्हती.... पण तुषारची आई आणि तुषार कधीच खचले नाही.... शिकतानाच तुषार कमवायला लागला होता पण त्याने त्याच्या काकापुढे कधीच हात पसरले नाही....
तरीदेखील तुषारच्या आईने त्याच्या काकांना मोठेपणा दिला होता....
आयताच मान मिळत असल्यामुळे तुषारचे काका देखील खूप खूष झाले...ठीक आहे,मी नलिनीच्या वडिलांना निरोप पाठवतो....असं म्हणून फोन ठेवला......
इकडे ऑफिस मध्ये मार्था च्या जवळ जवळ सगळ्या ई-मेल बघून झाल्या होत्या.. त्यात एक शेवटची ई-मेल हॉटेल lakeview च्या मालकाची होती.....
या हॉटेल lake view च्या मालकाची ई-मेल मला?? .... यांचा प्रॉब्लेम तर मागेच समायरा आणि तुषारने सोडवला होता ना?? 🤔 मग याने आता कश्याला मेल केला आहे.... असा विचार करत मार्थाने तीचा ई-मेल इनबॉक्स उघडला.... आणि वाचायला सुरुवात केली...
Respected Martha, hello, first of all i want to congratulate you. That you are having such brilliant employees. They solved my problem. As, per their suggestion i arranged event manager in my hotel. And now my hotel become famous in my city.
My Purpose to write here is. I want to gift honeymoon package to that lovely couple.
Thanking you...... hotel manager
मार्था तो ई-मेल वाचून खूप खूष झाली... खरंच तुषार आणि समायरा आपल्याकडे आल्यापासून हनिमून पॅकेजमध्ये विशेष वृद्धी झाली आहे... त्यांना हे गिफ्ट मिळाल्यावर ते दोघे तसेही खूप खूष होतील...
मार्थाने गणेशला आवाज दिला.....
मार्था : गणेश !! ते आपले नवीन एम्प्लॉयी आहेत ना... तुषार आणि समायरा त्या दोघांनाही बोलाव मला त्यांच्याशी महत्वाचे बोलायचे आहे.....
समायरा आणि तुषार कस्टमरचा हिशोब करण्यात मग्न होते..
येऊ का आत?? असं म्हणत गणेशने दोघांची तंद्री तोडली....
तुषार : बोल गणेश... काय काम आहे....
गणेश : मार्था बॉस ने तुम्हाला दोघांनाही बोलावलं आहे.....
तुषार : ठीक आहे.. इतका हिशोब क्लिअर करून येतो मी....
दोघांनीही हिशोब क्लिअर केला आणि दोघेही प्रश्नार्थक नजरेने मार्था च्या केबिन मध्ये घुसले....
मार्था : तुषार आणि समायरा बसा...congratulations....
तुषार :🤔
मार्था : अरे तूम्ही दोघांनीही कामच तसं केलं आहे ...आपलं हनिमून पॅकेज चार पटीने वाढलं आहे....
समायरा : थँक्स मार्था !! पण यांचं समान क्रेडिट तुम्हालापण आहे.......
मार्था : ते कसं काय?? 🤔
समायरा : आम्ही कुठलाही नवीन प्रयोग करायचं म्हटलं तर त्याला तूम्ही आक्षेप घेत नाही....त्यामुळे आम्हाला ते अगदी बिनधास्त करता येत आहे. ...
Thank you, thank you... मार्था आनंदाने म्हणाली..
बरं ऐका तुमचं काम बघता मी तुम्हाला 15 ते 20 तारखेपर्यंत सुट्टी देत आहे....
तुषार : सुट्टी 🤔 आम्हाला नको आहे पण??
मार्था : हा माझा आदेश आहे...
तुषार ते ऐकून एकदम शांत बसला....
मार्था : मला उटीच्या हॉटेल lake view चा ई मेल आला आहे... तुमच्या event organizer ची आयडिया खूप यशस्वी झाली...... हा मेल वाचा... असं म्हणून मार्था ने आपला लॅपटॉपवर ओपन केलेला मेल दाखवला....
सामायराने तो बघितला... 😳... मार्था काय आपल्याला हनिमूनला पाठवते की काय?? या विचारानेच तीला घेरी आली.... पण मार्थाच्या नकळत तिने स्वतःला सावरलं....
तुषारने तो ई-मेल वाचला... तुषार : हनिमून?? गिफ्ट
मार्था : करेक्ट.... म्हणून मी सुट्टी देत आहे... मस्त हनिमून एन्जॉय करा.....
तुषार : मार्था !! आम्हाला लग्न होऊन तीन महिने होतील ना....
मार्था : मग काय झालं.... बरं तुम्हाला तिकडे फक्त एन्जॉय म्हणून नाही.. तर आपल्या पॅकेजचं काम आपल्याच टर्म्स वर चालतं ना, हे पण बघायचं आहे....ते कसे event organise करतात त्यात अजून काही add करायचे आहे...किंवा त्यांची कुठली चांगली गोष्ट बाकी ठिकाणी वापरता येईल ते सगळे बघायचे आहे....
तुषार : पण मार्था !! खरंच आम्हाला जाणं इतकं जरुरी आहे का??
मार्था : हो, जरुरी आहे.... आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ते गरजेचे आहे..... आपल्याला त्या हॉटेल मॅनेजरला नाराज नाही करता येणार.....मग आता उटी जाण्याच्या तयारीला लागा.....
समायरा : ठीक आहे मार्था !!
समायरा आणि तुषार दोघेही खिन्न होऊन तिथून निघून गेले...
केबिन मध्ये आल्या आल्या समायरा तुषारला म्हणाली.... तुषार!! आता आपल्यासमोर हे एक नवीन आव्हान... कसा मार्ग काढायचा आहे यातून....
तुषार :अरे वा समायरा !! आज चक्क तू रडली नाहीस आणि मार्ग काढायचा म्हणत आहेस....
समायरा : आता उडी मारलीच आहे तर पोहून किनारा गाठणे भाग आहे ना.... .
मला खात्री आहे आपण यातूनही काही मार्ग काढू.... आणि नाही निघाला तर काहीतरी नक्की चांगलं घडेल....
तुषार : 😳 समायरा !! कुठल्या मांत्रिकाकडे वगैरे गेली होतीस का??
समायरा : परिस्थिती शिकवते सगळं.....
तुषार : हं, ते ही खरंच आहे म्हणा.... ईकडे आमचा नलिनीच्या घरी रीतसर मागणी घालायचं चाललं आहे... आई आजच काकांशी बोलणार होती....
समायरा : अच्छा.... हे घे चॉकलेट🍫... चॉकलेट बॉक्स मधून एक चॉकलेट🍫 समायराने घेतलं नी दुसरं तुषारला दिलं....
तुषार : चॉकलेट🍫, नको....
समायरा :तुषार !! तूला चॉकलेटची🍫 जादू माहिती नाही का??
तुषार : नाही....
समायरा : चॉकलेट🍫 खाल्ल्याने ताण कमी होतो... तू खाऊन तर बघ....
तुषारने ते चॉकलेट🍫 खाल्ल.... आणि थोडा निवांत झाला....
समायरा : तुषार !!आज ऑफिसलाच मुक्काम ठोकायचा आहे का?? ऑफिस सुटलं आहे... चला
तुषार : चला...
क्रमश :
भाग 40 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
1 टिप्पण्या
धन्यवाद
उत्तर द्याहटवा