किती सांगायचं मला (भाग 40)

या वेळेस समायरा थोडी निवांत होती जणू संकंटांचा सामना करत ती आता थोडी निगरगट्ट झाली होती 🙂तर तुषार टेन्शनमध्ये😰 होता... 

 नलिनीला सोडून कसं जायचं.... मला करमणार का तिच्याशिवाय??... तुषार नुसता विचार करत होता... 

तुषार : समायरा !!दोन दिवस, फक्त दोनच दिवस आपल्या हातात आहे.... दोन दिवसांनी आपल्याला निघायचे आहे... 

समायरा : हो ना... आता घरी अजून एक खोटं बोलावं लागेल.... तूला माहीती तुषार !!मला कळतं तसं सगळ्यात जास्त खोटं मी या दोन अडीच महिन्यात बोलले आहे.... 

तुषार : हो गं, मी पण.... 

चला माझी बस दिसत आहे... निघते मी... 

बस पाहून,  ठीक आहे चल येतो मी असं तुषार म्हणाला... 

समायरा बसने घरी निघाली.... बस मध्ये बसली तोच

 समायराला पून्हा एका unknown नंबर वरतून फोन आला... या वेळेस मात्र समायरा सावध झाली होती... तिने टोनीचा फोन असेल म्हणून फोन उचलला नाही...

 तसंही कस्टमरला आपण आपल्या ऑफिसच्या वेळेतच फोन करण्याचे सांगितले आहे.... त्यामुळे आपण फोन उचलण्यास काही बांधील नाही..असा विचार समायराने केला.... 

 पण आलेल्या फोन मुळे समायरा खूप परेशान झाली... अगदीच अल्पावधीत टोनीने समायराच्या मनात घर केलं होतं... टोनीच्या विविध छटांवर ती घायाळ झाली होती...टोनी इतका श्रीमंत असूनही त्याचे पाय जमिनीला घट्ट रोवले होते.... त्याच्या वागण्यातून तो स्त्री जातीचा आदर करतो हे देखील जाणवले होते.... 

स्वप्नातील राजकुमार हा फक्त सिनेमा मध्येच भेटू शकतो अशी समजूत आजपर्यंत समायराची होती.... पण माझ्या स्वप्नातील राजकुमार माझ्या आयुष्यात येऊन मी त्याची होऊ शकणार नाही याच्यापेक्षा जास्त शोकांतिका काय आहे... बसमध्ये बसल्या ठिकाणी तिच्या अश्रुंचे ओघळ तिच्या गालावर आले.... बसचं ब्रेक लागलं... कंडक्टरने समायराच्या स्टॉपचं नाव घेतलं... समायराने हलकेच तीचे डोळे पुसले आणि बसमधून उतरली.... 

तुषारही त्याच्या घरी पोहोचला.... टेन्शन आल्यामुळे त्याचा चेहरा थकल्यासारखा दिसत होता.... 

तुषारची आई : तुषार !! आज मी तुझ्या काकांशी बोलले.. नलीनीच्या घरी रीतसर निरोप पाठवतो म्हणाले... 

हो का??  थोडासा खूष होऊन तुषार म्हणाला..... 

तुषार : आई !! बरं ऐक ना... 15 ते 20 तारखेला मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी उटीला जायचे आहे...पण मला तूला एकटं असं सोडून जावंस वाटत नाहीये..... 

तुषारची आई : हे बघ तुषार !! पहिले काम महत्वाचे, राह्यली माझी गोष्ट... मी पाच दिवस आपल्या गंगाबाई ला ठेवून घेते... 

तुषार : गंगाबाई?? 🤔

तुषारची आई : अरे बाजूच्या घरात घरकाम करते ती... तीला मी कालपासून आपल्या घरी देखील कामाला लावली आहे... दुपारी येत असते.... 

 अगं आई पण ती कालच लावली आहॆस ना तू....तुषार आईच्या काळजीपोटी म्हणाला 

तुषारची आई : अरे आपल्याकडे जरी आता काम करत असली तरी बाजूच्या घरी तीला दहा वर्ष झाले आहेत... आपल्याला परवडत नव्हतं म्हणून मी लावलं नव्हतं... पण आता काम होईना.... या शुगरमुळे नुसतं गळून गेल्यासारखं वाटतं बघ.... 

तुषार : आई !! तू पण ना... मी तीला लावलं म्हणून नाही म्हणालो गं....बरं तूला ती चांगली माहित आहे ना मग प्रश्नच मिटला..... 

तुषारची आई : माझी सून काय म्हणते.. तीची भेट झाली का?? 

तुषार  : आई !! तेच नलिनीला देखील माहिती नाहीये की मला उटीला जायचं आहे ते तीला भेटून सांगावं लागेल.... 

तुषारने नलिनीला फोन लावला..... 

तुषार : हॅलो, नलिनी !! 

नलिनीने फोन उचलला.... बोल तुषार.... 

तुषार : अगं तूला आज मला भेटायला जमेल का?? मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे.... 

नलिनी : ठीक आहे..... पण आज जास्त वेळ जमणार नाही....... 

तुषार : चालेल, पण किती वेळात पोहोचशील तू?? रोज गार्डनला भेटू... 

नलिनी : अर्ध्या तासात..... 
 
नलिनी तयार होऊ लागली..... 

नलीनीचे बाबा : नलिनी !! कुणी तुषार नावाच्या मुलाला ओळखतेस का तू... 

नलिनी एकदम घाबरून : का?  काय झालं बाबा?? 

नलीनीच्या बाबांनी नलिनीला तुषारचा फोटो दाखवला.. 

फोटो पाहून नलिनीला एकदम छातीत धस्स झालं... बाबाला कळालं की काय??  मग तर आपलं काहीच खरं नाही.. असा विचार करत असतानाच... 

नलीनीचे बाबा : अगं त्याच्या काकाचा निरोप तुझ्यासाठी  आला आहे....whatsapp वर बायोडाटा देखील आला... मला त्यात राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचं नाव दिसलं... म्हणून तू ओळखतेस का म्हणून विचारलं.... 

नलिनी : तुषार?? 🤔 हो आहे ना...

नलीनीचे बाबा : मग..... कसा वाटला तूला.... 

बाबा !! चांगला आहे पण मी काय तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाणार आहे?? असं म्हणून नलिनी लाजली🥰..... 

नलिनी तयार झाली..... आई, बाबा !!मी जरा बाहेर जाऊन येत आहे... एक छोटेसे काम आहे..... 

नलिनी घराबाहेर पडली.... 

तोच नलिनीच्या बाबांनी नलीनीच्या आईला आवाज दिला.. 

अगं : हे स्थळ आलं आहे ना... तो मुलगा आपल्या नलिनीला आवडतो वाटतं..... तुषारचा फोटो पाहून तीचा चेहरा एकदम खुलला 😊.... 

नलिनीची आई : तसं असेल तर चांगलं आहे.... तो मुलगा फौजीचा मुलगा आहे.... साहजिकच त्याच्यावर चांगले संस्कार असणार.... 

नलिनी रोज गार्डन पोहोचली... तुषार आधीच तिथे पोहोचला होता.... 

नलिनी : सॉरी सॉरी तुषार!! मला थोडा उशीर झाला... 

 हं आम्ही तर मक्ता घेतला आहे ना आधी पोहोचण्याचा तुषार लटक्या रागाने 😠म्हणाला.... 

नलिनी : अरे तसं नाही तुषार, मी निघत असतानाच बाबांनी तूझा विषय काढला.... तुझं स्थळ आलं आहे...

तुषार : अच्छा, म्हणजे काकांनी रीतसर निरोप पाठवला तर.... बरं झालं... काय म्हणाले बाबा मग... 

नलिनी :काही नाही फक्त मी तूला ओळखते का म्हणून विचारलं 

तुषार: मग तू काय म्हणालीस?? 

नलिनी : हो पाह्यलं आहे... असं म्हणाले... 


तुषार :अच्छा, बरं ऐक ना मी तूला दुसऱ्याच कारणासाठी बोलावलं आहे..... मला आणि समायराला पंधरा तारखेला उटीला जावे लागणार आहे.... 

नलिनी : उटी?? 🤔

तुषारने ऑफिस मध्ये झालेला सगळा प्रकार नलिनीला सांगितला.... 

नलिनी : अच्छा म्हणजे लग्न करायचं आपण आणि लग्नाच्या आधी तू हनिमूनला समायरा सोबत जाणार तू.... this is not fair.... नलिनीने तुषारची फिरकी घेतली😇... 

तुषार : नलिनी !! काय बोलू आता😒.... मला वाटलं तू मला समजून घेशील.... 

नलीनीला तुषारला अजून त्रास द्यायचा मूड झाला... 
नलिनी : तुषार !! कोणती मुलगी आपल्या बॉयफ्रेंडचं हनिमून दुसरी सोबत होणार हे सहन करेल..... 

ते ऐकून तुषारचा चेहरा एकदम पडला.... जाऊदे उद्याच नौकरीचा राजीनामा देतो..... तुषार बोलला.... 

नलिनी : वा रे वा, तू देशील रे राजीनामा... अन समायरा... तिचं काय??  तिला पण नौकरी सोडावी लागेल ना... 

तुषार : तूच सांग मग मी काय करू?? मला तर काहीच सुचत नाहीये.... 

नलिनी : तुषार !! किती भोळा आहॆस रे तू😍... मी तूझी गंम्मत केलेली पण तूला कळत नाही.... माझा तुझ्यावर आणि समायरा वर दोघांवरही विश्वास आहे.... तूम्ही टूर एन्जॉय करा... 

तुषार : नलिनी !! का गं प्रत्येकवेळी अशी जीवघेणी गंम्मत करतेस तू... 

बरं नाही करणार.... नलीनीने तीचे कान पुन्हा एकदा पकडले... 
 क्रमश :
भाग 41 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे .
 






.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या