तुषार ग्रेट👍
समायरा : थँक्स... तुषार घरी आईला सांगितलं का आपण उटीला जाणार आहोत ते...
तुषार: हो, अगं आईला एकटं सोडता येत नाही ना... त्या साठी नियोजन करणं जरुरी होतं पण लकीली आईसोबत एक गंगाबाई राहणार आहे म्हणून थोडं टेन्शन कमी झालं...
समायरा : आणि नलिनी?? नलिनीला सांगितलं का??
तुषार : हो, काल भेटून सांगितलं....आणि तुझ्या घरी??
समायरा : हो माझ्या घरी पण सांगितलं.... माझी आई थोडी नाखूष होती पण माझे बाबा तीला म्हणाले मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे...पण एक विचारू तुषार !!
तुषार : बोल ना??
समायरा : आपण हे असं उटीला जाणं कितपत योग्य आहे?? हा एक प्रकारचा विश्वासघात नाही का??
तुषार : हो गं समायरा!! खरंच या उटी टूरच्या बाबतीत मी पण संभ्रमात आहे... पण मार्था समोर आजवर कुणाचं काही चाललं का?? त्यात आपण नवीन एम्प्लॉयी.....
समायरा : हो... ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे.... जाऊदे आलिया भोगासी....
आता फक्त उद्याचाच दिवस बाकी आहे.... परवा तर आपल्याला निघायचं आहे... तुषार थोडा हताश होऊन बोलला.....
ऑफिसची वेळ संपली तितक्यात गणेशने एक पॉकेट तुषार जवळ दिलं... त्यात विमानाचे तिकीट आणि हॉटेल चे डिटेल्स होते.... आणि हॉटेल lakeview च्या मालकाचे एक पत्र होते
Hello
Dear Tushar and samayra, i am sending some details of your tour with this letter..
It includes air tickets, our hotel address and car driver's phone number..
Once you have reached the airport, you may call the driver to pick you up...
Thanking you
Hotel manager
तुषार : समायरा!! हे तुझ्या पर्स मध्ये ठेवतेस का?? माझ्या कडे ठेवायला काही नाही....
ठीक आहे असं म्हणून समायराने ते पॉकेट पर्समध्ये ठेवले....
दोघेही आपापल्या घरी गेले....
घरी गेल्या गेल्या समायरा पॅकिंग करायला लागली.. तितक्यात तिच्या घराची बेल वाजली.....
आता कोण आलं असेल 🤔असा विचार करत समायराने घराचं दार उघडलं....
समायरा : नलिनी तू??
नलिनी : का?? तूला कोण वाटलं??
समायरा : तसं नाही गं... तुझा कामाचा व्याप वाढलेला कळाला म्हणून म्हणाले....
नलिनी : समायरा !! काय करत होतीस....
समायरा : काही नाही... पॅकिंग करत होते...
समायराची आई : अरे नलिनी!!काय म्हणतेस कशी आहॆस.. तू समुचं ऑफिस जॉईन केलं आहॆस म्हणे....
नलिनी : हो काकू.... समायरा !! किती दिवस झाले तूमची परसबाग मी नाही बघितली.... चल ना थोडावेळ बागेत जाऊ....
समायरा :ठीक आहे चल...
खरं तर समायरा थोडीसी गोंधळून गेली होती..... तीचा परसबागेत जाण्याचा विशेष असा मूड नव्हता तरी ती नलिनीसोबत गेली....
नलिनी : समायरा !! कशी आहॆस तू??
समायरा : मी, छान आहे....
नलिनी : तू कधीपासून माझ्याशी खोटं बोलायला लागलीस... खरं सांग तूला कसलं टेन्शन आहे??
समायरा : ते होय... जाऊदे ना नलिनी.... तू आता इतकी खूष आहॆस त्यात माझं टेन्शन.... कश्याला...
नलिनी : असं कसं म्हणतेस समायरा !! मला ज्या ज्या वेळेस तुझी गरज भासली तेव्हा तू माझ्यासाठी हजर होती..
तू टोनीला हो म्हणणार होतीस ना....
टोनीचं नाव ऐकताच इतका वेळ साठवून ठेवलेलं सगळं तिच्या बाहेर आलं समायरा नलीनीच्या गळ्यात पडून रडायला लागली...
नलिनी : समायरा !! अगं थांब तुझी आई बघेल.... चल आपण त्या बंगईवर बसून बोलू....
नलीनीने समायराचा हात पकडला व बंगई कडे घेऊन गेली....
नलिनी : समायरा !! बोल आता
समायरा : नलिनी !! टोनी आणि मार्थाचा सुहास एकच व्यक्ती आहेत...
नलिनी :😳 काय??
समायराने टोनी कसा ऑफिसला आला आणि ती कश्याप्रकारे लपली सगळं नलिनीला सांगितलं...
नलिनी : oh म्हणून तू डिस्टर्ब आहॆस तर.... पण तू त्याला एकदा सांगून तर बघ... कदाचीत तो तूला समजून घेईल...
समायरा : काय सांगू ?? . तुझ्या आईला मी फसवते आहे.... ते ही लग्न केल्याचे नाटक करून... हे ऐकल्यावर कशावरून त्याला मी फ्रॉड वाटणार नाही.... त्या पेक्षा मी त्याला होकार नाही दिला तर....तसंही पुढच्या महिन्यात तो आपलं ऑफिस जॉईन करणार आहे...
मी एक वेळ नौकरी सोडून देण्याचा विचार देखील केला होता.... पण बाबा ऍडमिट झाल्याने विचार बदलावा लागला....
नलिनी : अवघड आहे.... पण अशक्य नाही.... समायरा !! एक तर तुझे लग्न झालेले नाही आणि दुसरे तूम्ही दोघेही ऑफिसच्या भल्याचं बघता.... तो वरचा आहे ना हे सगळं बघत असतो..... समायरा !! त्याच्यावर विश्वास ठेव... नक्की तुझं चांगलं होईल.... तू जास्त टेन्शन घेऊ नकोस...
समायरा : हं
नलिनी : काय हं... मस्त टूर एन्जॉय करा....
समायरा : नलिनी !! तूझा जळफळाट होत नाहीयेका.. मी चक्क हनिमून ला चालले आहे...
नलिनी : ते कसं आहे ना समायरा !! मी तूला तर खूप आधीपासून ओळखते आणि तुषारला आता आताच ओळखायला लागले... पण माझा तुमच्या दोघांवरती प्रचंड विश्वास आहे...
समायरा :हम्म, काय गं काही पण... एक खोटं बोललं की काय काय करावं लागत आहे ना...
खोटं?? कोण खोटं बोललं?? समायराची आई हातात चहाचा ट्रे घेऊन तितक्यात तिथे आली....
नलिनी : काही नाही काकू... असंच ऑफिस मधल्या गप्पा...
समायराची आई : नलिनी !!तू जाणार आहॆस का उटीला??
नलिनी : नाही काकू.. मी त्या कंपनीला जॉईन झाले आहे... पण माझ्या प्रोजेक्टपुरती.... तो पूर्ण झाला की पुन्हा दुसरीकडे....
समायराची आई : अच्छा....समु एकटीच जात ना म्हणून जरा काळजी वाटत आहे, बरं तूम्ही हा चहा☕️ घ्या....मला किचन मध्ये भरपूर काम आहे... निघते मी.....
समायरा नी नलिनीने सुस्कारा सोडला....
नलिनी : आपल्या गप्पा सुरु झाल्या की आपल्याला आजूबाजूला कोण आहे यांचं भानच रहात नाही.... या पुढे जरा हुशारीने वागायला हवे...
समायरा : बरं सध्याच तू ही गोष्ट तुषारला सांगू नकोस....तुमचं आताच जमलं आहे.... आनंद साजरा करा...
नलिनी : हो,अगं तूला सांगायचं राह्यलं... तुषारच्या घरच्यांनी मागणी घातली आहे.... तूम्ही टूर वरून आल्यावर रीतसर बघण्याचा कार्यक्रम होणार आहे...
समायरा : अरे वा, ही तर किती मोठी गूड news आहे.... नलिनी !! तूला काही वाटतं का?? तू इतक्या उशिरा सांगत आहॆस ते....
नलिनी : समायरा !! मी आज तूला काही सांगण्यासाठी म्हणून नव्हते आले... मी आले होते तुझ्यासाठी... मला तुझ्या मनात काय गोंधळ चालला आहे हे ऐकायचं होतं....
समायरा : नलिनी !! तुझ्याशी बोलल्यावर असं वाटलं की माझ्या डोक्यावर कुणी एक मोठा दगड ठेवला होता तो आता बाजूला झाला आहे.... खूप रिलॅक्स वाटत आहे...
नलिनी : गूड, असाच छान मूड राहू दे... जेव्हा आपल्यासोबत असं काही घडतं ना तेव्हा त्या वेळेस त्या गोष्टीचा विचारच आपल्या मनात येऊ द्यायचा नाही... स्वतःला कशात तरी गुंतवून घ्यायचं..... जर टोनी तुझ्या नशिबात असेल ना तर नक्कीच तो तूला मिळेल....
आणि माझं सिक्स सेन्स सांगत आहे की तो नक्कीच तूला मिळणार...
समायरा : god knows... पण आज बरं वाटतंय तुझ्याशी बोलून.. बरं झालं तू आलीस....
नलिनी : समायरा !! आता निघते मी....
समायरा : नलिनीचा हात पकडून..... थँक्स....
नलिनी : समायरा !! थँक्स काय गं... तू येत नाहीस का माझ्यासाठी धावत पळत....तशीच मी आले....
काकू !! येते मी....
समायराची आई : अगं इतक्यातच चाललीस....
नलिनी : हो काकू !! मला सध्या घरी देखील काम करावं लागत आहे... येते मी....
नलिनी निघून गेली....
समायरा देखील थोडी निवांत झाल्याने जरा मन लाऊन पॅकिंग करायला लागली...
क्रमश :
भाग 43 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
0 टिप्पण्या