टोनीने हॅकरला जे काम सांगितलं होतं ते अजून पूर्णत्वास आलं नव्हतं... त्यामुळे टोनी खूप बैचेन झाला होता...
एक दोन वेळेस त्याने समायराला अनोळखी नंबर वरून कॉल 📳 केला... पण समायराने टोनीचा आवाज ऐकताच तो कट केला....
समायराला खूप वाटायचं.... टोनीला एकदाचं सांगून टाकावं... .. पण माहिती झाल्यावर तो आपल्याला नौकरीवरून काढणार नाही हे कश्यावरुन..... आधीच काय कमी संकटे आहेत का?? की नौकरी गेल्याच अजून एक संकट.... नको..... नकोच सांगायला..... तसंही आनंदी राहणं आपल्या नशिबात कुठे आहे..... असं म्हणून तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असत..... प्रत्येक वेळी एकांतात ती त्यांना मोकळी वाट करून देत असे...
ईकडे दिवाकर आणि आशिष सुहासने ऑफिस जॉईन करण्यापूर्वी अजून काही हात मारता येतो का या दृष्टीने प्रत्येक पॅकेज मध्ये समोरच्या एम्प्लॉयीला नकळत लक्ष घालू लागले होते...
मार्थाचा आशिषवर प्रचंड विश्वास होता आणि त्याच्यावर ती सुहास इतकंच प्रेम करत असल्यामुळे त्याच्या छोटया मोठया चुकांकडे ती संपूर्ण दुर्लक्ष करत असे... आणि त्याचाच फायदा आशिष उचलत असे....
समायरा आणि तुषार उटीला जाणार असल्याचं कळाल्याने आशिषने हनिमून पॅकेजचे कस्टमर स्वतः करायचे ठरवले... जेणेकरून या पाच दिवसात येणाऱ्या प्रत्येक कस्टमरच्या पॅकेज मधून काही ना काही फायदा करून घेता येईल...
आशिष नुसता हपापल्या सारखं वागायला लागला होता नी तुषारला त्याचा अंदाज आला होता....
जर आपल्या कंपनीची app वापरात असती तर आशिषला काही घोळ करता आला नसता.... पण आपल्या माघारी आता पाच दिवस कस्टमरचं नुकसान होणार... आणि आपल्याला हे समजत असूनही आपण काहीच नाही करू शकणार....
काय करावं तुषारला समजत नव्हतं.... कस्टमरचं नुकसान हे तुषारच्या मनाला पटणारं नव्हतं.... मग त्याला एक छान कल्पना सुचली त्याने लागलीच समायराला फोन लावला...
तुषार : समायरा !! तू घरी बसल्या बसल्या एक काम करू शकशील का??
समायरा : तुषार !! लवकर होणार असेल तर का नाही??
तुषारने आशिष कश्याप्रकारे सगळ्या पॅकेजमध्ये लक्ष घालत आहे आणि आपल्या हनिमून पॅकेज मध्ये तो स्वतःचा कसा फायदा करून घेऊ शकतो ह्याची कल्पना समायराला दिली....
समायरा :बापरे, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं....
तुषार : म्हणून म्हणतोय मागे तू ज्या जाहिराती सोशल मीडियावर अपलोड केल्यास ना... त्या आता पून्हा कर.... या पाच दिवसाच्या स्कीमच्या हेडिंगची जोड दे... आणि लिही " श्रावण स्पेशल " म्हणून.....
समायरा : अरे तुषार !! हनिमून पॅकेज आणि श्रावण स्पेशल कॉम्बिनेशन थोडं विचित्र वाटत नाही का??
तुषार : समायरा !! वाटू देत विचित्र वाटलं तर.... ऍटलीस्ट आपल्या कस्टमरचं नुकसान तर होणार नाही ना.... होऊन होऊन होणार काय लोकं पाच दिवस मजाक उडवतील पण ते आपल्याला परवडेल.... नाहीतर इतक्या दिवसापासून आपण केलेली मेहनत पूर्णपणे वाया जाईल...
समायरा : ते ही खरंच आहे म्हणा.... पण आशिष?? त्याला अंदाज येईल की आपण हे मुद्दाम करत आहोत ते..
तुषार : हो, आशिष चिडणार... त्यात काही शंका नाही.... पण आपणही नंतर त्यातून मार्ग काढू......
समायरा : ठीक आहे मी लागलीच अपलोड करते म्हणून समायराने तीचा लॅपटॉप चालू केला....
समायराची आई : समु बेटा तू आता हे काय काम काढलंस... उद्या उटीला जायचं आहे ना... तुझी पॅकिंग पूर्ण झाल?
समायरा : बस्स आई, छोटंसंच अपलोडींगच काम आहे... आणि माझी पॅकिंग झाली आहे....
समायराने जसं तुषार म्हणाला होता तसं हेडिंग टाकून जाहिराती अपलोडींग ला लाऊन दिल्या....
अमोघ : बरं समु ताई !!आम्हाला उटीवरून काय आणणार??
समायरा : उटी स्पेशल 😉😉
अमोघ : काय?? उटी स्पेशल....
समायरा 😇😂😂 चहा आणि निलगिरी तेल....
अमोघ : काय ताई तू पण अशी थट्टा करतेस 🙄
समायरा : अरे अमोघ थट्टा नाही खरंच तिथल्या ह्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत....
अमोघ :😒
समायरा : अरे बापरे रुसला वाटतं माझा भाऊ.... बरं मी बघेन... नक्की काहीतरी आणेल... तू आता एवढंसं तोंड करून बसू नकोस.... सगळ्यात महत्वाचे म्हणजे तू बाबांच्या खाण्यावर जरा लक्ष ठेव... या पाच दिवसात त्यांना काही त्रास झाला नाही पाहिजे....
इतकावेळ सगळ्यांचे बोलणे शांतपणे ऐकत असलेलेआणि वर्तमान पत्र हातात असलेले समायराचे बाबा समायराला म्हणाले.. आता काय तूम्ही माझ्या खाण्यापिण्यावर पाळत🙄 ठेवणार?? ....
समायरा : ते काय आहे ना बाबा !! काल दुपारी देठे काकांसोबत चौकाच्या चाट वाल्याकडे जाऊन कोणीतरी कचोरी खाल्ली म्हणे...
समायराची आई : काय?? कचोरी.... अहो काय हे...😡 आताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो ना....
समायराचे बाबा : ते होय... अगं देठेनी जबरदस्ती केली... तरी मी नको म्हणत होतो....
समायराची आई : हो, जबरदस्तीने तोंडात कोंबली असेल...
समायरा :आई !! जाऊदे माफ कर गं बाबांना... बाबा !! मी सांगणार नव्हते... पण हे पाच दिवस मी जवळ नसणार म्हणून सांगितलं....
समायराचे बाबा : तू सांगितलं पण आता युद्ध पेटलं त्याचं मी काय करू....
समायरा : काही नाही... तह 😉 करा.....
समायराचे बाबा : अगं कुसुम!!... पुन्हा नाही खाणार असं... असं म्हणून ते समायराच्या आईला पटवायला लागले....
ईकडे तुषारने त्याची पॅकिंग सुरु केली.... आईने त्याचे सगळेच कपडे प्रेस केलेले त्याच्या पुढ्यात आणून टाकले...
तुषार : आई !!सगळेच कपडे प्रेस केलेले आहेत... तू कश्याला हे करत बसलीस....
तुषारची आई: अरे हे मी नाही केले... आपल्या गंगाबाईने केले.... तिने तुझे कपडे प्रेस केले, बूट पॉलिश केला... तुझं ब्रश दाढी सगळं सामान काढून ठेवलं आहे... तूला फक्त हे बॅग मध्ये टाकायचं आहे....
तुषार :अरे वा... म्हणजे आता नुसतंच बॅग भरायचे काम.... अगं आई !!मी तर या गंगाबाईला एकदा पण नाही भेटलो. ....
तुषारची आई: अरे उद्या सकाळी तूला किती वाजता जायचे आहे?
तुषार : सात...
तुषारची आई : मी तिला सहा वाजताच बोलावलं आहे... तूला दशमी बेसन करून देईल....
तुषार: 😊अगं माझी लाडकी आई !! मी विमानाने चाललो आहे... लवकरच उटीला पोहोचेल... दशमीची गरज नाही... पण तू तीला बोलावलंस ते बरं केलं... माझी भेट तरी होईल.... असं म्हणून तुषारने त्याची पॅकिंग उरकली....
झोपताना नलिनीला मेसेज केला... hi, तूला सोडून जावंस वाटत नाहीये.... पाय खूप जड झाले आहेत😒... मी तूला खूप miss करेल....
नलिनी जागीच होती.... तिने तो मेसेज बघितला आणि लागलीच reply केला... hi, मी पण तूला miss करेल...मी ह्या पाच दिवसात app च बरंच काम उरकून घेईल म्हणजे नंतर जास्तीचे काम करायची गरज पडणार नाही... आणि हे पाच दिवस भुर्रकन उडून जातील... तुषारला समजावण्याच्या सुरात नलिनी म्हणाली.. ...
तुषार : hmm, ok, good night, love you 😍😍😘
नलिनी : gn, love you too 😍😍🌹🌹🥰 झोप आता सकाळी लवकरच उठायचं आहे ना.....
क्रमश :
भाग 44 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
.
0 टिप्पण्या