किती सांगायचं मला (भाग 45)

तुषार आणि समायरा दोघांनाही किचन मध्ये नेण्यात आलं.. तिथल्या मेन शेफ ने त्यांच स्वागत केलं.... त्याना तिथल्या स्वयंपाकघराची पूर्णपणे माहीती देण्यात आली...

   तेथील स्वच्छता बघून ते दोघेही अवाक झाले होते... त्या शेफ ने काही टिप्स मागितल्या तेव्हा तुषार म्हणाला तुम्हाला टिप्स देण्यापेक्षा इतर ठिकाणी देखील अश्याच स्वच्छतेचा अवलंब झाला तर आपल्या या पॅकेजेस ना देखील विशेष महत्व येईल 

तुषार :समायरा !! हा पॉईंट आपण आपल्या कंपनीच्या app मध्ये टाकू शकतो..... 

समायरा  : खूप छान आयडिया आहे... तुषार !! तू नलिनीला फोन करून सांग मग 😉

तुषार : 😊 हं.... 

तुषारने वेळ न दवडता बाजूला जाऊन नलिनीला फोन लावला.... 

तुषार : हॅलो, नलिनी !!कशी आहॆस... missing you 

नलिनी : अरे तुषार कुणी ऐकेल तिथे... पण really missing you too...😍

बरं ऐक ना मी तूला काही फोटो आणि माहिती पाठवतो तू ती app मध्ये टाकू शकतेस का ते बघ... ठीक आहे ठेवतो... love you bye 

नलिनी :love you too, bye 
तितक्यात तुषार तिथल्या शेफ जवळ गेला आणि म्हणाला 
सर आता काही वेळातच आपल्या इव्हेंट मॅनेजरचे इथले कार्यक्रम सुरु होतील.... तूम्ही बँक्वेट हॉल मध्ये पुन्हा जा.... 

किचनचा दुसरा दरवाजा उघडला की बँक्वेट हॉल लागत होता.... 

दोघेही बँक्वेट हॉल मध्ये गेले तेव्हा दोघांच्याही अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला... आणि आवाज आला... 

Welcome to our beautiful world. Welcome Tushar and Samayra.. a lovely couple and todays attraction 

अश्या अचानक झालेल्या स्वागताने दोघेही भारावून गेले.... दोघांनाही काहीच समजेनासे झाले होते... 
आज जर टोनी माझ्यासोबत असता तर??किती मस्त वाटलं असतं.... असा समायरा विचार करू लागली तर तुषार नलिनीला मीस करत होता..... 

तितक्यात इव्हेंट करणाऱ्या व्यक्ती ने सुमधुर संगीत  लावले
टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. .. गाण्यासोबत दोघांना नृत्य करायला सांगायला लागले ...

सुरुवातीला दोघांनीही आम्हाला काहीच नृत्य येत नाही आम्ही नृत्य करत नाही असा सुर लावला.... तर तूम्ही उदघाट्न केल्याशिवाय बाकी जोडप्याना डान्स सुरु करता येणार नाही असा फर्मान सोडला गेला... 

तुषार आणि समायरा मग तसेच तिथे उभे राहीले.. मग त्या इव्हेंट करणाऱ्या  माणसाने एक कोरिओग्राफ्रर त्यांच्या समोर पाठवला... 

मग त्या कोरिओग्राफरने अरे तूम्ही एकदम अनोळखी असल्यासारखं काय करताय?? हा असा तूम्ही मॅमच्या कमरेवर उजवा हात ठेवा आणि डावा हात खांद्यावर तूम्ही पाऊले टाकत पुढे जा आणि मॅम तूम्ही सोबतच मागे या.... 

मग जसं जसं कोरिओग्राफर सांगेल तसा डान्स यांनी करायला सुरवात केली..

मग बाकीच्या जोडयांनी देखील टाळ्या वाजवून नृत्य करायला सुरवात केली...

तुषार आणि समायरा थोड्याश्या अवघडलेल्या स्थितीत थोडा वेळ नृत्य करून बाजूला झाले... 

कोरिओग्राफरला आम्ही नृत्य करून थकलो असं खुणावलं..

समायरा आणि  तुषार एका कोपऱ्यात आले... आता संगीतात देखील त्यांना एकमेकांचा आवाज ऐकू येत होता.... 

तुषार :आयुष्यात पहिल्यांदाच कंबर हलवली आहे मी... आपली नौकरी आपल्याला अजून काय काय करवणार देव जाणे.... 

समायरा : हो ना... मी तर शाळेत नृत्य केलेलं... त्यानंतर आताच.... 

समायरा : तुषार !! अरे काय गोंधळ सुरु आहे बघ...

तुषार : अगं तो इव्हेंट करणारा माणूस त्यांच्या पुढ्यात काहीतरी चिठ्ठया टाकत आहे....

जोडयांना चिट्ठीनुसार काही ना काही करून दाखवायचं आहे..... 

समायरा : बरं झाले आपण वाचलो... 

तुषार :समायरा !! संभ्रमात राहू नकोस... आपण चीफ गेस्ट आहोत.... आपल्याला चिट्ठीशिवाय काही करायला लावतील... 

तिथे असलेल्या जोडप्यांच्या स्पर्धा सुरु झाल्या.... प्रत्येकाच्या चिट्ठीमध्ये एक प्रॉपर्टी ठेवली होती... ती प्रॉपर्टी वापरून प्रत्येक जोडीला सगळ्यांसमोर काही ना काही करायचे होते.. कुणाला अंगठी💍 मिळाली, कुणाला खुर्ची🪑, कुणाला झाडू🧹, कुणाला रुमाल 

तर तुषार आणि समायराला पुन्हा एकदा गुलाबाचे फूल....त्यांच्या हातात डायरेक्ट दिले गेले.... . 

या वेळेस तुषार आणि समायराच्या आग्रहाखातर दुसऱ्या जोडप्याने सुरवात केली.... 

... उंगली मे अंगुठी अंगुठी मे नगीना... तेरे बिन मुश्किल हो गया जीना जीना जीना... गाण्यावर अंगठी मिळालेले जोडपे असे थिरकले की सगळ्या जोडयांना आता आपण पण याच्यापेक्षा चांगलं करून दाखवावं असं एक आव्हान वाटायला लागलं.... 

तुझ्या प्रेमाखातर मी ही खुर्ची देखील सोडली असं बहारदार नाटक खुर्ची मिळालेल्या जोडप्याने केलं... 

जबसे हुई है शादी आसू बहा रहा हूं,  रहा हूं आफत गले पडी है उसको निभा रहा हूं असा झाडू असलेल्याने झाडू मारून दाखवत त्या गाण्यावर नृत्य केलं.... 

शेवटी आता वेळ आली तुषार आणि समायराची... तुषारने तिथे असलेल्या गमती जमतीचा फायदा उचलत... समायराच्या समोर गुडघे टेकून तो म्हणाला... ये जो कांटो को उपर खिला है वह गुलाब🌹 तेरे सहेलीकेही  लिये बना है 😉

तिथे असलेली सगळी जोडपी जोक आहे असं समजून खूप हसली 😇😃😃

तुषार आणि समायराला एकदाचं सुटल्यासारखं वाटत होतं... 

सगळ्यांना भुका लागल्याने जेवणाची व्यवस्था केली गेली होती.... 

जेवण झाल्यावर सगळे जण आपापल्या कॉटेज कडे गेले.... 

समायरा : तुषार !! मज्जा आली नाही आज....पण हे इव्हेंट वाले काय करतील कोण जाणे.. 

तुषार : समायरा !! उद्या काय करू साईट सीन झाल्यावर आपण काही नवीन हॉटेल उत्सुक आहेत त्यांना भेटी देऊ म्हणजे आपली यांच्या तावडीतून सुटका होईल.... 

ईकडे समायराचा नंबर हॅकरला ट्रॅक झाला...त्याने टोनीला समायराचे लोकेशन उटी सांगितलं.... 

उटी?? आता ही उटीला कश्यासाठी गेली असेल टोनी असा विचार करत असतानाच मार्थाने उटी चा विषय काढला. ...

मार्था : टोनी !! उटी मधले बरेच हॉटेल्स आपल्या टूर्सच्या कंपनीसोबत जॉईन व्हायचं म्हणत आहेत... तसं आपल्या कंपनी मधलं एक नवीन जोडपं गेलं आहे तिथे... त्यांना ते हॉटेल्स बद्दल बघून डील करायला सांगू का?? 

टोनी :मॉम, कुठे म्हणालीस उटी??  अगं तू म्हणत आहॆस की ते जोडपं नवीन आहे... पण त्यांच्यावर आपण किती विश्वास ठेवणार?? .. खरं सांगायचं तर टोनीला मार्थावर खूप विश्वास होता.... पण समायराला गाठण्याचा हा चांगला चान्स असल्यामुळे त्याला तो जाऊ द्यायचा नव्हता.... 

टोनीने मार्थाला पटवून लागलीच दुसऱ्या दिवशीचे विमानाचे तिकीट बुक केले...
क्रमश :
भाग 46 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
वाचकांसाठी : सर्व प्रथम कधी कधी माझ्या नियमित लिखाणामध्ये खंड पडत आहे. त्या मुळे मी तूमची मनापासून माफी मागते. 

मी एक सरकारी वैद्यकीय अधिकारी असून आता आलेल्या जागतिक महामारीच्या संकटात मी काम करत आहे. त्या मुळे ड्युटीच्या वेळेस लिखाणाचे कमी जास्त होत आहे.. 
आशा आहे माझे प्रिय वाचक माझा हा प्रॉब्लेम समजून घेतील.

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे .
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या