किती सांगायचं मला (भाग 46)

आशिष आणि दिवाकर ने आता तुषार आणि समायराची जागा घेतली होती.... 

श्रावण स्पेशल ची जाहिरात बघून नवे तर नवे काही जूने जोडपे देखील हनिमून पॅकेज बुक करायला आले होते....

 कस्टमर ची गर्दी पाहून आशिष दिवाकरला म्हणाला  बघा बाबा आपला पायगुण रोजच्या पेक्षा जास्त कस्टमर आले आहेत.... 

आशिष ने बुकिंग करायला सुरवात केली... आशिष ने पॅकेजची किंमत सांगितल्यावर तिथे असलेला कस्टमर संभ्रमात पडला आणि आशिषशी वाद घालायला लागला... 

आशिष देखील त्या कस्टमरच्या वाद घालण्याने गोंधळून गेला... 

मग त्या कस्टमरने जाहिरात दाखवली.... 

आशिष चांगला तोंडघशी पडला....  जाहिरात पहिल्यावर आपण कसलाही गैरफायदा उचलू नये म्हणून तुषार आणि समायरा ने हा केलेला प्लॅन आहे हे त्या दोघांच्याही लक्षात यायला वेळ लागला नाही.... 

आशिष : रजनी आणि प्रदीप तूम्ही दोघेही आज हे कस्टमर 
करा... 

रजनी :   ती मस्त तिकडे मज्जा करत असेल आणि त्या बदल्यात आम्ही डबल काम करणार 😏... 
प्रदीप !! काही खरं नाही रे आपलं ईथे ना जो काम करतो तोच मरतो 😒

प्रदीप : तूला खूप लोड वाटत आहे का?? मी करतो काम.. फक्त तू अशी उदास होऊ नको.... 

आशिष आणि दिवाकर दोघेही त्यांच्या केबिन मध्ये गेले 

आशिष : बाबा !! येउदे त्या तुषारला... आल्यावर त्याची अशी बघतो ना.... त्याने आशिषशी पंगा घेतला आहे...त्याला माहिती नाही आशिष काय चीज आहे ते..... .. 

दिवाकर : आशिष !! तरी मी आधीच म्हणत होतो... पण आता इतकं गरम होऊन चालणार नाही आपल्याला जरा  थंड डोक्याने काम करावं लागेल....त्याची सगळी माहिती काढावी लागेल.

असं म्हणून दिवाकर आणि आशिष तुषारच्या विरोधात कट रचायला लागले 

दुसरा दिवस उजाडला समायरा नी तुषार नाश्ता करून साईट सीन ला निघाले... 

चहाची शेती... ती शेती करायला जाणाऱ्या बायका...हिरवागार डोंगराळ घाट सगळंच कसं मन आणि डोळे तृप्त करणारं होतं..दोघेही ते बघून खूष व्हायचे... 

पण तुषारला नलिनीची आठवण यायची आणि समायराला टोनीची.. मनातल्या मनात दोघेही आपल्या नशिबाला दोष देत असत....

टोनी सकाळच्या विमानाने ✈️उटीला पोहोचला...घरून निघतानाच त्याने हॅकर च्या मदतीने समायराचे लोकेशन चेक केले होते....

काय योगायोग आहे समायराचं लोकेशन आणि आपल्या कंपनीसोबत जॉईन झालेलं हॉटेल एकच आहे... समायराचे लग्न झालेले नसेल ना?? असा विचार टोनीच्या मनात आला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली... हे हॉटेल हनिमून पॅकेज साठी प्रसिद्ध झालेलं आहे..... पण आता आलो आहोत तर खात्री केल्याशिवाय पर्याय नाही..... 

टोनी हॉटेल lake view वर पोहोचला.... त्याचे देखील तिथल्या हॉटेल मॅनेजरने जंगी स्वागत 💐💐केले.... वेलकम सुहास सर... 

सुहास : मला हे स्वागत सत्कार हा प्रकार आवडत नाही... या सगळ्या गोष्टींची माझी आई हकदार आहे.... तरीही तूम्ही इतक्या उत्साहाने माझं स्वागत केलं आहे तर मी त्याचा आदर करतो.... बरं, आमच्या कंपनी मधलं एक जोडपं आलं आहे ते कुठे आहे.... 

हॉटेल मॅनेजर : सर त्यांना साईट सीन साठी पाठवलं आहे.... ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येतील..... 

सुहास : ठीक आहे... आल्यावर मला त्यांना भेटायचं आहे.... 

हॉटेल मॅनेजर: ठीक आहे....मी त्यांना कळवतो.... 

सुहासने मग मार्थाने दिलेल्या हॉटेल्सची यादी चेक केली त्यातील जवळचे दोन  हॉटेल्स निवडले आणि दोन्हीही हॉटेल्सला भेट देण्यासाठी निघून गेला.... 

समायरा आणि तुषार निसर्गरम्य वातावरणात रमून गेले होते... त्यांना सगळं खूप आवडलं होतं.... 

समायरा : तुषार !! किती तरी हिंदी सिनेमांची शूटिंग ईथेच झाली आहे....  किती सुंदर आहे ना उटी?? म्हणूनच शूटिंग साठी हे ठिकाण निवडत असतील... 

तुषार : हो, खरंच खूप सुंदर आहे... खरं पाहावं तर त्या हॉटेल मधला ताण सोडता बाकी ठिकाणी खूप रिलॅक्स वाटत आहे... नाहीतर रोज रोज तेच ते काम... तेच ते नवरा बायकोचे नाटक... तेच ते आशिष आणि दिवाकर.... 

समायरा : तुषार !!  पण आशिष आणि दिवाकर आता काय करत असतील... का आणखी काही त्यांच्या डोक्यात शिजत असेल??

तुषार : एव्हाना त्यांना आपण केलेल्या जाहिरातीमुळे दोघांचीही डोके सटकली असणार... समायरा !! इथून गेल्यावर आपल्याला एका नवीन आव्हानाला सामोरं जावं लागणार.... 
.
समायरा :जाऊदे आता कुठे तरी टेन्शनफ्री वाटायला लागले आहे... तिथे गेल्यावर बघता येईल....

दोघेही परत हॉटेलवर पोहोचले...मग दोघेही फ्रेश होऊन हाय टी ☕️साठी बँक्वेट हॉल कडे गेले.... 

चहा नाश्ता घेत असतानाच हॉटेल मॅनेजर आणि सुहास  दोघेही तुषार आणि समायरा जवळ आले.. 

हॉटेल मॅनेजर : excuse me, यांना तुम्हाला भेटायचे आहे... सुहास सर हे मिस्टर तुषार आणि ही मिसेस समायरा 

टोनी आणि समायरा एकमेकांना बघून भयंकर😳😳 विस्मयचकित झाले....

तुषार : सुहास??  हॅलो सुहास !!तूम्ही ईथे?? 

सुहास : मी ईथे... हा !!आपल्या कंपनीच्या कामासाठी आलो आहे... समायरा !! Are you married?? आणि तू आमच्या कंपनीची एम्प्लॉयी आहॆस?? मग तेव्हा तू कुठे होतीस?? जेव्हा मी ऑफिसला आलो होतो... तू मला तिथे दिसली नाहीस... माझ्या माहीतीप्रमाणे तूम्ही दोघे जॉईन होऊन दोन महिने झाले असतील हो ना?? ... 

समायरा सुहासच्या प्रश्नांना उत्तर तरी काय देणार होती तिच्या डोळ्यातून एकदम अश्रू वाहायला लागले... ती डोळे पुसून excuse me म्हणून तिथून निघून तिच्या कॉटेज कडे निघून गेली... 

सुहास : काय झालं हिला... मी काही चुकीचं बोललो का?? 

तुषार : हं प्रवासाने थकली होती ती पण,तूम्ही दोघे एकमेकांना ओळखता का??  

सुहास  तुषारच्या प्रश्नाने एकदम भानावर आला आणि म्हणाला हं अशीच एक दोनदा भेट झाली होती..असं सांगत मॉल मधला किस्सा सांगितला... 

तुषार :  अच्छा !! मग बाकी हॉटेल्सच्या visit झाल्या का?? 

सुहास : हं... दोन जणांना भेटलो.... 

तुषारने मग सुहासला हॉटेल lake view हॉटेल ने कश्याप्रकारे प्रगती केली यांचे डिटेल्स दिले... 

पण सुहासचं मात्र कशातच लक्ष नव्हतं... कारण त्याच्या एकही प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले नव्हते.... 

का समायराने मला एकदाही सांगितलं नाही की तिचं आधीच लग्न झालेलं आहे... अशी कशी वागली ही... तिने काही रिप्लाय पण दिला नव्हता... म्हणून मी तीला धोकेबाज देखील म्हणू शकत नाही.... मग ती अशी का गेली.... सुहास खूप गोंधळून गेलेला होता.... 

काही असो एकदा तरी या समायराशी बोलायचं....मी तीला प्रपोज केलं तेव्हा का काही बोलली नाही... का माझ्या भावनांशी खेळली.... तिचं लग्न झालं हे लपवायचं काय कारण होतं?? असं सुहासने मनोमन ठरवलं

क्रमश :
भाग 47 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे .
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या