किती सांगायचं मला (भाग 47)

समायरा कॉटेज मध्ये पळतच गेली... बेडरूमचा दरवाजा आतमधून लाऊन घेतला... तिथे जाऊन तिथल्या  कॉटवर पहुडली... आणि रडायला लागली.... रडत रडत म्हणायला लागली देवा !! मी टोनीला miss करत होते... पण तो अश्या पद्धतीने माझ्या समोर यावा अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती.... 

समायरा पुन्हा उठून बसली आणि टोनीला सांगून टाकायचं का एकदा जाऊदे जे होईल ते होईल... काय करेल तो?? मला खोटारडी ठरवून नौकरीतून काढून टाकेल.... आणि आयुष्यातून?? 

आयुष्यातून तर तो असाही जाणार आहे आणि तसाही?? त्याला कळालं की मी त्याच्या आईला फसवते आहे... तो कशाला माझा स्वीकार करेल... समायरा या सगळ्या गोष्टींचा वारंवार विचार करायला लागली.... 

देवा असं म्हणतात की खरं प्रेम आयुष्यात फार कमी जणांना मिळतं... मला वाटलं की मी खूप नशीबवान आहे की ज्या टोनीच्या प्रेमात 😍मी पडले तो देखील माझ्यावर प्रेम करतो... पण हे काही क्षणांपुरतंच.... माझ्या नशिबानेच माझ्यासोबत असा का खेळ केला.... 

जाऊदे काहीही असो... लागलीच समायराने तीचे डोळे पुसले आणि टोनीला भेटायला निघाली.... 

तितक्यात तीचा फोन खणखणला 

समायराने फोन बघितला... आईचा फोन... अरे हो, आज मी आईला फोन करणार होते... या सगळ्या गोंधळात विसरून गेले... समायराने फोन 📳कानाला लावला. 

समायराची आई : समु बेटा !! तू कशी आहॆस... तूझा फोन📳 नाही आला म्हणून काळजी वाटत होती.... 

समायरा : अगं आई मी मस्त आहे...उटी खूपच सुंदर😍 आहे... आपण सगळेचजण ईथे एकदा नक्की येऊ.. 

समायराची आई : अच्छा अच्छा म्हणजे सगळं एकदम उत्तम चालू आहे तर... मग एन्जॉय कर.... 

ठेवते फोन म्हणून समायराच्या आईने फोन📳 ठेवला... 

कोण जाणे आईला कसं कळतं ते की मी खूप परेशान आहे... तीचा किती जीव आहे माझ्यावर...नाही... मी नाही सांगणार टोनीला... समायरा या सगळ्या प्रकाराने नुसतीच रडायला लागली... 

अर्धा तास झाला होता... तुषार कॉटेज मध्ये येऊन समायरा बेडरूमचे दार कधी उघडेल याची वाट पाहू लागला.... त्याने एक दोन वेळेस दरवाजा वाजवला.... 

समायरा स्वतःच्या तंद्रीमध्ये असल्यामुळे तीला तुषारचा आवाज ऐकू आला नाही... त्यामुळे दरवाजा उघडला नाही... 

समायराने दरवाजा उघडला नाही म्हणून तुषार घाबरून गेला... बाहेरून जाऊन त्याने खिडकीतून बघितलं... समायरा त्याला रडत असलेली दिसली... त्याने समायराला फोन लावला... पण आईशी बोलल्यावर समायराने फोन सायलेंट करून ठेवल्याने  तुषारचे कॉल miss झाले... 

शेवटी समायराच्या काळजीपोटी तुषारने नलिनीला फोन📳 लावला.... 

तुषार : नलिनी !! सध्या तू कुठे आहॆस... मला तूला खूप महत्वाचे बोलायचे आहे... 

नलिनी घरी होती... नेटवर्कचा बहाना करून नलिनी  बाहेर गार्डनमध्ये आली.... 

नलिनी : बोल तुषार !! काय झालं?? तू थोडा डिस्टर्ब वाटत आहॆस... 

तुषारने मग सुहास आला आणि तो भेटल्यापासून समायरा रूम लावून रडत बसल्याचे सांगितले..... 

नलिनी : टोनी?? टोनी कसाकाय तिथे पोहोचला 

तुषार : टोनी नाही गं, "सुहास "

नलिनी : तेच ते... टोनी आणि सुहास एकच व्यक्ती आहेत... आम्ही दोघीही या पूर्वी त्याला भेटलो आहे... तुषार !! त्याने समायराला प्रपोज केलं होतं.... पण त्यावेळेस तो आपल्या बॉस चा मुलगा आहे हे समायराला माहीती नव्हतं... समायराचं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे... ती त्याला होकार देणार होती आणि तीला कळालं तो मार्थाचा मुलगा आहे म्हणून... 

तुषार : अच्छा... असं आहे तर.... इतकी मोठी गोष्ट अन तू देखील मला सांगितली नाहीस... 

नलिनी : अरे तुषार !! आपल्या आनंदात विरजण नको म्हणून समायराने मला अगदी परवा पर्यंत काहीच सांगितलं नव्हतं.... पण बरं झालं मी तिला भेटायला तिच्या घरी गेले....मला तेव्हा तिने सगळं सांगितलं.... 

नलिनी : तुषार !! बाबा येत आहे... मी फोन ठेवते... 

नलिनीचे बाबा  : नलिनी !! काय फोन वर होतीस का?? बोलायचे असते ना... मला थोडं बाहेर जायचं आहे म्हणून मी आलो होतो... 

नलिनी : नाही बाबा  !!माझे बोलून झाले होते...
असं म्हणून नलिनी घरात  निघून गेली... 

नलिनीशी बोलल्यानंतर तुषारने काहीतरी विचार केला

 आणि मग तो परत समायराशी बोलायला गेला... या वेळेस समायराने दरवाजा उघडून ठेवलेला होता.... 

तुषार : समायरा !! उटीमधल्या एका हॉटेलच्या मॅनेजरने मिटिंग साठी बोलावलं आहे... तू थकलेली दिसत आहॆस... तू आराम कर,  मी जरा जाऊन येतो....

समायरा डिस्टर्ब झालेली होती... त्या मुळे तिने होकार दिला आणि आराम करायला लागली.... 

तुषार हॉटेल मॅनेजर जवळ गेला आणि त्याने सुहासचा पत्ता विचारला... 

सुहास देखील डिस्टर्ब असल्या कारणाने त्याच्या रूमवरच थांबला होता... उद्या राहिलेल्या हॉटेल्स बघून संध्याकाळी कुठली फ्लाईट आहे का याचा घेऊ असा विचार करत असतानाच त्याच्या रूम मधला लँडलाईन फोन वाजला... 

आता आपल्याला ईथे कोण फोन करणार?? मॅनेजर असेल असा विचार करत सुहासने रिसिव्हर कानाला लावला.... 

सुहास मी तुषार बोलतोय... मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं प्लीज आता आपल्या या हॉटेलच्या बाहेर एक छोटीशी बाग आहे तिथे येऊन भेटशील का?? 

सुहास : तिकडे कश्याला?? माझ्या रूमवर ये ना... ईथे दुसरं कुणी नाही ईथेच बसून आपण बोलू... तसंही आज मी खूप थकलोय.... 

तुषार : ठीक आहे... मी येतो तिकडे..... 

असं म्हणून पाच मिनिटातच तुषार, सुहासच्या रूम मध्ये गेला... 

सुहास तुषार येईपर्यंत फ्रेश झाला.... 

सुहास : ये तुषार, बस ईथे... 

सुहास ने रिसेप्शन वर फोन करून दोन कॉफी मागवल्या..
तुषार : थँक्स.. how are you?? 

सुहास : fine पण तू मला हे का विचारत आहॆस?? 

तू समायराला प्रपोज केलं होतं ना.. तुषार जरा दबक्या आवाजात बोलला... 

सुहास : प्रपोज... हो केलं होतं मी समायराला प्रपोज.. पण सॉरी मला खरंच माहिती नव्हतं की ती married आहे आणि तू तीचा husband आहे... मला ती दिसली... मला आवडली आणि मी सरळ जाऊन विचारलं... विचारही केला नाही की ती married असू शकेल याचा... मला इतकी घाई झाली होती की मी तिच्या आयुष्यात काय  चाललं आहे याची माहिती काढण्याची तसदी देखील घेतली नाही.... 

तुषार : म्हणूनच मी आलो आहे.... समायराच्या आयुष्यात काय चाललं आहे ते सांगण्यासाठी......

सुहास : म्हणजे 😳..आणि आता मला इंटरेस्ट नाही हे जाणून घेण्यात.... 

तुषार : सुहास !! इतक्या घाईत कुठल्याही निर्णयावर तू पोहोचू नकोस.... 

सुहास : गोंधळून...तू काय म्हणत आहॆस?? 

तुषार :हे बघ सुहास !!मी तूला सगळं सांगतो पण मला तू प्रॉमिस कर की या सगळ्या गोष्टींचा परिणाम तू समायराच्या नौकरीवर होऊ देणार नाहीस.... कारण या सर्व गोष्टींना सर्वस्वी मी जबाबदार आहे... 

सुहास : कुठली गोष्ट आणि नौकरीवर परिणाम?? तुषार  तू असं कोड्यात नको बोलूस .... जरा सविस्तर सांग ना....

तुषार : माझं आणि समायराचं लग्न झालेलं नाहीये... 

सुहास : काय 😳, तू हे खरं बोलत आहॆस?? .. मग 

तुषार :सांगतो सांगतो... अगदीच सुरुवाती पासून सांगतो.... असं म्हणून त्याची आणि समायराची भेट कशी झाली मग त्यांची गरज आणि ते कंपनीला कसे जॉईन झाले ही सर्व हकीकत सुहासला सांगितली आणि तुषार सुहासला म्हणाला... मी समायराला हे नाटक करायला भाग पाडलं तिच्या डोक्यात असलं काहीही नव्हतं... 

सुहास : नाटक?? असं कुणी लग्न झाल्याचं नाटक करतं का?  मला माहिती नाही, तूझा यात काय फायदा आहे.. पण तू आता हे सगळं खोटं बोलत आहॆस ना?? 

तुषार : नाही... हे सर्व खरं आहे....परिस्थितीपुढे आम्ही झुकलो... खरंच त्यासाठी i am sorry... पण आमचं नातं वगळता आम्ही कुणाचीही कुठलीही फसवणुक केली नाही.... 

सुहास : पण खोटं ते खोटं ना.... 

तुषार : या संपूर्ण गोष्टींमध्ये मीच दोषी आहे... समायरा नाही.. जर तूला काही ऍक्शन घ्यायची तर माझ्यावर घे... मला नौकरीवरून काढून टाक.... पण समायराला नको... 

सुहासने थोडा विचार केला ठीक आहे...... 

तितक्यात त्यांची कॉफी आली.... 

क्रमश :
भाग 48 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे .
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या