आज आशिष ने काही पैसे💸 देऊन एका माणसाला ऑफिस सुटल्यावर तुषारचा पाठलाग करायला सांगितलं...
ऑफिस सुटल्यावर समायरा आणि तुषार नेहमीप्रमाणे घरी जायला निघाले...
पण आज त्या दोघांचा कुणीतरी पाठलाग करत आहे हे त्यांना माहीतच नव्हते...
दोघेही नेहमीप्रमाणे बसस्टॉप पर्यंत सोबत आणि नंतर समायरा बस साठी थांबली. तुषार त्याच्या बाईकवर निघून गेला... हे त्या गुप्तहेराने टिपले... लागलीच त्याने आशिषला फोन लावला.... आणि दोघेही वेगवेगळ्या दिशेने गेले हे त्याला सांगितले...
आशिष चिडून : मग तू काय तिथेच थांबलास... तू तुषारचा पाठलाग करायचा ना??
गुप्तहेर : मला त्यांच असं जाणं विचित्र वाटलं म्हणून त्याची मी नोंद केली... तूम्ही मला दोघांचाही पाठलाग करायला सांगितलं आहे आता एकाच वेळी मी दोघांचा पाठलाग कसा करणार🙄 तेही सातशे रुपयात💸...
गुप्तहेराच्या त्या वाक्यावर आशिष अजून जास्त चिडला. 😡
तूला माहीती आहे का तू कितपत माहीती काढली आहॆस??
गुप्तहेर : म्हणजे??
आशिष :अरे बाबा कधी कधी समायरा तिच्या आईच्या घरी जाते... हे तर मला देखील माहीती आहे....
तितक्यात टोनी त्याची गाडी घेऊन तिथे आला.... समायराला त्याच्या गाडीत बसवलं... गुप्तहेराने पून्हा त्याची नोंद घेतली.... आणि आशिषला फोन📳 लावला
आशिष : काय आहे आता?? तू मला साध्या साध्या गोष्टींना फोन 📳लावत जाऊ नकोस बरं.....
गुप्तहेर : साधी गोष्ट नाही घबाड आहे घबाड... या गोष्टी साठी मला तूम्ही आनंदाने💸💸 पैसे द्याल....
आशिष : आधी गोष्ट सांग मग ठरवू काय द्यायचे (की तूला ठेवायचे, हे मनात बोलला )
गुप्तहेर : सुहास सर आले आणि समायराला सोबत घेऊन गेले....
आशिष : काय 😳, सकाळी पण हा तिच्याजवळ उभा होता आणि आता चक्क तीला तो घेऊन गेला... दाल मे कुछ तो काला है !
समायरा : टोनी आज जे झालं ते झालं उद्यापासून नको व्हायला असं??
टोनी : काय??
समायरा : सगळ्यांना कळेल ना??
टोनी :काय??
समायरा : आपलं??👩❤️👨
टोनी : आपलं 👩❤️👨काय??
समायरा लाजून : जाऊ दे बाबा🤩🥰
टोनी :लाजताना🥰 किती गोड दिसतेस तू...
समायरा :🤦♀️, मी काय म्हणते आणि तू काय म्हणतोस
टोनी : 😂 😂 तसंही आज ना उद्या ते कळणारच... त्याची कुणाला भीती
समायरा : अरे आमची नौकरी जाईल ना...
टोनी :मग मी कश्यासाठी आहे... मी बरी जाऊ देईन नौकरी...
ते ऐकून समायरा निरुत्तर झाली 😢
समायराला असं शांत पाहून टोनी बोलला... बरं बाई !!यापुढे नाही येणार असं मी.... आपण काय करू एक वेगळं ठिकाण ठरवू आणि तिथे तुषार तूला सोडेल आणि मी कलेक्ट करेल... मग तर झालं....
समायराने आणि तुषारने आशिष आणि दिवाकर बद्दल एक शब्दही टोनीला सांगितला नव्हता...
समायरा टोनीचं बंधूप्रेम ऐकून होती... म्हणून तिने ही हुशारी बाळगली होती... आणि मार्था पेक्षाही जास्त तीला आशिष आणि दिवाकरची भीती वाटत होती... टोनीला ते मोकळेपणाने सांगू पण शकत नव्हती....
टोनीने डायरेक्ट त्याची गाडी कॉफी शॉप जवळ थांबावली...
समायरा : कॉफी शॉप??
टोनी : ईथे थोडा वेळ बोलत बसू, तसंही आपल्याला कुठे वेळ मिळत आहे....
समायरा : हो....मला तर आता खूप गोंधळल्या सारखं होत आहे... मार्था मला accept कसं करणार?? आणि आपलं ऑफिस... सगळे मला खोटारडी समजतील.... हो ना...
टोनी : समु !! तू काळजी करू नकोस... तू कुठल्या परिस्थितीत interview दिला हे माहीती आहे मला... फक्त मला माझे हे इंटर्नशिप पूर्ण करून आपलं ऑफिस जॉईन करू दे... मग मी मॉमला बरोबर पटवतो... एकदा मॉम तयार झाली की ऑफिसमध्ये तीच सांगेन...
थोडा वेळ बसून टोनी समायराला घरी सोडण्यासाठी गेला...ठरलेल्या जागेवर समायरा उतरली...
चल येते मी.... हे सगळं काम आज उरकायचं आहे... लॅपटॉप आणि रजिस्टर दाखवत समायरा म्हणाली....
टोनी : कसं गं आपलं लाईफ?? एकदम busy, busy आता मलाही अमेरीकन वेळा पाळाव्या लागतात... चल मी पण येतो... उद्या येतो मी....
समायरा : उद्या तुषार नलीनीला बघायला जाणार आहे.... ऑफिस सुटल्यावर मी एकटीच असेन...
चला बाय😍, आई बागेत दिसत आहे येते मी....
टोनी : बाय dear.. 😍
ईकडे तुषारने काही नवीन कपड्यांची खरेदी केली... आता त्याची नलीनीला पाहण्याच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली....
दुसरा दिवस उजाडला🌄.... तुषार आज जाम खूष होता.... लवकरच स्वप्न सत्यात येताना त्याला दिसत होतं....
नलिनीदेखील आपल्या स्वप्नातील राजकुमार आपल्याला मिळणार आहे त्या मुळे खूप आनंदी होती.... तिच्या चेहऱ्यावर आपोआपच एक वेगळी चमक आली होती....
तिच्या घरी तिच्या आईवडिलांची ये जा चालू होती... कसलीही कमी पडली नाही पाहीजे असा नलीनीच्या बाबांचा अट्टाहास होता....नलीनीच्या आईने पंचपक्वान्नची तयारी केली....
नलिनीची आई :नलिनी !! मुलगा बघायला येणार तर इतकी तयारी... लग्नाच्या वेळेस तर काय तयारी करतील तुझे बाबा...
नलिनी : 😊आई मी आकाशी रंगाची साडी घालू ना??
खरं तर तुषारचा आवडता रंग आकाशी आहे हे तीला समायराने सांगितलं होतं...
नलिनीची आई : तूला कुठलाही रंग छान दिसतो.... तूला जी छान वाटेल ती घाल... तूला माहीती नलिनी!! असं वाटतं काल परवाचीच गोष्ट आहे तूला साडी नेसता येत नव्हती.. किती रडत होतीस तू.... आणि आज??
नलीनीच्या आईने सगळ्यांच्या नकळत स्वतःचे डोळे पुसले....
मुलाचा येण्याचा टाईम दोन वाजताचा ठरला होता.... त्या हिशोबाने सगळी तयारी चालू होती....
समायरा आणि तुषार ऑफिसला पोहोचले...
रजनी : hi तुषार क्या बात है आज एकदम हँडसम दिसत आहॆस...
तुषार : हो का ? थँक यू, थँक यू....
केबिन मध्ये गेल्यावर समायरा बोलली खरंच तूझा चेहरा एकदम चमकत आहे.... ही facial ची चमक आहे की नलिनीची?? 😉
तुषार :😊, दोघांचीही म्हणायला काही हरकत नाही....
दोघेही कामाला लागले सगळ्या नोंदी समायराने फेअर केल्यामुळे आज काम एकदम सोपे आणि नेहमीसारखे झाले होते...
तुषारची घरी जाण्याची वेळ झाली....
तुषार : समायरा !! चल येतो मी... बरोबर दोन वाजता पोहोचायचं आहे...
समायरा : ठीक आहे... बेस्ट लक....
तुषार: 😊 थँक्स.....
तुषार त्याच्या घरी गेला त्याची आई तयारच होती तो ही फ्रेश होऊन तयार झाला... आणि मग दोघेही नलीनीच्या घरी कॅबने पोहोचले....
नलीनीच्या आईने दरवाजा उघडला...
थोडा वेळ बसून लागलीच नलीनीच्या आईने ताटं तयार केली...
पहिले तुषार आणि नलिनीचे बाबा जेवायला बसले ... जेवताना वाढायला नलिनी होती.... आधीच त्याला इतकी आवडणारी नलिनी आज तर खूप मोहक वाटत होती.... तीचे लांबसडक केस त्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा.... त्याच्या आवडत्या आकाशी रंगाची साडी.... इतकं सगळं बघून तो काय खात आहे याचं भान नव्हतं.....
नलिनीचे बाबा : तुषारराव पोटभर जेवा....
तुषार :अ, हो...
नलिनीचे बाबा :अगं नलिनी !! बघतेस काय?? पोळी वाढ ना....
तुषार तर फक्त नी फक्त नलिनीकडे बघत होता....
नलिनीचे बाबा : तुषारराव अजून काही हवं आहे का??
नलीनीच्या बाबांचा आवाज ऐकून तुषार एकदम भानावर आला....
क्रमश :
भाग 55 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
2 टिप्पण्या
Mast👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा