भोजनाचा कार्यक्रम संपल्यावर आता सगळेच जण बैठकीत आले...
नलिनीचे बाबा : तुषारराव जेवण झाले ना व्यवस्थित.. कसे होते....
तुषार : जेवण एकदम छान😊...
नलिनीचे बाबा : हा सगळा स्वयंपाक नलीनीने केला आहे... असं मी मुळीच म्हणणार नाही😇... ती आमची एकुलती एक लाडकी कन्या.... तीला हे काम काही शिकवलं नाही.... तरी ती तुम्हाला उपाशी ठेवणार नाही याची मी खात्री देतो....
नलिनी : काय हो बाबा??🙄 गरजेपुरता स्वयंपाक येतो मला....
तुषारची आई :असू देत, असू देत मी सांगेन की सगळं.... ते काही इतकं अवघड नाही....
नलिनीचे बाबा :तुषारराव!! तुम्हाला काही मुलीला विचारायचे असेल तर विचारू शकता....
तुषारची आई : माफ करा, मी मध्ये बोलते... पण तुषारला नलिनी खूप आवडते😍.. त्याचं प्रेम आहे तिच्यावर😍.. आणि सध्या नलीनीने त्यांचे ऑफिस जॉईन केले आहे त्यामुळे एकमेकांच्या आवडी निवडी त्यांना माहितीच असणार.... तरी तुषार तूला अजून काही विचारायचे आहे का??
तुषार : नाही आई....
नलिनीचे बाबा :अरे वा😊... हे उत्तम झालं....
सगळं काही हसत खेळत पार पडलं.... नलीनीच्या बाबाचा दबाव देखील नाहीसा झाला होता.....
तितक्यात नलिनीचा चुलत भाऊ रवी नवीनच लग्न👩❤️👨 झालेला काका काकूंचे दर्शन घेण्यासाठी म्हणून घरी आला....
नलिनीला बघण्याचा कार्यक्रम आहे... हे त्याला समजले...
नलीनीच्या बाबांनी रवीची तुषारशी ओळख करून दिली....
रवी : मला असं का वाटत आहे की, मी तुम्हाला कुठेतरी पाह्यलं आहे....
थोडावेळ विचार करून रवीने नलीनीच्या बाबांना आतल्या रूम मध्ये बोलावले....
रवी : काका !! तूम्ही मुलाची नीट माहिती काढली का?
नलिनीचे बाबा : हो... हा त्याचा biodata....
रवी : biodata खोटा पण असू शकतो ना...
नलिनीचे बाबा :म्हणजे...
रवी : i am dam sure, हा तोच तुषार आहे.... ह्याचं लग्न झालं आहे.... आता उटीला हनिमून करून आले...
नलिनीचे बाबा : असं कसं शक्य आहे....
रवी ने त्याच्या बायकोला विचारले... तूला आठवतं का गं इव्हेंट वाल्यानी यांना पहिल्या दिवशी चीफ गेस्ट बनवले होते... हा तोच....
रवीच्या बायकोने रूममधून तुषारला न्याहाळले... अरे हो की त्यांची कॉटेज आपल्या कॉटेज जवळच तर होती....
नलीनीच्या बाबाने मग नलिनी, नलीनीच्या आईला मध्ये बोलावून घेतलं....
नलिनीचे बाबा : नलिनी !! तू ऑफिस मध्ये जाते तिथे तूला कळाले नाही का की या मुलाचे आधीच एक लग्न झाले आहे...
नलिनी : नाही बाबा !!त्याचे लग्न झालेले नाहीये...
नलिनीचे बाबा : म्हणजे याचा अर्थ तो तूला ही फसवत आहे.... रवी आता उटीला जाऊन आला तिथे तो त्याच्या बायकोसोबत आला होता....
नलिनीला सगळं माहिती असून नलिनी मात्र आता काहीच बोलू शकत नव्हती....
इतकी सगळी चर्चा झाल्यावर नलिनीचे बाबा बैठकीत आले....
नलिनीचे बाबा खूप चिडलेले 😡होते... मी हे लग्न मोडत आहे...
तुषारची आई: का काय झाले?? 🤔
मी माझी मुलगी एका लग्न झालेल्या माणसाला 👩❤️👨कसंकाय देऊ....तूमची हिम्मत कशी झाली माझ्या मुलीला मागणी घालायची....
तुषारची आई : लग्न झालेला? 🤔नाही हो... तूमचा काही गैरसमज झाला असेल.....
नलिनीचे बाबा : तुमचा मुलगा आता उटीला हनिमून करून आला आहे.... रवी !! जरा बाहेर ये...
रवी : सांग तू उटीला काय पाहिलं??
रवी : हो मी ह्याला ह्याच्या बायकोसोबत उटीला पाह्यलं...
ते ऐकून तुषारच्या आईला एकदम घेरी आली.... ती मटकन खाली बसली....
तुषार : आई!! नकोस गं असं परेशान होऊ.. तुझी शपथ घेऊन सांगतो माझं लग्न झालेलं नाहीये.... मी तूला सगळं सांगतो... आई आई म्हणून तुषार तिथेच रडायला लागला....
नलिनीचे बाबा : वा रे वा.... हनीमून करून येतोस आणि आईची खोटी शप्पथ घेतो.... काही तरी लाज वाटायला पाहीजे....
नलिनी : बाबा !! तुषार खरं बोलत आहे...
नलिनीचे बाबा : तू चूप गं😠... तूला काय कळतं....मग काय रवी आणि त्याची बायको खोटं बोलत आहेत का??
नलिनी : बाबा!! रवी दादा पण खोटं बोलत नाही पण ते अर्ध सत्य आहे...
नलिनीचे बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते....
नलिनीचे बाबा : तुषार !! हे लग्न मी मोडले आहे आणि तूम्ही येऊ शकता.....
तुषार आणि तुषारची आई तिथून निघाले तुषार त्याच्या आईचा हात पकडत होता.... नी त्याची आई तो झिडकारत होती....
नलिनी देखील तुषारच्या आईला विनवणी करत होती..बाबा असा अपमान करत आहेत त्या साठी मला माफ करा😢... पण तुषार खरंच दोषी नाहीये....
नलिनीचे बाबा : नलिनी !! तू आता जर अजून पुढे गेलीस तर मला कुणी मुलगी होती हे मी विसरून जाईन.....
नलीनीने तिच्या बाबाचे हे बोल ऐकताच समोरचा पाय मागे घेतला...
तुषारने त्याच्या बाबाच्या मृत्यू नंतर इतकं दुःख हे आज पाहिलं होतं.... त्याच्यामुळे त्याची आई खूप दुखावली गेली होती.... तुषारच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले होते.... समोरच रिक्षा मध्ये दोघेही बसले.... तुषारने ऑटो वाल्याला घराचा पत्ता सांगितला.....
दोघेही घरी पोहोचले... रस्त्यात तुषारची आई तुषारला एक शब्दही बोलली नाही....
तुषारची आई तुषारवर खूप चिडली😡 होती....आपला आयुष्यात न भूतो न भविष्यती असा अपमान झाला आहे ... सांग ना मी वरती गेल्यावर तुझ्या बाबाला काय उत्तर देऊ??
तुषार : आई !! असं काही बोलू नकोस ना गं... हे बघ मी तूला सगळं सांगतो पण तू असा काही गैरसमज करून घेऊ नकोस ना गं....
तुषारची आई : " गैरसमज " कसला गैरसमज?? तुषार आपला किती अपमान झाला आहे आज?? .... तुझं लग्न मोडलं आहे... कळतं का तूला ते....
तुषार : ते सगळं जाऊ दे... पण तू अशी रागावू नकोस गं... तू रागावलीस की माझे हातपाय गळून जातात....
तुषारची आई : कोण आहे ती मुलगी?? जिच्यासोबत तू उटीला गेला होतास
तुषार : "समायरा" पण आई आमच्यात मैत्री शिवाय दुसरं कुठलंच नातं नाही गं....
तुषारची आई : अशी कोणती मैत्री आहे की तूम्ही हनिमूनला गेलात....
तुषार : आई मी सगळं सांगतो गं...
तुषारची आई : मला ते पटेल... असं वाटत आहे का तूला?? अन ती समायरा का कोण... तूला आवडली तर मला सांगायचं ना... मी काय नाही म्हणाले असते का??
तुषार : अगं आई !!तेच तर मी सांगत आहे...
तुषारची आई तू माझ्याशी बोलूच नकोस.... असं म्हणून दोघेही आपापल्या बेडरूम कडे गेले.... तुषार तर नुसता सैरभैर झाला होता... त्याला काहीच कळत नव्हतं...
काय विचार केला होता आणि काय होऊन बसलं....
ईकडे समायरा अजून ऑफिस मध्येच होती.... टोनी तीला बाहेरून घेऊन जाणार होता पण उगाचच रिस्क नको म्हणून सगळे ऑफिसचे लोकं घरी गेल्यावर समायरा निघणार होती....
रजनी : काय आज घरी जायचा विचार नाही वाटतं??
तुषारचा फोन आला की जाईन... वेळ मारून नेत समायरा म्हणाली....
क्रमश :
भाग 56 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
2 टिप्पण्या
Nice.. Twist
उत्तर द्याहटवाThanks
हटवा